agricultural stories in marathi, agro vision, UK map of air pollution provides insights into nitrogen dioxide levels | Agrowon

इंग्लंडमधील प्रदूषणाचे अचूक नकाशे केले तयार
वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

हवेचे प्रदूषण काही केवळ भारतीय उपखंडातील समस्या राहिलेली नाही. ती इंग्लंडसारख्या विकसित देशातही तितक्याच तीव्रतेने जाणवत आहे. लेईसिस्टर विद्यापीठातील संशोधकांनी हवेमध्ये होणारे प्रदूषण प्रामुख्याने नायट्रोजन डाय ऑक्साईडच्या प्रमाणात झालेल्या बदलांचा अभ्यास केला आहे. या बदलत्या प्रमाणाचे नकाशे तयार करण्यात आले असून, त्यासाठी लेईसिस्टर विद्यापीठ आणि ‘अर्थ सेन्स’ यांनी एकत्रितरीत्या हवाई नकाशे बनविणाऱ्या ‘ब्लुस्काय’ या कंपनीसोबत काम केले आहे.

हवेचे प्रदूषण काही केवळ भारतीय उपखंडातील समस्या राहिलेली नाही. ती इंग्लंडसारख्या विकसित देशातही तितक्याच तीव्रतेने जाणवत आहे. लेईसिस्टर विद्यापीठातील संशोधकांनी हवेमध्ये होणारे प्रदूषण प्रामुख्याने नायट्रोजन डाय ऑक्साईडच्या प्रमाणात झालेल्या बदलांचा अभ्यास केला आहे. या बदलत्या प्रमाणाचे नकाशे तयार करण्यात आले असून, त्यासाठी लेईसिस्टर विद्यापीठ आणि ‘अर्थ सेन्स’ यांनी एकत्रितरीत्या हवाई नकाशे बनविणाऱ्या ‘ब्लुस्काय’ या कंपनीसोबत काम केले आहे.

शेतीमध्ये नत्रयुक्त खतांच्या अतिरिक्त वापरामुळे हवेतील नायट्रोजन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. औद्योगिकीकरण व वाहनाद्वारे होणारे प्रदूषण यांचीही समस्या मोठी आहे. उपग्रहाद्वारे मिळालेल्या हवेच्या गुणवत्तेविषयीच्या माहितीची सांगड अर्थ सेन्स या माहितीसाठ्याशी घालून, त्यातून उच्च प्रतिचे नकाशे मिळविण्यात आले आहेत. संपूर्ण इंग्लंडमधील १०० मीटर रिझॉल्युशन क्षमतेचे हे नकाशे आहेत. त्याविषयी माहिती देताना अर्थ सेन्स सिस्टिम्सचे व्यवस्थापकीय संचालक जेम्स इड्डी यांनी सांगितले, की हवेच्या प्रदूषणाची समस्या जगभरात सर्व देशांमध्ये जाणवत आहे; मात्र प्रदूषणाचे नेमके प्रमाण व स्थान याविषयी माहितीची उपलब्धता नाही. त्यामुळे या समस्येवर उपाययोजना करण्यामध्ये अडचणी येतात. मॅप एअरद्वारे देशातील प्रत्येक रस्त्यावरील परिस्थितीची माहिती उपलब्ध होऊ शकेल.

  • यासाठी उपग्रहाद्वारे आणि कंपनीचे स्वतःच्या सेन्सरद्वारे घेतलेल्या नोंदीचे एकत्रिकरण केले जाते.
  • २०१७ वर्षाच्या अखेरपर्यंत अर्थ सेन्सद्वारे पीएम २.५ क्षमतेचे नकाशे (प्रदूषक घटकांचा आकार २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी असलेल्या) तयार करण्यात येत आहेत.
  • भविष्यामध्ये प्रदूषणाचे नेमके प्रमाण लक्षात घेऊन उपाययोजना करणे सुलभ होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...
येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात येवला, जि. नाशिक : उन्हाळा आला की ५० वर गावांची...
फळबाग लागवडीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांची... नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या...
अकोला जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे...
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...