सेन्सर छोटे, कार्य मोठे!

सेन्सर छोटे, कार्य मोठे!
सेन्सर छोटे, कार्य मोठे!

इटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ बारो अल्दो मोरोमधील इमारतीसाठी लाकूड उत्पादन आणि फळबाग विभागातील प्रा. गियुसेप्पे फेरारा यांनी पुगलिया येथील दोन कंपन्यांच्या विविध सेन्सरयुक्त उत्पादनांच्या डाळिंब आणि द्राक्ष बागेमध्ये प्रत्यक्ष चाचण्या घेतल्या. त्यांच्या वापराचे विश्लेषण केले. त्यातून सिंचनासह व्यवस्थापनातील विविध कामांमध्ये अधिक कार्यक्षमता आणणे शक्य होत असल्याचे दिसून आले. हवामानाच्या अंदाजानुसार, तीव्र वातावरणामध्ये वाढ होत जाण्याच्या शक्यता दिसत आहेत. प्रामुख्याने अधिक काळासाठी दुष्काळी स्थिती, अचानक पाऊस पडल्याने येणारे पूर यांचा फटका शेतीला बसणार आहे. इटलीमध्ये तापमानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून (म्हणजेच सन १८००) २०१७ हे वर्ष दुसऱ्या क्रमांकांचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. त्यातही इटलीमध्ये २०१७ चा वसंत हा सन१८०० पासूनचा सर्वाधिक उष्ण ठरला.

  • काटकोर शेती (प्रिसीजन अॅग्रीकल्चर) तंत्राचा वापर विद्यापीठामध्ये औषधी वनस्पतींच्या शेतीमध्ये केला. त्यानंतर फळबागेमध्ये करण्यात येत आहे. त्यासाठी मातीचा प्रकार, हवामान आणि पिकातील अधिक उत्पादकतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास केला जात आहे. त्यातील प्रत्येक घटकांचे निकष ठरवून, सेन्सरच्या साह्याने लक्ष ठेवले जाते. उदा. मातीमध्ये, पानांमध्ये किंवा फळांवर खास सेन्सरचलित उपकरणे जोडून किंवा ड्रोनद्वारे टेहळणी करता येते. त्यातील प्रॉक्झिमल सेन्सर्स हे आकाराने अत्यंत लहान असून, मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष स्थाननिहाय माहिती वायरलेस पद्धतीने संगणकाला पाठवत राहतात.
  • डेटा लॉगर्स हे सौर ऊर्जेवर चार्जिंग होऊन बॅटरीद्वारे दिवसरात्र चालत राहतात. ते माहिती गोळा करून जोडलेल्या सर्व्हरला पाठवत राहतात. प्रत्यक्ष शेतीतील स्थितीचा अंदाज ऑनलाइन संगणक किंवा मोबाईलवर मिळत राहतो. निकषानुसार त्यांनी अत्युच्च पातळी गाठल्यानंतर त्वरित अॅलर्टही पाठवला जातो. त्यामुळे गरजेनुसार आवश्यक ते उपाय त्वरित करता येतात.
  • सातत्याने येणाऱ्या दुष्काळी स्थितीमध्ये पाणी हे महत्त्वाची मालमत्ता ठरणार आहे. त्यांचा काटेकोरपणे वापर करण्याची आवश्यकता वाढणार आहे. सिंचनाचे प्रमाण ठरवण्यासाठी हवामानातील घटक महत्त्वाचे ठरतात. द्राक्ष आणि डाळिंब बागेतील ओलावा, माती व पीक यांची स्थिती आणि हवामान सांगणारे क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित सेन्सर वापरले आहेत. ते ठिबकच्या इ-मीटरशी जोडलेले असून, आर्द्रतेचे प्रमाण ठरवलेल्या पातळीपेक्षा कमी झाल्यानंतर चालू केले जातात. पुढे योग्य पाणी पातळी झाल्यानंतर ते बंद होतात. प्रत्येक ठिबकमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाणही अचूकतेने मोजले जाते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये सेन्सर्समुळे हेक्टरी सुमारे ३०० ते ४०० घनमीटर पाणी वाचवले जाते.
  • डाळिंब बागेतून उपयुक्तता ः कॅस्टेल्लॅनेटा येथील तेर्झोडिईसी कृषी सोसायटी यांच्या मालकीच्या डाळिंबाच्या बागेमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर केला आहे. ५.७ बाय ३.३ वर लावलेल्या या बागेमध्ये सेन्सर लागले असून, आच्छादन केले आहे. सौर पॅनेलसह ‘डेटा लॉगर्स’ बसवले आहेत. गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या तापमानामध्ये वाढ झाल्याने सिंचनाचे प्रमाण आणि वारंवारिता वाढवावी लागली. पूर्वी या गोष्टी अंदाजाने केल्या जात असून, आता सेन्सरमुळे सिंचनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या बागेमध्ये ‘अॅग्रीडेटालॉग प्लॅटफॉर्म’चा वापर केला होता.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com