agricultural stories in marathi, agro vision, starvation of fungi is new tool for control | Agrowon

बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्र ठरेल फायदेशीर
वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

बुरशींची वाढ व प्रसारासाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या अन्नद्रव्याचा पुरवठा रोखण्याचा नवा मार्ग वेस्टमीड इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च येथील संशोधकांनी ओळखला आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे १.६ दशलक्ष लोकांमध्ये होणारा बुरशींचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होऊ शकेल, असा दावा केला आहे.

बुरशींची वाढ व प्रसारासाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या अन्नद्रव्याचा पुरवठा रोखण्याचा नवा मार्ग वेस्टमीड इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च येथील संशोधकांनी ओळखला आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे १.६ दशलक्ष लोकांमध्ये होणारा बुरशींचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होऊ शकेल, असा दावा केला आहे.

बुरशीजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा ट्युबरक्युलोसीस इतकाच असून, मलेरियाद्वारे होणाऱ्या मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. सध्या जी बुरशी विरोधी औषधे वापरली जातात, ती अधिक विषारी आहेत. तसेच त्याचा शरीरामध्ये शोषले जाण्याचा वेगही कमी असून, परिणामकारकता कमी आहे. त्याचप्रमाणे औषधांसाठी निर्माण होणारी प्रतिकारकता ही नवी समस्या उद्भवत आहे. वनस्पतींच्या वाढीसाठी ज्याप्रमाणे विविध अन्नद्रव्यांची आवश्यकता असते, तसेच बुरशींच्या वाढीसाठी काही अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. माणसांमध्ये फॉस्फेटचे प्रमाण अधिक असूनही त्याचे शोषण बुरशींना योग्य प्रकारे करता येत नसल्याचे संशोधनामध्ये आढळले आहे. त्यामुळे अधिक फॉस्फेटच्या शोषणासाठी बुरशींना अधिक वाहक तयार करावे लागतात. या प्रक्रियेला फॉस्फेट स्टार्वेशन रिस्पॉन्स असे म्हणतात. ही वाहक तयार करण्याची प्रक्रिया रोखणे शक्य झाल्यास बुरशींची वाढ रोखता येईल, असा कयास संशोधकांनी बांधला. त्याचे उंदरावर केलेले प्रयोग यशस्वी झाले असून, उंदरातील बुरशींचा प्रसार रोखणे शक्य झाले आहे. याविषयी माहिती देताना मुख्य संशोधिका आणि सहायक प्रो. ज्युलियाने डिजोर्डजेविक यांनी सांगितले, की या नव्या तंत्रावर आधारीत बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखणाऱ्या औषधांची निर्मिती करता येईल. हे तंत्र सुरक्षित आणि वेगवान ठरू शकेल.

प्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर

  • जागतिक पातळीवर बुरशीजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी नव्या उपचार पद्धती आणि औषधांचा विकास होण्याची आवश्यकता संशोधक व्यक्त करत असले तरी १९८६ पासून औषधांचा नवा एकही गट विकसित झालेला दिसत नाही. जर आपण बुरशींचा अन्न पुरवठा तिचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच रोखू शकलो, तर ती नवी परिणामकारक पद्धती ठरू शकते. याचा फायदा प्रतिकार शक्ती कमी झालेल्या रुग्णांसाठी (उदा. एचआयव्ही बाधित, ल्युकेमियाग्रस्त) फायदेशीर ठरू शकते. याचा फायदा अवयवांचे पुनर्रोपण केलेल्या व अधिक काळ प्रतिकारकता रोखून ठेवण्यासाठी उपचार घ्याव्या लागणाऱ्या रुग्णांनाही होणार असल्याचे ज्युलियाने यांनी सांगितले.
  • संशोधिका डॉ. सोफी लेव्ह म्हणाल्या, की फॉस्फेटच्या भुकेसाठीची बुरशीतील प्रतिक्रिया ही पुढे शर्करा आणि अमिनो आम्लासारख्या अन्य पोषक घटकांसाठीही विस्तारता येईल. सध्या फॉस्फेटचे वाहक हे मानवी पीएचमध्ये योग्यरीत्या काम करू शकत नसल्याचे आढळले आहे. या घटकांचा विचार केल्यास बुरशींना उपाशी ठेवणे शक्य होऊ शकते.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...