agricultural stories in marathi, agro vision, Plants increase flower production within a day of soil nutrient application | Agrowon

मूळ ते शेंडा यातील वेगवान माहिती प्रणाली झाली ज्ञात
वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाला तातडीने प्रतिसाद देणारी फूलपिकातील मूलद्रव्यीय प्रणाली ओळखण्यात केंब्रिज विद्यापीठातील सॅन्सबरी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना यश आले आहे. यामुळे वापरलेल्या खतांची कार्यक्षमता वाढून, त्याचे रूपांतर फुलांमध्ये होण्याचा दर वाढणार आहे. हे संशोधन ‘प्रोसिंडिग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाला तातडीने प्रतिसाद देणारी फूलपिकातील मूलद्रव्यीय प्रणाली ओळखण्यात केंब्रिज विद्यापीठातील सॅन्सबरी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना यश आले आहे. यामुळे वापरलेल्या खतांची कार्यक्षमता वाढून, त्याचे रूपांतर फुलांमध्ये होण्याचा दर वाढणार आहे. हे संशोधन ‘प्रोसिंडिग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सॅन्सबरी प्रयोगशाळेमध्ये पिकांच्या मुळांकडून बाह्य स्थितीविषयीची माहिती रोपांच्या शेंड्यापर्यंत वेगाने पाठवण्याच्या यंत्रणेचा अभ्यास करण्यात आला. उदा. मातीमध्ये वाढवलेल्या पोषक घटकांला शेंड्यातील पेशी २४ तासांपेक्षाही कमी वेळामध्ये प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले. प्रयोगशाळेमध्ये अत्यंत सूक्ष्म स्थितीमध्ये आणि प्रत्यक्ष शेतामध्ये करण्यात आलेल्या प्रयोगामध्येही इतका वेगवान प्रतिसाद दिसून आला. जमिनीमध्ये नायट्रेट स्वरूपातील नत्राचा वापर करताच वनस्पतीच्या शेंड्याकडील पेशींच्या वाढीचा आणि फुलांच्या विकासाचा दर वाढ असल्याचे स्पष्ट दिसून आले. या यंत्रणेचा वापर करून खतांची कार्यक्षमता वाढवणे शक्य होणार आहे. त्याच प्रमाणे ही यंत्रणा वेगवान असलेल्या पिकांच्या जातींची खास पैदास करणेही शक्य होईल. याविषयी माहिती देताना डॉ. बेनॉईट लॅंड्रेन म्हणाले, की नत्राचा जमिनीमध्ये वापरामुळे वनस्पतींच्या विकासावर विविध मार्गाने परिणाम होतो. विशेषतः वनस्पतीतील सायटोकायनीन हे रसायन मूळ ते शेंडा यातील समन्वयामध्ये कार्यरत असते. सायटोकायनीनची मुख्य भूमिका ही वनस्पतीचे हवेतील संरचना आणि मूलद्रव्ये यातील मध्यस्थाची असते. या भूमिकेबाबत आजवर फारसे ज्ञान नव्हते.

सायटोकायनीन हा घटक वनस्पतीच्या मुळांना पोषक घटक मिळाल्यानंतर तिथे तयार होतो. पुढे तो मुळे आणि वनस्पतीच्या वातावरणातील संरचना (इंग्रजीमध्ये त्याला मेरीस्टेम म्हणतात.) यात मध्यस्थांची भूमिका निभावतो. मुळांना जमिनीमध्ये नत्रांच्या प्रमाणामध्ये झालेल्या वाढींची जाणिव होताच, एक दिवसापेक्षाही कमी काळामध्ये सायटोकायनिन हे वनस्पतीतून प्रवास करून शेंड्यापर्यंत पोचते. शेंड्याच्या वाढीवर परिणाम करते. या प्रक्रियेचा वेग आश्चर्यकारक आहे. या प्रक्रियेमध्ये मुळे केवळ बाह्य स्थितीला प्रतिक्रिया देत नाहीत, तर ती माहिती वनस्पतीच्या सर्वांत वरचा भाग मानल्या जाणाऱ्या शेंड्यापर्यंत चोवीस तासांच्या आत पोचवतात.

डॉ. लॅंड्रेन हे प्रो. हेन्रिक जॉन्सन, डॉ. जेम्स लोके आणि प्रो. इलियट मेयरोवित्झ या संशोधकांच्या गटाचे सदस्य आहेत. हा गट वनस्पतीतील मूलद्रव्यीय पातळीवर होणाऱ्या प्रक्रिया व ते नियंत्रित करणारे जनुकीय विभाग यांची माहिती मिळविण्यासाठी काम करतो. यामध्ये विविध संप्रेरकाचे वहन, पेशींची वाढ आणि विभाजन यांचाही समावेश आहे.

नुकत्याच अर्बिडॉप्सिस वनस्पतीमध्ये झालेल्या या प्रयोगाविषयी माहिती देताना प्रो. जॉन्सन म्हणाले, की खतांच्या जमिनीमधील वापराला पिकांचा नेमका प्रतिसाद कसा असतो, याविषयी प्रयोग करण्यात आले. खतांच्या वापरानंतर वनस्पतींच्या एकंदरीत वाढीवरील परिणाम आणि पेशीय पातळीवर होणाऱ्या प्रक्रियांचा वेध यातून घेण्याचा प्रयत्न यात केला आहे. सायटोकायनीनची मुळे ते शेंडा अशीच प्रतिक्रिया असणाऱ्या सर्व पिकांमध्ये या संशोधनाचा फायदा होणार आहे. उदा. भात आणि मका या पिकामध्ये सायटोकायनीनच्या नियंत्रणामध्ये गुंतलेली जनुकांचे नकाशे मिळालेले आहेत. या पिकांच्या उत्पादनवाढीसाठीही हे संशोधन फायद्याचे ठरू शकते.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...