agricultural stories in marathi, agro vision, Probe into farm animals could help treat drug-resistant bacteria | Agrowon

प्रतिकारक जिवाणूंच्या प्रसारासाठी पशुपक्षी ठरतात कारण
वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांद्वारे प्रतिजैविकांना न जुमानणाऱ्या जिवाणूंचा प्रसार होतो. मात्र, त्याचा वेग आणि दिशा नेमकेपणाने जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जनुकीय माहिती विश्लेषण उपयुक्त ठरू शकेल, असे मत एडिंनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांद्वारे प्रतिजैविकांना न जुमानणाऱ्या जिवाणूंचा प्रसार होतो. मात्र, त्याचा वेग आणि दिशा नेमकेपणाने जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जनुकीय माहिती विश्लेषण उपयुक्त ठरू शकेल, असे मत एडिंनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे.

समृद्ध शेतीमध्ये नेहमीच विविध पाळीव जनावरांचाही समावेश केला जातो. त्यातील अनेक प्राणी अगदी त्याच्या कुटुंबातील सदस्यच बनून जातात. या प्राण्यांसोबतच खाद्यासाठी पाळल्या जाणाऱ्या पशुपक्ष्यांमुळेही विविध रोग आणि जिवाणूंचा प्रसारही होत असतो. या संदर्भात इंग्लंड येथील एडिंनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात गाई, वराह, कोंबड्या यासारख्या प्राण्यांमुळे औषधांना दाद न देणाऱ्या जिवाणूंचा प्रसार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिवाणूंतील नेमके फरक मिळवण्यासाठी त्यांनी जनुकीय विश्लेषण करून त्याची सांगड रोग प्रसाराशी घातली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ई. कोलाय जिवाणूंच्या प्रसारातून मानवी आरोग्यासाठी मोठा धोका असल्याचे भाकित केले आहे. मात्र, लिव्हरपूल आणि ऑक्सफोर्ड या नामांकित विद्यापीठांतील संशोधकांनी नैरोबी येथील आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्थेच्या सहकार्यांनी शेतीतील पाळीव प्राणी आणि त्यापासून पसरणाऱ्या जिवाणूंचा सविस्तर अभ्यास केला आहे. या संशोधनाविषयी माहिती देताना एडिंगबर्ग विद्यापीठातील लोकसंख्या आरोग्यशास्त्र केंद्रातील संशोधक दिशोन मुलोई यांनी सांगितले, की खाद्य प्राणी आणि माणूस यातील प्रतिकारक जिवाणूंच्या प्रसाराचे पुरावे मर्यादित असल्याचे आमच्या संशोधनात आढळले. मात्र, या विषयी अधिक समजून घेण्यासाठी जनुकीय माहिती विश्लेषण आणि मृत्यूकारक रोगाचे पुरावे यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यातून या दोन्ही समुदायातील रोगांचा प्रसार आणि दिशा याविषयी स्पष्टता मिळू शकेल.
डॉ. ब्रॅम व्हॅन बुन्निक यांनी सांगितले, की पाळीव प्राण्यांपासून होणारा रोग व जिवाणूंच्या प्रसाराविषयी फारच कमी माहिती उपलब्ध आहे. प्रतिजैविके आणि औषधांना प्रतिकारक जिवाणूंची समानता आणि ओळख याविषयी काम झालेले नाही. त्यामुळे रोगांचा प्रसाराची दिशा ठरवण्यासाठी जनुकीय विश्लेषण फायदेशीर ठरू शकते. संशोधनाचे निष्कर्ष जर्नल फूडबॉर्न पॅथोजन्स अॅण्ड डिसीजमध्ये प्रकाशित केले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...