झाडांच्या प्रजातीनुसार ठरते बुरशी-बियांचे नाते

झाडांच्या प्रजातीनुसार ठरते बुरशी-बियांचे नाते
झाडांच्या प्रजातीनुसार ठरते बुरशी-बियांचे नाते

उष्णवर्गीय कटिबंधातील झाडांची विविधता आणि त्यावर आधारित बुरशींची विविधता यातील सहसंबंधांचा वेध घेण्याचा प्रयत्न पनामा येथील स्मिथोसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथील संशोधकांनी केला आहे. या वनस्पतींच्या बियांच्या अंकुरण्यासाठी विविध प्रकारच्या बुरशी मदत करत असतात. थोडक्यात, वनस्पतीच्या प्रजातीशी विशिष्ट अशा बुरशींशी जोडी जमलेली असते. त्यामुळे जैवविविधता ही एकमेकांना पूरक असते. या संशोधनाचे निष्कर्ष ‘प्रोसिडिंग्स ऑफ दी नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जंगलामध्ये झाडांची विविधता असणे हे एकाच वेळी अन्य अनेक बुरशी, जिवाणू, विषाणू यांच्यासह प्राण्याच्या प्रजातींच्या विविधतेसाठी आवश्यक असते. जंगलामध्ये जमिनीवर पडलेल्या बियांचे अंकुरण होण्याच्या प्रक्रियेमध्ये हे सूक्ष्मजीव अत्यंत मोलाची भूमिका निभावत असतात. वनस्पतीच्या प्रजाती आणि त्यांच्या संबंधित बुरशींचा अभ्यास पनामा येथील स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधक कॅरोलिना सारमियन्टो यांनी केला आहे. त्या विषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, की वनस्पतींच्या प्रजातीनुसार त्यांच्या बियांवर वाढणाऱ्या बुरश्यांची जोडी जमलेली असते. त्यातूनच या बुरश्या बियांच्या अंकुरण, वाढीला मदत करणार की त्याला नष्ट करणार हे ठरत असते. अर्था वेगवेगळ्या बियांशी बुरशींचे वागणे वेगळे का असते, याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. यामागील गूढ उलगडण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.

  • या अभ्यासामध्ये बॅरो कोलोरॅडो बेटावरील जंगलामध्ये आढळणाऱ्या स्थानिक नऊ प्रजातींच्या ८३०० हजार बिया जमिनीमध्ये एक महिना ते एक वर्ष या काळासाठी गाडल्या. वेगवेगळ्या काळानंतर त्या काढून त्यावर वाढणाऱ्या बुरशींच्या प्रजातींचे विश्लेषण केले.
  • बियांचा बाह्य भाग निर्जंतूक करून, बिया अर्ध्या कापून घेतल्या. अर्ध्या भागावरील बुरशींचा वाढ प्रयोगशाळेमध्ये केली. अशा वेगळ्या केलेल्या बुरशांची संख्या १४६० इतकी भरली. त्यातील दोनशे बुरशी प्रजातींची ओळख पटवण्यात आली.
  • उर्वरीत अर्ध्या भागातील जिवंत असलेल्या अंकुराची वाढ व अन्य स्थितीची माहिती जमा केली.
  • निष्कर्ष

  • प्रजाती, काळ यासोबतच मातीचा प्रकार, जंगलातील अन्य झाडांचे प्रकार यानुसार बुरशींच्या प्रजाती व संख्या यात बदल होत असल्याचे दिसून आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका झाडाच्या प्रजातीसाठी नुकसानकारक असलेली बुरशी दुसऱ्या झाडासाठी मात्र उपकारक ठरत असल्याचे सहसंशोधिका पॉल कॅनिलो झालामिया यांनी सांगितले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com