agricultural stories in marathi, agro vision, post department moves on drone technology | Agrowon

पत्रांना मिळणार ड्रोनचे पंख !
सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जानेवारी 2018

परदेशातील कुरिअर सेवेप्रमाणेच ड्रोनद्वारे टपाल किंवा पत्रांचे वहन करण्याच्या निर्णय टपाल खात्याने घेतला आहे. ‘सेगवे’ या बॅटरी डिव्हाइस मशिनद्वारे पत्रे टपाल कार्यालयापर्यंत पाठविण्याचा गांभीर्याने विचार होत आहे. येत्या १५ दिवसांत टपाल कार्यालयात दस्तनोंदणी करारासंबंधीे कामकाजही सुरू  होणार आहे.

परदेशातील कुरिअर सेवेप्रमाणेच ड्रोनद्वारे टपाल किंवा पत्रांचे वहन करण्याच्या निर्णय टपाल खात्याने घेतला आहे. ‘सेगवे’ या बॅटरी डिव्हाइस मशिनद्वारे पत्रे टपाल कार्यालयापर्यंत पाठविण्याचा गांभीर्याने विचार होत आहे. येत्या १५ दिवसांत टपाल कार्यालयात दस्तनोंदणी करारासंबंधीे कामकाजही सुरू  होणार आहे.

टपाल खात्याचा पुणे विभाग प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन आणि सेगवे या सुविधा सुरू करणार असून, त्याचे प्रात्यक्षिक २० जानेवारी रोजी गणेश कला क्रीडामंच येथे भरणाऱ्या ‘महापेक्‍स’ या टपाल तिकिटांच्या संग्रहाच्या प्रदर्शनामध्ये होईल. सुरवातीला अर्धा किलो वजनाची पत्रे ड्रोनद्वारे पाठविण्यात येतील. पोस्टमनला वेळेत टपाल वितरणासाठी सुरवातीला भाडेतत्त्वावर ‘सेगवे’ बॅटरी डिव्हाइस मशिन घेण्यात येतील. महापेक्‍स प्रदर्शनातून स्वारगेट येथील टपाल कार्यालयापर्यंत ड्रोनवरून पत्रे पाठविण्यात येणार आहेत, तर स्वारगेट टपाल कार्यालयापासून सिटी पोस्टापर्यंत ‘सेगवे’द्वारे टपाल पाठविण्यात येईल. या प्रयोगाच्या यशस्वीतेनुसार ड्रोन व सेगवे वापरण्याबाबतचे धोरण आखण्यात येणार आहे.

याविषयी बोलताना पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर म्हणाले, की आधुनिक ड्रोन व सेगवेचा वापर करून सेवा-सुविधा पुरविण्याचा वेग वाढवण्यात येईल. दस्तनोंदणीसंबंधी टपाल खात्याने एजन्सी घेतली आहे. त्यामुळे १५ दिवसांत या सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येईल.
 

 

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...