ताज्या घडामोडी
प्राचीन काळापासून माणूस अन्य अनेक प्राण्यांना पाळीव बनविण्याचे प्रयत्न करत आला आहे. त्यातील काही बाबत त्याला यशही आले, तर काही प्राणी मात्र कायमच त्याच्यापासून दूर राहिले. कोळ्यांच्या शरीरातून निघणाऱ्या जाळ्याचे अनेक गुणधर्म मानवासाठी उपयुक्त आहेत. असे जाळे सातत्याने मिळत राहण्यासाठी कोळी पाळण्याचेही विचार भविष्यात माणसांच्या मनामध्ये नक्कीच येणार आहे. अशा वेळी कोळ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. असेच काही प्रयोग मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये सुरू असून, त्या अंतर्गत कोळ्याला विविध लांबी, उंचीवरून उड्या मारून भक्ष्य पकडण्यास प्रेरित केले जाते.

सध्या डॉ. मोस्तफा नाबावे यांनी या अभ्यासामध्ये उडी मारणाऱ्या कोळ्याच्या शरीराच्या विविध रचना आणि सवयी यावर लक्ष केंद्रित केले आहे. या अभ्यासासाठी प्रशिक्षित केलेल्या Phidippus regius प्रजातीच्या कोळ्याचे नाव `कीम` असे ठेवण्यात आले आहे. तो प्रयोगशाळेमध्ये निर्माण केलेल्या विविध पातळी व उंचीवरील प्लॅटफॉर्मवर उड्या मारतो. कोळ्याची वर्तवणूक आणि सवयींचा अभ्यास करण्यासाठी त्रिमितीय सीटी स्कॅन, उच्च दर्जाचा वेगवान व रिझॉल्युशनचा कॅमेरा यांची मदत घेण्यात येत आहे.
कोळ्याची वैशिष्ट्ये ः कोळी प्राणी त्यांच्या शरीराच्या लांबीच्या सहा पटीपेक्षाही मोठी उडी मारू शकतो. (तुलनेसाठी माणूस शरीराच्या लांबीच्या केवळ दीडपट लांब उडी मारू शकतो.) यासाठी पायांद्वारे निर्माण केलेली ताकद ही त्याच्या वजनाच्या पाच पट एवढी प्रचंड असते. या यंत्रणेचा अभ्यास केल्यास त्याचा फायदा लहान आकाराच्या रोबोटच्या निर्मिती करण्यासाठी होणार आहे. हे संशोधन जर्नल नेचर सायंटिफिक रिपोर्टसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
- 1 of 347
- ››