agricultural stories in marathi, agro vision, Protected tropical forests are threatened by the bounty of adjacent oil palm plantations | Agrowon

तेलताडाच्या वाढत्या लागवडीने सजीव सृष्टीवरही परिणाम
वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

तेलताडाच्या लागवडीमध्ये वेगाने होत असलेल्या वाढीमुळे उष्ण कटिबंधीय जंगले धोक्यामध्ये येत असल्याचे सिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठामधील अभ्यासामध्ये दिसून आले आहे. याविषयीचे अधिक निष्कर्ष नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित झाले आहेत.

तेलताडाच्या लागवडीमध्ये वेगाने होत असलेल्या वाढीमुळे उष्ण कटिबंधीय जंगले धोक्यामध्ये येत असल्याचे सिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठामधील अभ्यासामध्ये दिसून आले आहे. याविषयीचे अधिक निष्कर्ष नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित झाले आहेत.

गेल्या दोन दशकापासून संशोधक डॉ. मॅथ्यू लस्कीन व त्यांच्यासह आंतरराष्ट्रीय संशोधकांचा एक गट मलेशियातील तेलताड उत्पादनाच्या परिणामांचा अभ्यास करीत आहे. या पिकाखालील क्षेत्र वेगाने वाढत असून, त्याचे परिणाम अन्य सजीवांसाठीही केवळ रहिवास क्षेत्राच्या हानीपेक्षा अधिक असू शकतात. उदा. तेलताडाची लागवड असलेल्या नजीकच्या जंगल परिसरामध्ये जंगली अस्वलांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे.

जंगली अस्वलांमुळे लहान झाडांच्या आणि रोपांच्या संख्येमध्ये वेगाने घट होते. अन्य संरक्षित क्षेत्राच्या तुलनेमध्ये ही घटक अर्ध्यापेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. अशी झाडे आणि फांद्या अस्वलांकडून आपल्या पिलासाठी घरटे उभारण्याच्या प्रक्रियेत वापरले जातात. याविषयी माहिती देताना डॉ. लस्किन म्हणाले की, गेली दहा वर्षे जंगलातील वनस्पती आणि लहान झाडे कमी होत होती. मात्र, त्यामागील कारण लक्षात येत नव्हते. जंगलाच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर परिसरात असलेल्या तेलताडाच्या लागवडीमुळे अनेक गोष्टी स्पष्ट होण्यास मदत झाली. तेलताड फळावर आल्यानंतर त्यातून जंगली अस्वलांच्या खाद्याची मुबलक उपलब्धता होते. परिणामी त्यांच्या प्रजोत्पादनाला चालना मिळते. या पिलाच्या वाढीसाठी घरडे बांधण्यासाठी जंगलाच्या जमिनीवर विविध वनस्पती आणि लहान झाडांचा वापर होतो.
शेतीचा परिसर वाढण्याचे परिणाम केवळ क्षेत्रापुरते मर्यादित राहत नाहीत. या पिकांचा जंगली सजीव आणि पर्यावरणावरही वेगवेगळे परिणाम होतात. विविध प्रयोग आणि निरीक्षणातून हे परिणाम जाणून घेणे आवश्यक असल्याचे सीटीएफएस-फॉरेस्ट जीईओ प्रोग्रॅमचे संचालक डॉ. स्टुअर्ट डेव्हिस यांनी सांगितले.

  • तेलताड शेजारी असलेल्या जंगल परिसरातील विशेषतः पेनिनसुलर मलेशिया, बोर्नेओ आणि सुमात्रा येथील वराह आणि माकडांची संख्याही वाढल्याचे निरीक्षण नोंदले गेले आहे.
  • हे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी तेलताड उत्पादक संघाने अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...