agricultural stories in marathi, agro vision, Pollinators use multiple cues to identify flowers across continents | Agrowon

कीटकांद्वारे परागीकरणासाठी आवश्यक घटकांचा घेतला शोध
वृत्तसेवा
शनिवार, 2 डिसेंबर 2017

एकूण वनस्पतींपैकी किमान ७५ टक्के वनस्पती या परागीकरणांसाठी कीटक, पक्षी आणि प्राण्यांवर अवलंबून असतात. गेल्या काही दशकांमध्ये कीटकांच्या प्रमाणात घट होत असल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादनावर दिसून येत आहेत. अशा स्थितीमध्ये जंगली परागवाहकांवर लक्ष केंद्रित करण्यात येत असले, तरी तुलनेने या सजीवांच्या फुलांच्या आवडी व निवडीविषयी फारच कमी माहिती उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांचा एक गट या परागवाहकांच्या फुले ओळखण्याच्या क्षमतेचा अभ्यास करीत आहे.

एकूण वनस्पतींपैकी किमान ७५ टक्के वनस्पती या परागीकरणांसाठी कीटक, पक्षी आणि प्राण्यांवर अवलंबून असतात. गेल्या काही दशकांमध्ये कीटकांच्या प्रमाणात घट होत असल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादनावर दिसून येत आहेत. अशा स्थितीमध्ये जंगली परागवाहकांवर लक्ष केंद्रित करण्यात येत असले, तरी तुलनेने या सजीवांच्या फुलांच्या आवडी व निवडीविषयी फारच कमी माहिती उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांचा एक गट या परागवाहकांच्या फुले ओळखण्याच्या क्षमतेचा अभ्यास करीत आहे.

प्रत्येक सजीव हा सभोवतालच्या घटकांवर विविध अवयव आणि संवेदनाद्वारे लक्ष ठेवून असतो. (उदा. डोळे- प्रकाश, कर्ण - ध्वनी, त्वचा किंवा स्पर्शिका - स्पर्श आणि जीभ किंवा सोंड - चव) मात्र, कीटकांच्या किंवा माश्यांचा विचार केल्यास त्यांचा मेंदू आकाराने अत्यंत लहान असूनही ते स्वतःसाठी योग्य त्या अन्नाचा शोध घेत असतात. या प्रयत्नांमध्ये नेमक्या वनस्पती किंवा फुलांचा शोध क्रमप्राप्त असतो. स्वीडन येथील उप्पसाला विद्यापीठातील कॅरीन नोर्डस्टॉर्म यांचा गट, ऑस्ट्रेलिया येथील फ्लिंडर्स विद्यापीठ आणि बंगळूर (भारत) येथील राष्ट्रीय जैवशास्त्र केंद्रातील शॅन्नोन ओल्सोन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांचा गट यावर संशोधन करीत होता. हॉव्हर फ्लाय या माश्यांच्या संवेदनात्मक यंत्रणेवर कार्यरत या संशोधकांच्या दोन गटांना त्याचा वेध घेण्यात यश आले आहे. या माश्या आकार, रंग आणि गंध यावरून विविध पर्यावरणातील फुलांची ओळख पटवत असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी एकत्रित अशा संवेदना, ओळख प्रणाली विकसित झाली आहे.

राष्ट्रीय जैवशास्त्र केंद्रातील शॅन्नोन ओल्सोन यांनी स्वीडन येथील कॅरीन नोर्डस्टॉर्म यांच्याशी हॉव्हर फ्लायसंदर्भात संपर्क साधला. ही माशी हिमालयात ४००० मीटरपेक्षा अधिक उंचीवर सापडते. अशीच एक माशी (प्रजाती ःEristalis tenax) स्वीडन, जर्मनी, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही आढळते. आत्तापर्यंत कीटकांसंदर्भात झालेले बहुतांश अभ्यास हे स्थान किंवा प्रदेशनिहाय आहे. मात्र, पहिल्यांदाच हॉव्हर फ्लाय या माश्यांच्या संवेदना ओळखणाऱ्या यंत्रणेचा अभ्यास एकत्रितपणे करण्यात आला. कारण युरोप, आशिया, उत्तर अमेरिका येथील माश्यांच्या फुलांची निवड ही वेगळी आहे. येथील फुलांचे आणि वनस्पतींचे प्रकारही वेगळे आहेत.

असे झाले संशोधन

  • संशोधकांनी उष्ण कटिबंधातील बंगळूर, अल्पाईन सिक्कीम आणि थंड हवामान असलेल्या स्वीडन येथील हॉव्हर फ्लाय माश्यांच्या वर्तनाच्या नोंदी घेतल्या. या माश्या भेट देत असलेल्या फुलांचे गुणधर्म तपासण्यात आले. त्यांच्या आवड निवडींचा अंदाज घेण्यात आला. त्यांचे आकर्षकता आणि अनाकर्षकता यावर संख्याशास्त्रीय विश्लेषण करण्यात आले. आकर्षक वाटणाऱ्या फुलांचे कृत्रिम गंध, रंग व आकार तयार करून त्यावर येणाऱ्या कीटकांच्या तीनही संशोधनस्थळी नोंदी घेण्यात आल्या.
  • उदा. लहान निळ्या रंगाच्या विशिष्ठ गंध असलेल्या कृत्रिम फुलांकडेही या माश्या आकर्षित झाल्या. थोडक्यात, या माश्या फुलांकडे फूल म्हणून जात नाहीत, तर त्या गंध आणि रंगाकडे आकर्षित होत असल्याचे दिसून आल्याचे संशोधक व्ही. एस. प्रागदीश यांनी सांगितले.
  • यातील काही गंध कोणत्याही वातावरणामध्ये प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. हे संशोधन प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...