agricultural stories in marathi, agro vision, sleeping sickness in cattle | Agrowon

तीव्र गंधाच्या कॉलरद्वारे जनावरातील रोगाला प्रतिबंध शक्य
वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

आफ्रिकेमध्ये त्से त्से माशीमुळे गायींमध्येही स्लिपिंग सिकनेस या रोगाचा प्रसार होतो. या रोगामुळे प्रतिवर्ष ४.६ अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान होते. या माश्यांना जनावरांपासून दूर ठेवण्यासाठी वॉटर बक (अॅन्टेलुप) या प्राण्यातील तीव्र गंधाचा वापर बॉन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या नावीन्यपूर्ण कल्पनेमुळे कमी खर्चात जनावरांचे रोगापासून ८० टक्क्यापर्यंत संरक्षण होते. हे संशोधन ‘प्लॉस निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसिजेस’मध्ये प्रकाशित केले आहे.

आफ्रिकेमध्ये त्से त्से माशीमुळे गायींमध्येही स्लिपिंग सिकनेस या रोगाचा प्रसार होतो. या रोगामुळे प्रतिवर्ष ४.६ अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान होते. या माश्यांना जनावरांपासून दूर ठेवण्यासाठी वॉटर बक (अॅन्टेलुप) या प्राण्यातील तीव्र गंधाचा वापर बॉन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या नावीन्यपूर्ण कल्पनेमुळे कमी खर्चात जनावरांचे रोगापासून ८० टक्क्यापर्यंत संरक्षण होते. हे संशोधन ‘प्लॉस निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसिजेस’मध्ये प्रकाशित केले आहे.

त्से त्से माश्यांमुळे पसरणाऱ्या स्लिपिंग सिकनेस (झोपाळूपणा) या रोगाचा प्रादुर्भाव माणसांप्रमाणे जनावरांमध्येही होतो. त्यामुळे दूध, मांसउत्पादनमध्ये मोठी घट होते. त्यावर मात करण्यासाठी जागतिक पातळीवरील संशोधक प्रयत्न करीत आहेत. आफ्रिकेमध्ये हरणांप्रमाणे गवत खाणाऱ्या हरणांच्या प्रजातीतील वॉटर बक या प्राण्यांच्या शरीराला येणाऱ्या तीव्र गंधामुळे त्से त्से माश्‍या त्यांच्यापासून दूर राहत असल्याचे बॉन विद्यापीठातील डॉ. ख्रिस्टीन बोर्गमेईस्टर व त्यांच्या सहकाऱ्यांना दिसून आले. या प्राण्यांतील गंध वेगळा करून गायींच्या गळ्यातील कॉलरमध्ये प्लॅस्टिकच्या कुपीमध्ये त्याचा वापर केला. त्यामुळे त्से त्से माश्‍या जनावरांना चावत नाही. परिणामी जनावरांतील स्लिपिंग सिकनेसचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य होऊ शकते.

चाचणी व निष्कर्ष ः

  • या पद्धतीच्या चाचण्या केनियातील १२० मसाई कळपधारकांच्या ११०० पेक्षा अधिक गायींवर करण्यात आला.
  • दोन वर्षांसाठी झालेल्या चाचणीमध्ये कॉलर वापरलेल्या जनावरांच्या तुलनेमध्ये अन्य जनावरांमध्ये विषाणूजन्य रोगाचे प्रमाण ८० टक्क्यांनी जास्त होते.
  • कॉलर असलेली जनावरे आरोग्यपूर्ण, अधिक वजनाची आणि अधिक दूध देणारी राहिली. परिणामी त्यांचा बाजारामध्ये चांगला दर मिळाला.
  • कॉलर पद्धती ही कमी खर्चाची असून, सर्वसामान्य पशुपालकांना परवडणारी आहे. त्यामुळे मसाई पशुपालकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढत आहे.

काय आहे स्लिपिंग सिकनेस
त्से त्से माश्‍या माणसांसह जनावरांच्या रक्तावर उदरनिर्वाह करतात. त्यामुळे स्लिपिंग सिकनेस या रोगाचा प्रसार होतो. माणसामध्ये तीव्र प्रादुर्भावामुळे मज्जा संस्थेची हानी होते; तसेच शेवटच्या टप्प्यामध्ये माणूस किंवा जनावरांमध्ये काही शक्ती राहत नाही. ती केवळ झोपून राहत असल्याने स्लिपिंग सिकनेस असे नाव मिळाले आहे. या रोगाचा धोका आफ्रिकेतील अनेक लोकाबरोबर जनावरांनाही आहे.

इतर कृषिपूरक
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....
जनावरांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वेजीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जनावरांचे स्वास्थ्य...
तापमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात...उन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत...
जनावरांतील उष्माघाताची कारणे, लक्षणे,...वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजारजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व...
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा...जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या...जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे...
नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त...
अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा...चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची...
संवर्धन खिलार गोवंशाचे...जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार,...शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे...
झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...
जनावरांच्या संतुलित आहार...जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो...
जनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना...महाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते...
कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबी...कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत...