शहरात जगण्यासाठी शिकताहेत हुशार प्राणी !

शहरात जगण्यासाठी शिकताहेत हुशार प्राणी
शहरात जगण्यासाठी शिकताहेत हुशार प्राणी

शहरामध्ये राहण्यासाठी आवश्यक त्या बाबी अनेक प्राणी शिकत असून, भविष्यामध्ये या प्राण्यांसोबत मानवांचा संघर्ष वाढण्याची शक्यता युनिव्हर्सिटी ऑफ व्योमिंग येथील संशोधकांनी व्यक्त केली आहे. माणसांची वस्ती जंगल परिसरामध्ये वाढत असून, वाढत्या शेतीक्षेत्रामुळे जंगली प्राण्याचे रहिवासक्षेत्र कमी होत आहे. अशा स्थितीमध्ये माणूस आणि जंगली प्राण्यांतील संघर्ष वाढत जाण्याची शक्यता आहे. माकडांसारख्या अनेक हुशार प्राण्यांनी माणसांसह शहरामध्ये जगण्याच्या विविध पद्धती शिकून घेतल्याचे दिसून येत आहे. याबाबत लिसा पी. बॅरेट, लॉरेन स्टॅंटन आणि साराह बेन्सन- अॅमराम यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल अॅनिमल बिव्हेवियर मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. माणसांशी जंगली प्राण्याचा संघर्ष वाढत जाणार आहे. आजही ग्रामीण भागामध्ये जंगली प्राण्यांचा वावर आढळून येतो. आता तो शहरी भागातही वाढत जाणार आहे. नव्या रहिवासामध्ये जगण्यासाठी आवश्यक त्या बाबी हे प्राणी शिकत आहे. विविध समस्या सोडवणे, स्मरणशक्ती, वर्तनामधील लवचिकता यामुळे ते यशस्वी होताना दिसत आहे.

  • जंगली हत्तींनी विद्युत कुंपण लाकडांच्या साह्याने उदध्वस्त केल्याचे आढळले आहे. ही क्रिया एकदाच किंवा योगायोगाने नव्हे, तर अनेकवेळा घडल्याने हत्तींनी कुंपने ओलांडण्याची पद्धत तयार केल्याचे लक्षात आले.  
  • कावळा आपल्या स्मरणशक्तीद्वारे खाद्यपदार्थ उपलब्ध होण्याची शक्यता असलेली ठिकाणे लक्षात ठेऊ शकतो.
  • माकडे शेत, घरे आणि शॉपमधून आवश्यक तो पदार्थ न घाबरता पळवून नेतात.  
  • न्युझीलॅंड येथील रकून आणि क्ली नावाचे पोपट पक्ष्यांनी उघडू नये, म्हणून तयार केलेल्या कचरा पेट्याही उघडण्याची कला शिकल्याचे आढळले.
  • या विरुद्ध कोयोटीज या कोल्ह्याच्या जातीने शहरातही माणसापासून दूर राहण्याची पद्धत स्वीकारली आहे. ते माणसे नसलेल्या मोकळ्या रस्त्यावरून रात्री फिरून अन्न शोधतात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com