agricultural stories in marathi, agro vision, sorghum- ground nut intercrop fertiliser | Agrowon

ज्वारी - भुईमुग आंतरपिकासाठी खताचे नियोजन झाले सोपे
वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

आफ्रिकेच्या काही भागामध्ये शेतकरी ज्वारीमध्ये भुईमुगाचे आंतरपिक घेतात. मात्र, या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी आवश्यकत माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. निगर, माली आणि अमेरिकेतील संशोधकांनी प्रामुख्याने आंतरपीक पद्धतीमध्ये खतांचे नियोजन करण्यासंदर्भातप्रयोग केले असून, खास गणिती सूत्र बनवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार खतांचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. हे संशोधन ‘अॅग्रोनॉमी जर्नल’ मध्ये प्रकाशित झाले आहे.

आफ्रिकेच्या काही भागामध्ये शेतकरी ज्वारीमध्ये भुईमुगाचे आंतरपिक घेतात. मात्र, या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी आवश्यकत माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. निगर, माली आणि अमेरिकेतील संशोधकांनी प्रामुख्याने आंतरपीक पद्धतीमध्ये खतांचे नियोजन करण्यासंदर्भातप्रयोग केले असून, खास गणिती सूत्र बनवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार खतांचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. हे संशोधन ‘अॅग्रोनॉमी जर्नल’ मध्ये प्रकाशित झाले आहे.

आंतरपीक पद्धतीसाठी योग्य त्या शिफारशी देण्यासाठी निगर, माली आणि अमेरिकेतील संशोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्यक्ष उत्पादन आणि माहिती यातील फरक कमी करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्याविषयी माहिती देताना युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का-लिंकन येथील कृषीविद्या तज्ज्ञ चार्ल्स वॉर्टमॅन यांनी आंतरपिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी खतांचे योग्य प्रमाण काढण्यासाठी गणिती सूत्र तयार केले आहे. यामध्ये स्थानिक माहितीचा समावेश करण्यात आल्याने अचूकता मिळते. योग्य प्रमाणात खतांचा वापर केल्याने खर्चामध्ये बचतही साधते. अशा प्रकारचे संशोधन यापू्र्वी भात आणि मका या एकल पिकांसाठी झाले होते. चार्ल्स वॉर्टमॅन यांनी सांगितले, की पिकाची उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा योग्य प्रमाणात वापर करण्याची आवश्यकता असते. यात अन्नसुरक्षेसोबत गरिबीचे दुष्टचक्र भेदण्याचीही क्षमता आहे.

  • माली आणि निगर भागातील साहेल प्रांतामध्ये ज्वारी हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकांचा खतासाठीचा प्रतिसाह मोजण्यात आला. हा भाग कमी पावसाचा असून, वालुकामय जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची कमतरताही असते. तीव्र उष्ण वातावरणामुळे पिकावरील ताणांचे प्रमाण अधिक असते.
  • नत्र, स्फुरद आणि पालाश यासारख्या पोषक घटकांचे ज्वारी पिकावरील परिणाम तपासण्यात आले. त्याचप्रमाणे ज्वारीमध्ये भुईमुगाचे आंतरपीक असतानाही प्रयोग करण्यात आले.
  • कोरडवाहू स्थितीमध्येही ज्वारी हे पीक चांगले तग धरते. ज्वारी पिकापासून मिळणारे धान्य व कडबा माणसांसह पशुधनाच्या अन्नसुरक्षेसाठी फायद्याचे आहेत. त्याच प्रकारे भुईमुग हे तेलबिया पीक ही त्यांची प्रथिनांची गरज चांगल्या प्रकारे भागवू शकते.
  • एकपीक पद्धतीच्या तुलनेमध्ये आंतरपीक पद्धतीतील उत्पादनामध्ये काही प्रमाणात घट येत असली तरी दोन्ही पिकांच्या एकत्रित उत्पादनामध्ये वाढ होते.
  • एकल पीक पद्धतीमध्ये कीड रोग किंवा अन्य कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीचा धोका अधिक असतो. तो आंतरपीक पद्धतीमुळे कमी होतो. एखाद्या पिकाचे नुकसान झाले तरी अन्य पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातील फरक कमी होतो.

 

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...