agricultural stories in marathi, agro vision, Parmar varsity scientists develop 41 new strains of 'carnation' | Agrowon

भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केल्या कार्नेशनच्या ४१ नव्या जाती
वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

हिमाचल प्रदेशातील डॉ. वाय. एस. परमार फळबाग आणि वनशास्त्र विद्यापीठातील संशोधकांनी व्यावसायिकरीत्या लागवड करण्यायोग्य कार्नेशन फुलांच्या ४१ नव्या जाती विकसित केल्या आहेत.

हिमाचल प्रदेशातील डॉ. वाय. एस. परमार फळबाग आणि वनशास्त्र विद्यापीठातील संशोधकांनी व्यावसायिकरीत्या लागवड करण्यायोग्य कार्नेशन फुलांच्या ४१ नव्या जाती विकसित केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात कार्नेशन या परदेशी फुलांच्या हरितगृहातील लागवडीमध्ये वाढ झाली आहे. या पिकाच्या वाढीसाठी पर्वतीय प्रदेशातील राज्यातील वातावरण अनुकूल असून, दर्जेदार उत्पादन मिळते. परिणामी हिमाचल प्रदेशातील किन्नोर, लाहाउस आणि स्पिती वगळता सर्व राज्यभर फूल लागवडीची व्याप्ती वाढत आहे. डॉ. वाय. एस. परमार फळबाग आणि वनशास्त्र विद्यापीठातील फूल उत्पादनशास्त्र विभागामध्ये वर्षभर फुलांचे उत्पादन घेण्यासाठी छाटणी, खत नियोजन, उत्तम दर्जाची रोपे, काढणीपश्चात तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. येथील मुख्य संशोधक डॉ. वाय. सी. गुप्ता, डॉ. एस. आर. धीमान, डॉ. पूजा शर्मा यांनी कार्नेशनच्या नव्या जाती विकसित केल्या आहेत. त्या विषयीमाहिती देताना गुप्ता म्हणाले, की नवीन जातींच्या विकासाला २००३ मध्ये सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात इन व्हिट्रो म्युटॅजेनेसीस पद्धतीने ९ जाती तयार केल्या. पुढे २०१३ मध्ये कार्नेशनच्या नवीन रंगाच्या जाती विकसित करण्यासाठी शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर केला. त्याअंतर्गत ३५ जाती तयार केल्या असून, त्याच्या व्यावसायिक लागवडीच्या दृष्टीने चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

कुलगुरू डॉ. एच. सी. शर्मा म्हणाले, की विद्यापीठातील फुलशास्त्र विभागाला भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून राष्ट्रीय कार्नेशन जतनगृहाचा दर्जा मिळाला आहे. येथे देशभरातील सुमारे ७४ जातींचे जतन केले आहे. तसेच २०१३ मध्ये मिळालेल्या सर्वोत्तम केंद्राच्या पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.

कार्नेशन हे फूल लांब दांड्याच्या फुलामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या पहिल्या दहा फुलांमध्ये येते. भारतामध्ये या फुलांना दिल्ली, बेंगळूरू, चंदीगढ, मुंबई आणि चेन्नई येथे चांगली मागणी आहे. त्यातील ५० टक्केपेक्षा अधिक वाटा हा लाल फुलांचा असतो. सध्या नव्याने विकसित केलेल्या जातींमध्ये विविध रंग, लांब दांडे, अधिक पाकळ्या आणि अधिक टिकवणक्षमता हे गुणधर्म आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये येणाऱ्या फ्युजारीयम रोगासाठी त्या सहनशील असल्याचे समोर आले आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...