सेन्सरद्वारे तापमान, आर्द्रता, कार्बन डाय-अाॅक्साईड वायूचे प्रमाण मोजणे शक्य
सेन्सरद्वारे तापमान, आर्द्रता, कार्बन डाय-अाॅक्साईड वायूचे प्रमाण मोजणे शक्य

Weather Technology Update : सेन्सरद्वारे तापमान, आर्द्रता, कार्बन डाय-अाॅक्साईड वायूचे प्रमाण मोजणे शक्य

काटेकोर शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत अाहे. यामध्ये विविध प्रकारच्या सेन्सरचाही वापर वाढत अाहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सेन्सरमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असून, त्यांची कार्यक्षमता वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेतील एका कंपनीने वायरलेस सेन्सर विकसित केले आहे. या सेन्सरमुळे वातावरणातील तापमान, आर्द्रता अाणि कार्बन डाय-अाॅक्साईड वायूचे प्रमाण मोजणे शक्य होणार अाहे. त्यामुळे हवामानाच्या अंदाजानुसार हंगामी पिकांचे अचूक व्यवस्थापन करणे शक्य होणार अाहे.

  • या यंत्रामध्ये बेस स्टेशन अाणि वायरलेस सेन्सरचा उपयोग करण्यात अाला अाहे. पिकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेन्सर बसवून सेन्सरद्वारे तापमान, आर्द्रता आणि हवेतील कार्बन डाय-अाॅक्साईडचे प्रमाण मोजले जाते.
  • संकलित माहिती बेसस्टेशनकडून संगणकाकडे पाठविली जाते. माहितीचे सॉफ्टवेअरद्वारे संगणकामध्ये विश्‍लेषण केले जाते.
  • बेस स्टेशनपासून कमीतकमी ३ किमी अंतरावर साधारणपणे १०० सेन्सर्स जोडून वातावरणील तापमान, अार्द्रता अाणि कार्बन डाय-अाॅक्साईड वायूचे प्रमाण मोजता येते. त्यामुळे पिकातील नोंदी साठवून ठेवणे शक्य होते अाणि पिकाचे उत्तम व्यवस्थापन करता येते. अचूक नोंदींमुळे पिकाचा दर्जा आणि उत्पादनामध्ये वाढ मिळवणे शक्य होते.
  • यंत्रणेची वैशिष्ट्ये

  • हे सेन्सर अतिशय कमी ऊर्जेवर चालतात. बॅटरी न बदलता १० वर्षांपर्यत चालू राहतात.
  • यंत्रणा बसविण्यासाठी सोपी अाणि सुटसुटीत असल्यामुळे खर्च जास्त येत नाही.
  • हवामानाच्या कोणत्याही स्थितीमध्ये २४ तास वातावरणातील तापमान, अार्द्रता अाणि कार्बन डाय-अाॅक्सायईड वायूचे प्रमाण अचूकपणे मोजले जाते.
  • वापरण्यासाठी अतिशय सोपे तंत्रज्ञान.
  • अचूक माहितीमुळे शेतीतील नियोजन करणे सोपे होते.
  • वारंवार देखभाल करण्याची आवश्यकता नसते.
  • एकाच सेन्सरद्वारे विविध तीन प्रकारची माहिती उपलब्ध होत असल्याने तीन वेगळी उपकरणे घ्यावी लागत नाहीत.
  • अतिरिक्त खर्च न करता आवश्यकता असेल तेव्हा यंत्रणा इतरत्र हलवता येऊ शकते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com