agricultural stories in marathi, agro vision, Root discovery may lead to crops that need less fertilizer | Agrowon

वाटाण्याच्या मुळांतील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांचा घेतला शोध
वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

पिकांची पांढरी मुळे ही खतांच्या शोषणामध्ये मोलाची भूमिका निभावतात. वाटाणावर्गीय पिके ही या मुळ्यांच्या वाढीसाठी द्वितीय मुळांची वाढ काही प्रमाणात मर्यादित करत असल्याचे अमेरिकेमध्ये झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. यामुळे वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यामध्ये आवश्यक असलेला स्फुरदयुक्त खतांचे शोषण अधिक प्रमाणात होण्यास मदत होते. या संशोधनाचा लाभ पीक पैदासकारांना अन्नद्रव्यांची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये अधिक उत्पादकता असलेल्या जातीच्या पैदास करण्यासाठी होऊ शकतो. हे संशोधन ‘प्लॅंट फिजिओलॉजी’च्या जानेवारी महिन्याच्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

पिकांची पांढरी मुळे ही खतांच्या शोषणामध्ये मोलाची भूमिका निभावतात. वाटाणावर्गीय पिके ही या मुळ्यांच्या वाढीसाठी द्वितीय मुळांची वाढ काही प्रमाणात मर्यादित करत असल्याचे अमेरिकेमध्ये झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. यामुळे वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यामध्ये आवश्यक असलेला स्फुरदयुक्त खतांचे शोषण अधिक प्रमाणात होण्यास मदत होते. या संशोधनाचा लाभ पीक पैदासकारांना अन्नद्रव्यांची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये अधिक उत्पादकता असलेल्या जातीच्या पैदास करण्यासाठी होऊ शकतो. हे संशोधन ‘प्लॅंट फिजिओलॉजी’च्या जानेवारी महिन्याच्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

स्फुरदाची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये पिकांच्या सुरवातीच्या मुळाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. या ताणस्थितीमध्ये पिकांची नेमकी अवस्था कशी असते, आणि ती त्याला कशाप्रकारे सामोरी जातात, याविषयी अमेरिकेतील पेन स्टेट युनिव्हर्सिटीतील जोनाथन लिंच लॅबमध्ये वाटाण्यावर प्रयोग करण्यात आले. वाटाण्याच्या मुळाच्या वाढीमध्ये या स्थितीमध्ये काही बदल होत असल्याचे त्यांना आढळले. मुळांची लांबी वाढणे ही प्राथमिक वाढ असे, तर जाडी वाढण्याला द्वितीय वाढ असे संबोधले जाते. स्फुरदाचा ताण असताना वाटाणारोपे ही लांब आणि पातळ मुळे सोडतात. त्याचा फायदा अधिक प्रमाणात स्फुरदाच्या शोषणासाठी होतो. याविषयी माहिती देताना मुख्य संशोधन ख्रिस्तोफर स्ट्रोक यांनी सांगितले, की अडचणीच्या स्थितीला तोंड देण्यासाठी वनस्पतीमध्ये नैसर्गिक संरचना तयार असते. स्फुरदाच्या कमतरतेमध्ये ती कार्यान्वित होते. सध्या जगभरामध्ये मातीमध्ये स्फुरदाची कमतरता असलेल्या जमिनी वाढत आहेत. अशा वेळी स्फुरदाचे योग्य प्रकारे शोषण करण्याची क्षमता पिकांमध्ये अधिक मात्रेमध्ये तयार करण्याची आवश्यकता निर्माण होत आहे. अशा जातींच्या पैदाशीसाठी या क्षमतेमागील नेमक्या यंत्रणेचा शोध घेण्यात येत आहे.

वाटाणा हे पीक विकसनशील देशामध्येही अत्यंत महत्त्वाचे पीक असून, सबसहारण आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथे प्रामुख्याने लागवड केली जाते. मांसाहार न करणाऱ्या लोकांसाठी मानवी आहारातील पोषक घटक आणि प्रथिनांच्या पूर्ततेसाठी ही पिके उपयुक्त ठरतात. हे पीक ज्या विभागात घेतले जाते, त्या विभागातील जमिनी या मुख्यत आम्लधर्मीय आणि स्फुरदाची आत्यंतिक कमतरता असलेल्या आहेत. अशा स्थितीमध्ये उपलब्ध खतांचे शोषण करण्याची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने या संशोधनाला सुरवात झाली.

  • खास स्फुरदाची कमतरता असलेली स्थिती निर्माण करून प्रक्षेत्रामध्ये प्रयोग करण्यात आले. त्याचप्रमाणे संगणकीय प्रारूपाची मदत घेण्यात आली. मुळांचे मोजमाप घेण्यासाठी लेसर अब्लेशन टोमोग्राफी तंत्र वापरले. त्यामुळे प्रतिदिन हजारो मुळांचे नमुने वेगाने तपासणेही शक्य झाले.
  • स्फुरदाच्या ताणस्थितीमध्ये प्राथमिक मुळांच्या वाढीसाठी द्वितीय मुळांच्या वाढीवर मर्यादा येत असल्याचे स्पष्ट दिसून आले.
  • काही रोपांमध्ये हा गुणधर्म लक्षणीय स्वरूपामध्ये आढळला.
  • नव्या वाटाणा जातींच्या निर्मितीसाठी कोलंबिया येथील अमेरिकी कृषी विभाग, होन्डुरास, मोझांबिक, झांबिया आणि मालावी येथील पीक पैदासकारांशी सरळ संपर्क साधण्यात आला आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून विकसनशील देशामध्ये लागवडयोग्य काही जाती तयार करण्यात येत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...