agricultural stories in marathi, agro vision, The stick insects that survive being eaten by birds | Agrowon

पक्ष्यांकडून खाल्ले जाऊनही कीटकांचा होतो प्रसार
वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

वाळलेल्या काटकीप्रमाणे शरीर असलेले
स्टिक कीटक हे फार दूरवर प्रवास करू शकत नसले तरी त्यांच्या प्रजाती जगभरामध्ये कशा आढळतात, याचा वेध घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे. पक्ष्यांनी त्यांचा फडशा पाडूनही त्यांच्या पोटातील अंडी पक्ष्याद्वारे दूरपर्यंत जात असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.

वाळलेल्या काटकीप्रमाणे शरीर असलेले
स्टिक कीटक हे फार दूरवर प्रवास करू शकत नसले तरी त्यांच्या प्रजाती जगभरामध्ये कशा आढळतात, याचा वेध घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे. पक्ष्यांनी त्यांचा फडशा पाडूनही त्यांच्या पोटातील अंडी पक्ष्याद्वारे दूरपर्यंत जात असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.

पक्षी ही कीटक नियंत्रणातील महत्त्वाची नैसर्गिक साखळी आहे. सामान्यतः पक्ष्यांनी कीटक खाल्ल्यामुळे ते आणि त्यांची पुढील पिढी संपून जात असल्याचे मानले जाते. मात्र, पक्ष्यांनी खालेल्या कीटकांची अंडी न पचल्यास व ती विष्ठेवाटे बाहेर पडत असल्यास नेमके काय घडते, याचा अभ्यास कोबे विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. विशेषतः ज्या कीटकांची अंडी टणक कवचाची असतात, ती पक्ष्यांच्या शरीरात न पचता तशीच बाहेर पडतात. पुढील टप्प्यामध्ये योग्य हवामान मिळाल्याने त्यांती उबवण होते. कोबे विद्यापीठातील सहायक प्रा. केन्जी स्युत्सुगू, कात्सुरो इटो (कोची विद्यापीठ) आणि ताकेशी योकोयामा (टोकियो विद्यापीठ) या संशोधकांनी या गृहितकावर आधारीत संशोधन व निरीक्षणे करण्यास सुरवात केली. त्यांनी त्यासाठी वाळलेल्या काटकीप्रमाणे शरीर असलेल्या कीटकाची (स्टिक इन्सेक्ट) निवड केली. हे कीटक फार दूर अंतरापर्यंत प्रवास करू शकत नाहीत. मात्र, त्यांना खाणाऱ्या पक्ष्यांच्या मार्फत वेगळे खाद्य रहिवासापर्यंत पोचणे शक्य होत असल्याचे दिसून आले. संशोधनाचे निष्कर्ष ‘इकॉलॉजी’ या ऑनलाइन संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.  

वनस्पती स्वतः प्रवास करू शकत नसल्या तरी त्यांच्या बिया विविध मार्गाने दूरपर्यंत पोचतात. त्यातील एक मार्ग म्हणजे प्राणी किंवा पक्ष्यांच्या फळे खाण्यानंतर न पचता त्या विष्ठेमार्गे दूरपर्यंत पोचतात. पक्ष्यांसाठी कीटक हा महत्त्वाचा खाद्य स्रोत आहे. त्यामुळे न पचलेली अंडी अशीच दूरपर्यंत पोचू शकतात. त्यातून विविध स्थिती उत्पन्न होऊ शकतात.

  1. कीटकांच्या अंड्याचे कवच अधिक टणक असणे. स्टिक कीटकाची अंडी अशीच असतात.
  2. फलित न होता अंड्याची उबवण होण्याची क्षमता असणे. स्टिक कीटक ही प्रजाती parthenogenic या गटात मोडत असल्याने या कीटकाची मादी फलित न होताही अनेक अंडी घालू शकते. जमिनीवर पसरलेल्या स्वरूपामध्ये घातलेली अंडी उबल्यानंतर त्यातून निघणारी पिल्ले स्वतःचे अन्न शोधण्यास बाहेर पडतात.
  3. अंडी घालण्याच्या केवळ काही क्षण आधीच अंडी पक्व होणे, त्यासाठी वीर्य हे त्याच वाटेवर उपलब्ध असणे.

तपकिरी कानाची बुलबुल हा पक्षी स्टिक कीटकांना खाण्यामध्ये निष्णात आहे. संशोधकांनी स्टिक कीटकाच्या तीन प्रजातीची अंडी मुद्दाम खाण्यास दिली. त्यातील ५ आणि २० टक्के अंडी कोणतीही हानी न होता विष्ठेवाटे बाहेर आली. त्यातील एका प्रजातीची अंडी त्यानंतरही उबत असल्याचे दिसून आले. या प्रजातीवर अधिक अभ्यासासाठी लक्ष केंद्रित केले. प्रौढ स्टिक कीटक हे सातत्याने पक्ष्याकडून खाल्ले जातात. अशा मादीच्या शरीरातील अंडीही पक्ष्याच्या पचनसंस्थेत जातात. मात्र, त्याच्या टणक कवचामुळे न पचता बाहेर पडतात. हा कीटकांच्या प्रसाराचा एक उत्तम मार्ग असल्याचे संशोधकांना आढळले.

पुढील संशोधनामध्ये स्टिक कीटकाच्या जनुकीय विश्लेषण करून पक्ष्यांच्या स्थलांतराचा मार्गावरील स्टिक कीटकांशी जुळवून पाहण्यात येणार आहे. कारण हे कीटक
अस्पर्श अशा बेटांवरही आढळले आहेत. अत्यंत कमी प्रवास करणाऱ्या सजीवांच्या सर्व जगभर प्रजाती कशा सापडतात, या प्रश्नाचे उत्तर डार्विनच्या सिद्धांतानुसार देण्यामध्ये अडचणी येत होत्या.

इतर ताज्या घडामोडी
भाजपत दोघांचीच मनमानी : यशवंत सिन्हापुणे : सध्या लोकशाही धोक्यात आणणा-या भाजपची घमेंड...
सरकार स्थापनेनंतर लगेचच शेतकऱ्यांना...नवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे...
शाश्वत भविष्यासाठी अन्न पद्धतीमध्ये...सन २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या सुमारे १० अब्ज...
परभणीत प्रतिटन २२०० रुपये ऊसदरासाठी ‘...परभणी ः गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याने गेल्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत 'शेतीमाल तारण'...नांदेड ः शेतीमाल तारण योजनेअंतर्गत नांदेड, परभणी...
कोल्हापूर जिल्ह्यात लाळ्या खुरकूतचा...कोल्हापूर : जिल्ह्यात लाळ्या खुरकूत रोगाने थैमान...
औरंगाबादेत गटशेती संघाचे पहिले विभागीय...औरंगाबाद : ‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी...
शेतकरीप्रश्‍नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...टाकळी राजेराय, जि. औरंगाबाद ः सध्या असलेल्या...
जळगाव जिल्ह्यातील वाळूठेक्‍यांवरील बंदी...जळगाव : नागपूर खंडपीठाने स्थगिती उठविल्याने...
गाळपेराची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा नाशिक : नाशिक जिल्ह्यात जूनपर्यंत पुरेल एवढा चारा...
निकम समितीचा अहवाल बाहेर निघण्याची...पुणे  : जलयुक्त शिवार योजनेत कृषी विभागाने...
मराठा जातप्रमाणपत्र वितरणातील संभ्रम...पुणे  : मराठा समाजाला शासकीय जातप्रमाणपत्र...
शेतकरी संघटना अधिवेशन : 'निसर्ग कमी, पण...शिर्डी, जि. नगर  : पोळ्यापासून पाऊस नाही,...
जमीन अधिग्रहणाविरोधात...कोल्हापूर  : रत्नागिरी-नागपूर व विजापूर-...
घटनादुरुस्तीनंतरचे कायदे शेतकऱ्यांसाठी...शिर्डी, जि. नगर  ः शेतकऱ्यांसंबंधी केलेले...
तीन हजार कोटी खर्चूनही बेंबळा प्रकल्प...यवतमाळ   ः चार तालुक्‍यांतील शेतीसाठी वरदान...
अकोट बाजारात कापसाला ५८०० रुपयांपर्यंत...अकोला  ः वऱ्हाडातील कापसाची प्रमुख बाजारपेठ...
नगर जिल्ह्यात ३८ हजार हेक्‍टरवर कांदा...नगर   ः जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळी...
फूल प्रक्रियेसाठी उद्योग उभारण्याची गरज...पुणे   ः पांरपरिक शेतीमधून शेतकऱ्यांचे...
कळमणा बाजारात गहू प्रतिक्‍विंटल २५०० ते...नागपूर ः नागपूर बाजार समितीत मंगळवारी (ता. ११)...