agricultural stories in marathi, agro vision, potato gene research | Agrowon

बटाट्यांच्या जंगली जातींसह जनुकीय अभ्यास
वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

सध्या उत्तर अमेरिकेमध्ये लागवडीखाली असलेले बटाटे आणि त्याचे प्राचीन पूर्वज यामध्ये जनुकांचा एक समान भाग शिल्लक असल्याचे मिशीगन राज्य विद्यापीठामध्ये झालेल्या अभ्यासात दिसून आले आहे. या महत्त्वपूर्ण जनुकीय मार्गिकेवरून बटाट्याच्या हजारो वर्षांतील विविध हवामान व परिस्थितीशी केलेल्या जुळवणुकीची माहिती उपलब्ध होणार आहे. याचा फायदा भविष्यामध्ये बदलत्या वातावरणामध्ये बटाट्यांच्या जाती तग धरण्याच्या उद्देशाने होऊ शकतो.

सध्या उत्तर अमेरिकेमध्ये लागवडीखाली असलेले बटाटे आणि त्याचे प्राचीन पूर्वज यामध्ये जनुकांचा एक समान भाग शिल्लक असल्याचे मिशीगन राज्य विद्यापीठामध्ये झालेल्या अभ्यासात दिसून आले आहे. या महत्त्वपूर्ण जनुकीय मार्गिकेवरून बटाट्याच्या हजारो वर्षांतील विविध हवामान व परिस्थितीशी केलेल्या जुळवणुकीची माहिती उपलब्ध होणार आहे. याचा फायदा भविष्यामध्ये बदलत्या वातावरणामध्ये बटाट्यांच्या जाती तग धरण्याच्या उद्देशाने होऊ शकतो.

जागतिक पातळीवरील पिकांमध्ये तिसरे महत्त्वाचे पीक असलेल्या बटाटा पिकाच्या नव्या जाती विकसित करण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. गेल्या शतकामध्ये अत्यंत तुरळक जातींचा विकास शक्य झाला आहे. बदलत्या वातावरणामध्ये तग धरण्याच्या दृष्टीने बटाटे आणि त्यांच्या जंगली जाती यांचे जनुकीय विश्लेषण करण्यात येत असून, त्याचा फायदा २१ व्या शतकातील कृषिक्षेत्राला होणार असल्याचे मत मिशीगन राज्य विद्यापीठातील वनस्पती जीवशास्त्र विभागातील प्राध्यापिका रॉबिन ब्युयेल यांनी व्यक्त केले.

जंगली सोलॅनम प्रजातीपासून स्थानिकीकरण झालेल्या व लागवडीखाली असलेल्या बटाटा जाती या गुणसूत्रांचे संपूर्ण दोन वेगळे सेट असलेल्या आहेत. त्यांचा मागोवा पेरू येथील अॅन्डेज पर्वतीय प्रदेश आणि दक्षिण अमेरिकेमध्ये घेण्यात आला. बटाटा स्थानिकीकरणाची प्रक्रिया अज्ञात असली तरी ती साधारणपणे ८ ते १० हजार पूर्वी घडल्याचे मानले जाते. बटाटे हे पीक पेरू, बोलिव्हिया सह दक्षिण अमेरिकेमध्ये घेतले जाते. पुढे त्यांची लागवड चिली आणि अर्जेंटिनाच्या दीर्घ उन्हाळी दिवसांमध्ये होऊ लागली. पुढे हे पीक युरोपसह जगभरामध्ये पूरक खाद्य पीक म्हणून स्वीकारले गेले.
पूर्वी मिशीगन विद्यापीठामध्ये असलेल्या मात्र सध्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेव्हिस येथे कार्यरत असलेल्या मायकेल हार्डीगन यांच्या नेतृत्त्वाखाली मिशीगन विद्यापीठ, व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि अन्य राज्य विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने जंगली, लॅंड्रेस (दक्षिण अमेरिकी स्थानिक प्रजात) आणि आधुनिक बटाटा जाती यांचा जनुकीय अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. हा सर्वात मोठी जनुकीय संरचनेचा अभ्यास असून, त्यात सर्वात अधिक विविधता असलेल्या बटाटा पिकांचे रिसिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. बटाट्यातील जनुकांची गुंतागुंत मोठी असून, त्यात ३९ हजार जनुके आहेत. (तुलनेसाठी माणसामध्ये अंदाजे २० हजार जनुके असतात.)

संशोधकांनी संपूर्ण जनुकांतील स्थानिकीकरणाच्या सुरवातीच्या प्रक्रियेमध्ये झालेल्या सुधारणांमध्ये कार्यरत अशा २६२२ जनुकांची ओळख पटवली आहे. उदा. जंगली बटाट्यामध्ये कंद आणि बेणे वेगळे मिळते. लागवडीखाली असलेले बटाटे हे अलैंगिक असून, कंद आणि बेणे एकातच असते. या बदलाला नियंत्रित करणाऱ्या जनुकांचे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. त्याच प्रमाणे किडी रोगांविरुद्ध लढण्याची जंगली जातींची क्षमतेवरही प्रकाश पडणार आहे. विविध घटकांच्या नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या शारीरिक घड्याळाची लय समजून घेता येईल.

जंगली ते आधुनिक पीक या टप्प्यातील जनुकीय विविधतेच्या अभ्यासातून बदलत्या वातावरणामध्ये जुळवणुकीच्या क्षमतेविषयी अधिक माहिती मिळते. या टप्प्यामध्ये झालेले जनुकीय बदल महत्त्वाचे असून, ते समजल्यास भविष्यातील तीव्र वातावरणाला अनुकूल बटाटा जातींची पैदास करणे सुलभ होईल.
- रॉबिन ब्युयेल, संशोधिका.

इतर अॅग्रो विशेष
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...
शेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित...सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा, गुजरात) :...
व्यवसायाचे तंत्र शेतीच्या नियोजनात ठरले...नाशिक येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळून नरेंद्र...
गावची कुंडली मांडता आली पाहिजेशहरी महिलांना साद घालून १९९२ ला कोल्हापुरात...
उत्पन्नवाढीची सूत्रेअर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद...
राज्यात ‘झिरो पेंडन्सी अँड डेली...मुंबई : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ या...
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात...पुणे : राज्यात कोरडे हवामान आहे. त्यामुळे...
खाद्यतेलांच्या किमान आयात मूल्यात वाढनवी दिल्ली ः सरकारने रिफाइंड, ब्लिच्ड आणि शुद्ध...
ग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले...आळंदी, पुणे : सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद...
शेतीत नवे बदल घडवून गावाला पुढे नेणार...आळंदी, जि. पुणे : शेतीतील समस्यांवर सगळेच बोलतात...
सरपंच हाच शासन-जनतेमधील दुवा :...आळंदी, पुणे : “ग्रामविकासासाठी केंद्र व राज्याने...
‘जलयुक्त’कडून दुष्काळमुक्तीकडे...राज्यातील मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षण प्रवण...
शेखचिल्ली धारणा कधी बदलणार?खरीप पिकांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि रबी...
जलयुक्त शिवार, परिवर्तनकारी गावांवर आज...पुणे : आळंदीत सुरू असलेल्या ‘सकाळ अॅग्रोवन’च्या...
थंडीत हलकी वाढ; हवामान कोरडेपुणे : गेल्या दोन दिवसांपासून गोव्यासह संपूर्ण...