कर्बवायूंचे वाढते प्रमाण गोड्या पाण्यासाठीही ठरतेय धोकादायक

कर्बवायूंचे वाढते प्रमाण गोड्या पाण्यासाठीही ठरतेय धोकादायक
कर्बवायूंचे वाढते प्रमाण गोड्या पाण्यासाठीही ठरतेय धोकादायक

वातावरणातील वाढत्या कर्बवायूंचा फटका गोड्या पाण्यातील जलचरांनाही बसत असल्याचा पहिला पुरावा जर्मनीतील संशोधकांना आढळला आहे. जर्मनीतील चार तलावांमध्ये केलेल्या अभ्यासामध्ये सूक्ष्म जलचरांमध्ये संरक्षक प्रणाली विकसित होत असल्याचे दिसून आले आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून, तो सागरी पाण्यामध्ये विरघळण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी सागरी पाण्याची आम्लता वाढण्याचा धोका आहे. त्याचा फटका जलचरांसह सागरी पर्यावरणाला बसणार आहे. गोड्या पाण्यामध्येही अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड विरघळत असल्याचा पहिला पुरावा जर्मनी येथील रुहेर विद्यापीठातील संशोधकांना आढळला आहे. त्याची माहिती ‘करंट बायोलॉजी’ या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. या अभ्यासात गोड्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. जल पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या ताणाला pCO२ (partial pressure of CO२) असा खास शब्द वापरला आहे. कर्बवायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे आम्लतेचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत केवळ सागरी पर्यावरणावर परिणामकारक असल्याचे मानले जात असलेल्या या समस्येमुळे गोड्या पाण्यातील पर्यावरणावरही विपरीत परिणाम दिसून येत असल्याचे लिंडा वैस यांनी सांगितले. वैस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जर्मनीतील चार तलावांतील जलचरांचे निरीक्षण केले आहे. माहितीच्या विश्लेषणासाठी १९८१ ते २०१५ या काळातील कर्बवायूंच्या पाण्यातील प्रमाणाचे विश्लेषण केले आहे.

  • कर्बवायूंचे प्रमाण वाढते, त्या वेळी पाण्याचा सामू कमी होतो. गेल्या ३५ वर्षांमध्ये पाण्याचा सामू ०.३ ने कमी झाला आहे. म्हणजेच गोड्या पाण्याचा आम्लीकरणाचा वेग हा सागरी पाण्यापेक्षा अधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
  • या बदलांचा जलचरातील सूक्ष्म किंवा प्राथमिक जीव मानल्या जाणाऱ्या वॉटर फ्ली (Daphnia)वरील परिणाम तपासण्यात आला. ही प्रजाती तलाव, तळे आणि गोड्या पाण्याच्या साठ्यांमध्ये महत्त्वाची प्रजाती आहे. या जलचरांवर अनेक मोठे जलचर अवलंबून असतात.
  • डेफ्नियामध्ये हेल्मेट आणि टणक कवचांसारख्या संरक्षण प्रणाली विकसित होत असल्याचे आढळले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com