agricultural stories in marathi, agro vision, Oregon woman first known case of human infected with cattle eyeworm species | Agrowon

महिलेच्या डोळ्यात आढळली कॅटल आयवर्म !
वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018
ओरेगॉन येथील २६ वर्षीय महिलेच्या डोळ्यामध्ये कॅटल आयवर्म (शा. नाव ः Thelazia gulosa) पहिल्यांदाच आढळून आली आहे. प्रामुख्यानेमोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या (गाय) डोळ्यामध्ये ही सूत्रकृमी आढळते. मात्र, मानवांमध्ये तिचा प्रादुर्भाव आढळण्याची ही पहिलीच बाब समोर आली आहे. त्याबाबतची माहिती अमेरिकन जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडीसीन अॅण्ड हायजीन मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
ओरेगॉन येथील २६ वर्षीय महिलेच्या डोळ्यामध्ये कॅटल आयवर्म (शा. नाव ः Thelazia gulosa) पहिल्यांदाच आढळून आली आहे. प्रामुख्यानेमोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या (गाय) डोळ्यामध्ये ही सूत्रकृमी आढळते. मात्र, मानवांमध्ये तिचा प्रादुर्भाव आढळण्याची ही पहिलीच बाब समोर आली आहे. त्याबाबतची माहिती अमेरिकन जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडीसीन अॅण्ड हायजीन मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

ब्रुकींग (ओरेगॉन) येथील अॅबी बेकले या महिलेची सातत्याने डोळ्यामध्ये काही खुपत असल्याची तक्रार होती. ऑगस्ट २०१६ मध्ये ओएचएनयू येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. एरीन बोन्युरा यांनी पाहणी केली असता डोळ्यामध्ये ही कृमी आढळली. बेकले यांच्या पापणीच्या आतून पारदर्शक अर्धा इंच लांबीची कृमी वैद्यकीय तज्ज्ञांनी काढली. काढताना तिचे दोन भाग झाले असले तरी तिची प्रजात ओळखणे शक्य झाले.

कॅटल आयवर्म
उत्तर अमेरिकेती गायींच्या डोळ्यामध्ये थेलाझिया कुळातील सुत्रकृमी परजिवी आढळते. या आधी मानवामध्ये प्रादुर्भावाच्या दहा घटना नोंदवल्या असल्या तरी त्याची प्रजाती वेगळी आहे. गेल्या दोन दशकामध्ये प्रथमच थेलाझिया गुलोसा ही प्रजाती मानवामध्ये आढळली आहे.
या सूत्रकृमीचा प्रसार गायींच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यामध्ये तिच्या माशींद्वारे अंडी घातल्याने होतो. ही माशी एका गायीकडून दुसऱ्या गायीकडे या कृमींचा प्रसार करते. आतापर्यंत माणसांच्या डोळ्यामध्ये ती वाढू शकत नसल्याचे मानले जात होते.
 

 

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...