agricultural stories in marathi, agro vision, Species hitch a ride on birds and the wind to join green roof communities | Agrowon

सूक्ष्मजीव होतात वाऱ्यासह पक्ष्यांवर स्वार !
वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मातीतील विविध जिवाणू, बुरश्या आणि कोळी यांच्या छतावरील हिरवळीपर्यंतच्या प्रवासासाठी पक्षी आणि वारा महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले आहे. थोडक्यात, सूक्ष्मजीव आपल्या प्रवासासाठी वाऱ्यासह पक्ष्यांवर स्वार होऊन मार्गक्रमण करतात. यातून छतावरील हिरवळीमध्ये जैवविविधता निर्माण होण्यास मदत होते.

मातीतील विविध जिवाणू, बुरश्या आणि कोळी यांच्या छतावरील हिरवळीपर्यंतच्या प्रवासासाठी पक्षी आणि वारा महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले आहे. थोडक्यात, सूक्ष्मजीव आपल्या प्रवासासाठी वाऱ्यासह पक्ष्यांवर स्वार होऊन मार्गक्रमण करतात. यातून छतावरील हिरवळीमध्ये जैवविविधता निर्माण होण्यास मदत होते.

कृत्रिमरीत्या छतावर हिरवळ फुलवण्याचे प्रयत्न माणसांकडून सातत्याने होत असतात. त्यामध्ये विविध कोळी, किडी, जिवाणू आणि बुरश्या येतात. वस्तूतः सुरवातीला संपूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेले असूनही, ही जैवविविधता निर्माण होते. त्याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टस्माउथ येथील डॉ. हिथर रंबल आणि लंडन विद्यापीठातील डॉ. पॉल फिंच आणि अॅलन गॅंगे यांनी रॉयल होलोवे येथील छतावरील हिरवळीचा सप्टेंबर २०११ ते जुलै २०१२ या काळात अभ्यास केला.

छतावरील हिरवळ किंवा जिवंत भिंती हे प्रकार म्हणजे संपूर्ण मानवनिर्मित पर्यावरण असते. पर्यावरणाच्या शाश्‍वतेसाठी त्यांची आवश्‍यकता असली तरी माणसांकडून कोणत्या प्रकारच्या बुरश्‍या, जिवाणू यांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. अशा स्थितीमध्ये निसर्ग आपल्या पद्धतीने मार्ग काढत असल्याचे दिसून आले. अशा सूक्ष्मजिवांच्या समुदायाचा प्रवास पक्षी, वाऱ्यांचे प्रवाह यांच्या मार्फत होत असल्याचे आढळले. अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल ॲप्लाइड सॉइल इकॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...