वराह पिल्लांच्या मेंदू विकासासाठी कोलीन आवश्यक

वराह पिल्लांच्या मेंदू विकासासाठी कोलीन आवश्यक
वराह पिल्लांच्या मेंदू विकासासाठी कोलीन आवश्यक

गर्भवती अवस्थेमध्ये कोलिन घटकांचा आहारात वापर केल्यास त्याचा नवजात मुलांच्या चयापचय आणि मेंदूच्या विकासावर परिणाम होत असल्याबाबत अनेक अभ्यास उंदरावर या पूर्वी झाले आहे. आता वराहावर त्याचे प्रयोग होत असून, या दोन्ही प्राण्यांच्या शरीराची रचना मानवासमानच असल्याने माणसांसाठीही हे निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.

कोलिन हे यकृत, अंडी, गव्हांकुर अन्य आहारामध्ये आढळते. पेशी प्रतल, चेतावाहक आणि मायेलिन (चेतापेशीच्या भोवतीचे मेदाचे आवरण) निर्मितीमध्ये उपयुक्त असलेल्या घटकांचा प्रौढ व्यक्तींच्या आहारात फारसा वापर होताना दिसत नाही. अमेरिकेमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार, ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांच्या आहारात पुरेसे कोलीन नसते. गर्भवती महिलांच्या आहारात ४५० मिलीग्रॅम प्रति दिन आवश्यकता असताना ते ३०० मिलीग्रॅमची पातळीही गाठत नाही. त्यामुळे गर्भाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. नुकत्याच इल्लिनॉईज विद्यापीठामध्ये वराहावर झालेल्या प्रयोगामध्ये मादीच्या गर्भारपणाच्या उत्तरार्धामध्ये कोलीनयुक्त व नसलेल्या आहार देण्यात आला. मादी विल्यानंतर पिल्लांना पहिल्या तीस दिवसांमध्ये तसाच आहार देऊन वाढीवरील परिणाम एमआरआय तंत्राने तपासला. २०१६ व २०१७ या वर्षामध्ये झालेल्या प्रयोगामध्ये वराहाच्या पिल्लाच्या मेंदूमध्ये तपकिरी आणि पांढऱ्या घटकांचे प्रमाण कमी जास्त असल्याचे दिसून आले. ज्या मादीच्या आहारात कोलीनची कमतरता होती, तिच्‍या पिल्लांच्या मेंदूचा आकार १० टक्‍क्‍यांनी कमी राहिला.  

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com