agricultural stories in marathi, agro vision, Tomatoes of the same quality as normal, but using only half the water | Agrowon

अर्ध्या पाण्यामध्येच घेता येईल चेरी टोमॅटोचे उत्पादन
वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

चेरी टोमॅटोसारख्या पिकामध्ये सिंचनाचे प्रमाण अर्ध्याइतके कमी करूनही पिकाचा दर्जा, पोषकता टिकवणेच नव्हे तर वाढवणेही शक्य असल्याचे सेव्हिले विद्यापीठातील संशोधनामध्ये दिसून आले आहे. या टोमॅटोतील कॅरोटिनॉइड संयुगांची पातळीही वाढल्याने प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्तता वाढणार आहे. थोडक्यात नैसर्गिक रंग, अ जीवनसत्त्वाचे अधिक प्रमाण आरोग्यासाठी आणि प्रसाधनासाठी फायद्याचे राहणार आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष ‘फूड केमिस्ट्री’ या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

चेरी टोमॅटोसारख्या पिकामध्ये सिंचनाचे प्रमाण अर्ध्याइतके कमी करूनही पिकाचा दर्जा, पोषकता टिकवणेच नव्हे तर वाढवणेही शक्य असल्याचे सेव्हिले विद्यापीठातील संशोधनामध्ये दिसून आले आहे. या टोमॅटोतील कॅरोटिनॉइड संयुगांची पातळीही वाढल्याने प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्तता वाढणार आहे. थोडक्यात नैसर्गिक रंग, अ जीवनसत्त्वाचे अधिक प्रमाण आरोग्यासाठी आणि प्रसाधनासाठी फायद्याचे राहणार आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष ‘फूड केमिस्ट्री’ या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

स्पेन येथील सेव्हिले विद्यापीठामध्ये तीन वर्षांपासून चेरी टोमॅटोच्या दोन जाती व अन्य दोन प्रकारच्या विशेषतः शरद आणि वसंत अशा दोन्ही ऋतूंमध्ये घेता येऊ शकणाऱ्या जातींचेही विश्लेषण करण्यात आले. पिकाच्या वाढीच्या काही टप्प्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास उत्पादनाला मोठा फटका बसतो. अशा संवेदनशील अवस्था वगळून अन्य काटक अवस्थामध्ये पाण्याचे प्रमाण नियंत्रितपणे कमी करण्यात आले.  त्याविषयी माहिती देताना अॅग्रोफॉरेस्ट्रीचे मिरिया कॉरेल यांनी सांगितले, की पिकातील पाण्याचे प्रमाण ठरवून अर्ध्यापर्यंत आणण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, पिकांच्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी पाण्याचे किमान प्रमाण काढण्याचे या संशोधनाचे उद्दिष्ट होते. त्यात पिकांची गरज, आवश्यकता आणि त्यावर येणाऱ्या व सहन होऊ शकणाऱ्या ताणाचे प्रमाण यावर काम करण्यात आले.

  • पाणी आणि ऊर्जा यांचा वापर किमान पातळीवर करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्याच वेळी ग्राहकांना अधिक पोषक आणि पर्यावरणपूरक उत्पादने मिळणेही आवश्यक आहे. या दोन्ही आवश्यकतांचा मेळ घालण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे सेव्हिले विद्यापीठातील औषधशास्त्र विभागातील संशोधक अॅन्टोनियो जे. मेलेन्डेज यांनी सांगितले. ते कॅरेटिनॉइड घटकांचा विविध अन्नपदार्थांतील वापर आणि आरोग्य या विषयातील प्रगत संशोधन युरोपीय संशोधक गटांसह करत आहेत.
  • याच तंत्राचा वापर ऑलिव्ह, बदाम अशा फळपिकामध्येही करणे शक्य आहे.

कॅरोटिनॉइड काय आहे

  • कॅरोटिनॉइड ही संयुगे बहुगुणी असून, त्याचे शेती, अन्न, पोषकता, आरोग्य, प्रसाधने यासह अन्य अनेक उपयोग आहेत. माणसाच्या आहारासह पशुखाद्यामध्येही त्यांचा वापर वाढत आहे.
  • अन्य अनेक संशोधनामध्ये कॅरोटिनॉइड घटकांच्या आहारातील वापरामुळे हृदयरोग आणि कर्करोगावरील उपचारामध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभअकोला ः शासनाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या डॉ....
जळगावसह रावेर मतदारसंघ भाजपकडेच?जळगाव ः आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना व...
किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना...धुळे  : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी...
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...