agricultural stories in marathi, agro vision, remote sencing for forest survey | Agrowon

रिमोट सेन्सिंग तंत्राने जंगलाचे निरीक्षण होईल सोपे
वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

जंगली पर्यावरणातील उत्पादकता आणि स्थिरता ही मुख्यतः वैविध्यावर अवलंबून असते. त्याचे मापन करण्याची नवी पद्धती झुरीच विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. त्याद्वारे मापनासोबतच विविधतेचा विविध पातळीवर नकाशाही मिळवतात. अगदी एका झाडापासून आणि एखाद्या संपूर्ण प्रजातींचा विविध प्रमाणामध्ये नकाशा मिळवता येतो. त्यासाठी विमानाद्वारे एअर सेन्सिंग तंत्राचा वापर केला जातो. भविष्यात उपग्रहाद्वारे जंगलाचे मॅपिंग करण्याच्या अचूक पद्धती शक्य होऊ शकतील.

जंगली पर्यावरणातील उत्पादकता आणि स्थिरता ही मुख्यतः वैविध्यावर अवलंबून असते. त्याचे मापन करण्याची नवी पद्धती झुरीच विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. त्याद्वारे मापनासोबतच विविधतेचा विविध पातळीवर नकाशाही मिळवतात. अगदी एका झाडापासून आणि एखाद्या संपूर्ण प्रजातींचा विविध प्रमाणामध्ये नकाशा मिळवता येतो. त्यासाठी विमानाद्वारे एअर सेन्सिंग तंत्राचा वापर केला जातो. भविष्यात उपग्रहाद्वारे जंगलाचे मॅपिंग करण्याच्या अचूक पद्धती शक्य होऊ शकतील.

पर्यावरण अभ्यासामध्ये वनस्पतींची विविधता आणि एकूण पर्यावरणाच्या सक्रियतेचा उत्तम संबंध असल्याचे मानले जाते. ज्या जंगलामध्ये अधिक पर्यावरणीय सक्रियता असते, ती अधिक उत्पादक व स्थिर असल्याचे दिसून येते. अशी जंगले पर्यावरणातील बदलांनाही चांगल्या प्रकारे सामोरी जात असल्याचे स्पष्ट होते. त्याच प्रकारे रोग किडीचा उद्रेक, वणवे आणि चक्रिवादळे यांसाठीही ती कमी संवेदनशील असतात. आकाशातून जंगलातील वनस्पतींची विविधता मोजण्यासाठी शरीरशास्त्रीय निकष आणि अन्य घटकांचा आधार घेतला जातो. पूर्वी या कामासाठी प्रत्यक्ष जंगलांचे माणसांद्वारे सर्वेक्षण केले जात असे. यामध्ये अधिक कुशल माणसांची गरज असे. अर्थात, त्यातही वनस्पतींची संख्या आणि प्रजाती यावर मर्यादा येत. यावर मात करण्यासाठी झुरीच विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया तंत्र संस्था, नासा येथील संशोधकांनी एकत्र रिमोट सेन्सिंग तंत्राचा वापर करत नवीन पद्धती विकसित केली आहे. त्याद्वारे लहान किंवा मोठ्या जंगलातील सक्रिय विविधता, प्रजातीविरहित विस्तृत माहिती मिळवणे शक्य होते.

  • या पद्धतीचा वापर करून लेगेर्न पर्वतीय प्रदेशातील थंड भागातील जंगलांचे निरीक्षण केले. याद्वारे एकाच वेळी संपू्र्ण जंगलाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. जंगलातील वनस्पतींच्या पाने किंवा कॅनोपीचे वरून निरीक्षण करून अभ्यास करण्यात आल्याचे मायकेल स्केपमॅन यांनी सांगितले. ते भौगोलिक विभागातील रिमोट सेन्सिंग प्रयोगशाळेमध्ये कार्यरत आहेत.
  • लेसर स्कॅनिंग तंत्रामुळे संशोधकांना कॅनोपीतील उंची, पानांचे प्रमाण आणि फांद्यांची घनता याविषयी माहिती मिळवणे शक्य झाले. त्यातून कॅनोपिच्या विविध थरांपर्यंत पोचणाऱ्या सूर्यप्रकाशाचाही वेध घेता येतो. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साइड आणि त्याचा वनस्पतींकडून होणारा वापर याविषयी माहिती मिळते. या साऱ्या घटकांच्या इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी तंत्राद्वारे प्रतिमाही मिळवता येतात. त्यावरून जंगलाच्या एकूण आरोग्याचा वेध घेणे शक्य होते.
  • चाचणीमध्ये पानांच्या विविध पातळीवर माहिती मिळवून त्याचे तुलनात्मक विश्लेषणही करण्यात आले. तसेच ज्या भागामध्ये कोरडी, तीव्र उताराची आणि खडकाळ माती होती, तेथील वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास केला.
  • भविष्यामध्ये अवकाशातून विशेषतः उपग्रहाद्वारे अशा प्रकारे निरीक्षण करणे शक्य होऊ शकते. त्यामुळे अत्यंत कमी मनुष्यबळामध्ये अधिक माहिती एकाच वेळी मिळवणे शक्य होईल, अशा आशा आहे.

इतर ताज्या घडामोडी
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ७५००...नागपूर   : राज्यातील वीज वितरण करणाऱ्या...
परभणीतील पीकविमा परतावाप्रश्नी ठोस...परभणी : पीकविमा परतावाप्रश्नी ठोस तोडगा निघत...
किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध...नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा,...
मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप...कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व...
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची...पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये...
कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७...औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या...