agricultural stories in marathi, agro vision, sensors useful for precision farming | Agrowon

सेन्सर छोटे, कार्य मोठे!
वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

इटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ बारो अल्दो मोरोमधील इमारतीसाठी लाकूड उत्पादन आणि फळबाग विभागातील प्रा. गियुसेप्पे फेरारा यांनी पुगलिया येथील दोन कंपन्यांच्या विविध सेन्सरयुक्त उत्पादनांच्या डाळिंब आणि द्राक्ष बागेमध्ये प्रत्यक्ष चाचण्या घेतल्या. त्यांच्या वापराचे विश्लेषण केले. त्यातून सिंचनासह व्यवस्थापनातील विविध कामांमध्ये अधिक कार्यक्षमता आणणे शक्य होत असल्याचे दिसून आले.

इटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ बारो अल्दो मोरोमधील इमारतीसाठी लाकूड उत्पादन आणि फळबाग विभागातील प्रा. गियुसेप्पे फेरारा यांनी पुगलिया येथील दोन कंपन्यांच्या विविध सेन्सरयुक्त उत्पादनांच्या डाळिंब आणि द्राक्ष बागेमध्ये प्रत्यक्ष चाचण्या घेतल्या. त्यांच्या वापराचे विश्लेषण केले. त्यातून सिंचनासह व्यवस्थापनातील विविध कामांमध्ये अधिक कार्यक्षमता आणणे शक्य होत असल्याचे दिसून आले.

हवामानाच्या अंदाजानुसार, तीव्र वातावरणामध्ये वाढ होत जाण्याच्या शक्यता दिसत आहेत. प्रामुख्याने अधिक काळासाठी दुष्काळी स्थिती, अचानक पाऊस पडल्याने येणारे पूर यांचा फटका शेतीला बसणार आहे. इटलीमध्ये तापमानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून (म्हणजेच सन १८००) २०१७ हे वर्ष दुसऱ्या क्रमांकांचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. त्यातही इटलीमध्ये २०१७ चा वसंत हा सन१८०० पासूनचा सर्वाधिक उष्ण ठरला.

  • काटकोर शेती (प्रिसीजन अॅग्रीकल्चर) तंत्राचा वापर विद्यापीठामध्ये औषधी वनस्पतींच्या शेतीमध्ये केला. त्यानंतर फळबागेमध्ये करण्यात येत आहे. त्यासाठी मातीचा प्रकार, हवामान आणि पिकातील अधिक उत्पादकतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास केला जात आहे. त्यातील प्रत्येक घटकांचे निकष ठरवून, सेन्सरच्या साह्याने लक्ष ठेवले जाते. उदा. मातीमध्ये, पानांमध्ये किंवा फळांवर खास सेन्सरचलित उपकरणे जोडून किंवा ड्रोनद्वारे टेहळणी करता येते. त्यातील प्रॉक्झिमल सेन्सर्स हे आकाराने अत्यंत लहान असून, मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष स्थाननिहाय माहिती वायरलेस पद्धतीने संगणकाला पाठवत राहतात.
  • डेटा लॉगर्स हे सौर ऊर्जेवर चार्जिंग होऊन बॅटरीद्वारे दिवसरात्र चालत राहतात. ते माहिती गोळा करून जोडलेल्या सर्व्हरला पाठवत राहतात. प्रत्यक्ष शेतीतील स्थितीचा अंदाज ऑनलाइन संगणक किंवा मोबाईलवर मिळत राहतो. निकषानुसार त्यांनी अत्युच्च पातळी गाठल्यानंतर त्वरित अॅलर्टही पाठवला जातो. त्यामुळे गरजेनुसार आवश्यक ते उपाय त्वरित करता येतात.
  • सातत्याने येणाऱ्या दुष्काळी स्थितीमध्ये पाणी हे महत्त्वाची मालमत्ता ठरणार आहे. त्यांचा काटेकोरपणे वापर करण्याची आवश्यकता वाढणार आहे. सिंचनाचे प्रमाण ठरवण्यासाठी हवामानातील घटक महत्त्वाचे ठरतात. द्राक्ष आणि डाळिंब बागेतील ओलावा, माती व पीक यांची स्थिती आणि हवामान सांगणारे क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित सेन्सर वापरले आहेत. ते ठिबकच्या इ-मीटरशी जोडलेले असून, आर्द्रतेचे प्रमाण ठरवलेल्या पातळीपेक्षा कमी झाल्यानंतर चालू केले जातात. पुढे योग्य पाणी पातळी झाल्यानंतर ते बंद होतात. प्रत्येक ठिबकमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाणही अचूकतेने मोजले जाते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये सेन्सर्समुळे हेक्टरी सुमारे ३०० ते ४०० घनमीटर पाणी वाचवले जाते.

डाळिंब बागेतून उपयुक्तता ः
कॅस्टेल्लॅनेटा येथील तेर्झोडिईसी कृषी सोसायटी यांच्या मालकीच्या डाळिंबाच्या बागेमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर केला आहे. ५.७ बाय ३.३ वर लावलेल्या या बागेमध्ये सेन्सर लागले असून, आच्छादन केले आहे. सौर पॅनेलसह ‘डेटा लॉगर्स’ बसवले आहेत. गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या तापमानामध्ये वाढ झाल्याने सिंचनाचे प्रमाण आणि वारंवारिता वाढवावी लागली. पूर्वी या गोष्टी अंदाजाने केल्या जात असून, आता सेन्सरमुळे सिंचनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या बागेमध्ये ‘अॅग्रीडेटालॉग प्लॅटफॉर्म’चा वापर केला होता.

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...
जलशुद्धीकरणासाठी सूर्यप्रकाशावर आधारीत...सूर्यप्रकाशाच्या साह्याने पाण्याचे शुद्धीकरण...
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
शालेय विद्यार्थी झाले कृषी संशोधकजळगावात जैन हिल्स येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘...
साठवणुकीसाठी प्री फॅब्रिकेटेड गोदाम,...शेतमालाची योग्य गुणवत्ता जपण्यासाठी योग्य साठवणूक...
दिवस-रात्रीच्या तापमान फरकातूनही मिळवता...कमाल आणि किमान तापमानातील बदलाद्वारे विद्युत...
पवनचक्क्यांची झीज कमी करणारे नवे...वातावरणातील विविध घटकांचा परिणाम होऊन...
शहरात व्हर्टिकल फार्मिंग रुजवण्यासाठी...कॅनडामधील लोकल ग्रोस सलाड या स्वयंसेवी संस्थेने...
हवेच्या शुद्धीकरणासाठीही इनडोअर वनस्पती...वाढत्या शहरीकरणासोबतच प्रदूषणाची समस्याही वेगाने...
आंब्यावरील प्रक्रिया अन् साठवणआंबा हा कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही स्वरुपामध्ये...
संजयभाई टिलवा यांनी तयार केले...भुईमुगाच्या शेंगा जमिनीतून काढणीसाठी मजूर मोठ्या...
शेवाळाची शेती हेच ठरेल भविष्यभविष्यामध्ये आहार, जैव इंधन, जागतिक पातळीवरील...
सेन्सर छोटे, कार्य मोठे!इटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ बारो अल्दो मोरोमधील...
आंबा रस आटविण्यासाठी गॅसिफायरकोकणात अजूनही आंबा आटवण्यासाठी चुलीमध्ये लाकडाचा...
कलिंगडापासून विविध पदार्थनिर्मितीउन्हाळ्यामध्ये कलिंगड हे फळ उत्तम मानले जाते....
योग्य पद्धतीने होईल खेकड्यांचे फॅटनिंगखेकड्यांचे फॅटनिंग करण्यासाठी तलावातील संवर्धन,...
सेन्सरद्वारे तापमान, आर्द्रता, कार्बन...काटेकोर शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...
परागीकरण करणारा रोबोजगभरात फळांची मागणी वाढत असल्याने विविध देशांत...
हळकुंडावरील प्रक्रियेसाठी यंत्रेकोणत्याही भारतीय स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर होत...