agricultural stories in marathi, agro vision, Untapped potential for Redbelly blood oranges in European market. | Agrowon

लाल गराच्या संत्रा निर्यात वाढीसाठी ऑस्ट्रेलियन उत्पादकांचे प्रयत्न
वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

 ऑस्ट्रेलियामध्ये आतील गर व रस रक्तासारख्या लाल रंगाच्या संत्रा फळबागा आहेत. त्याला ब्लड ऑरेंज या नावानेही ओळखले जाते. या फळांच्या निर्यात युरोपीय देश, अमेरिका यासह चीनमध्ये करण्याच्या दृष्टीने उत्पादकांनी प्रयत्न सुरू केले आहे. या फळांच्या वैशिष्ट्याचा विशेषतः स्वाद आणि रंग याचा फायदा होण्याची आशा आहे.

 ऑस्ट्रेलियामध्ये आतील गर व रस रक्तासारख्या लाल रंगाच्या संत्रा फळबागा आहेत. त्याला ब्लड ऑरेंज या नावानेही ओळखले जाते. या फळांच्या निर्यात युरोपीय देश, अमेरिका यासह चीनमध्ये करण्याच्या दृष्टीने उत्पादकांनी प्रयत्न सुरू केले आहे. या फळांच्या वैशिष्ट्याचा विशेषतः स्वाद आणि रंग याचा फायदा होण्याची आशा आहे.

ऑस्ट्रेलियातील साउथ वेल्स रिव्हेरिना जिल्ह्याजवळच्या ग्रिफीथ भागामध्ये ब्लड ऑरेंज फळाच्या बागा आहेत. रिव्हेरीना प्रांतातील वातावरण हे मूलतः सिसिलीप्रमाणे असून, सिसिलीमध्ये ब्लड ऑरेंजच्या अनेक जातींचे मूळ आहे. त्यामुळे येथील फळांना उत्तम चव व स्वाद मिळतो. येथील रेडबेल्ली सिट्रस कंपनीचे संचालक लेन मॅन्सिनी यांनी सांगितले, की रेडबेल्ली सिट्रस कंपनीकडे सुमारे दहा वर्षे जुनी झाडे असून, ती प्रति वर्ष अधिकाअधिक उत्पादन देतात. युरोपीय देशामध्ये ब्लड ऑरेंजच्या निर्यातीसाठी मोठ्या संधी असून, त्या प्रमाणात प्रयत्न झालेले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून तेथून विचारणा होत असून, त्या तात्पुरत्या स्वरुपामध्ये पुरवल्या जातात. मात्र, या फळांना सातत्यपूर्ण उपलब्धतेच्या दृष्टीने बाजारपेठेची निर्मिती व संरचना उभारणीची गरज आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न करत आहोत.

हंगाम उत्साहवर्धक राहण्याची शक्यता :

एकूणच लेन हे येत्या २०१८ मधील संपूर्ण हंगामासाठी अत्यंत उत्साही असून, दर्जेदार आणि उत्तम उत्पादनाची आशा आहे. कारण हे वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये प्रामुख्याने थंड वर्ष असण्याचे अंदाज असून, त्यामुळे फळातील गराला गडद लाल रंग व उत्तम रस मिळतो. अर्थात, याकाळात धुके आणि दवापासून फळबागांचे संरक्षण करावे लागते. या काळात फळबागेमध्ये ‘आर्ट फ्रॉस्ट’ पंख्याचा वापर करून धुके बागेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी निर्यातक्षम उत्पादन मिळवणे शक्य होते. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी प्रत्येक गोष्टीला थोडा उशीर झाल्याने निर्यात कार्यक्रमाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरवात होण्याची फारशी शक्यता दिसत नसल्याचे लेन यांनी सांगितले.

वितरणासाठी भागीदारी ः

ब्लड ऑरेंज या फळाला अमेरिकेमध्ये बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टीने संपूर्ण अमेरिकेमध्ये चांगली वितरण व्यवस्था असलेल्या पिनॅकल फ्रेश या विक्री कंपनीशी भागीदारी केली आहे. पिनॅकल फ्रेशचे डॅनियल न्युपोर्ट यांनी सांगितले, की ऑस्ट्रेलियन ताज्या फळांचा दर्जा उत्तम आहे. सध्या लिंबूवर्गीय फळांमध्ये अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील बाजारात चिली देशाच्या फळांचे वर्चस्व आहे. तर पूर्व किनाऱ्यावरील बाजारात दक्षिण आफ्रिकेचे मोठा वाटा आहे. या दोन्ही देशांकडे ब्लड ऑरेंजचे उत्पादन फारसे दर्जेदार नाही. त्यामुळे उत्तम दर्जाच्या बाजारामध्ये ऑस्ट्रेलियन फळांना नक्कीच जागा आहे. पिनॅकल तर्फे अमेरिकन बाजारपेठेमध्ये ९० टक्के उत्पादनेही घावूक बाजारात पाठवली जातात. त्याच प्रमाणे ब्लड ऑरेंजच्या रसाच्या ड्रॅक्युला ब्रॅंड ला हॉलोवीन या सणाच्या काळात अधिक मागणी राहू शकते. या भीतीदायक मुखवटे घालण्याच्या या सणांसाठी नाताळाप्रमाणे सुमारे सहा महिन्यापासून तयारी सुरू असते. त्यामुळे त्या दिशेने विक्रीचे नियोजन करण्यात येत आहे.

चीन बाजारात गोड फळांची मागणी ः

अमेरिकेप्रमाणे चीन बाजारामध्ये रेड बेल्ली सिट्रस निर्यातीच्या दिशेने प्रयत्न करत आङे. सध्या अत्यंत कमी असलेल्या या निर्यातीमध्ये वाढ करण्यासाठी चांगल्या भागीदाराच्या शोधात ते आहेत. पहिल्या टप्प्यात किमान एक दोन कंटेनर प्रति वर्ष एवढी मागणी येथून होऊ शकेल. अर्थात अमेरिकेपेक्षा या देशातील लोकांच्या चवीची मागणी वेगळी आहे. येथे तुलनेने अधिक गोड फळांना पसंती दिली जाते. त्यामुळे योग्य सर्वेक्षण करून ब्लड ऑरेंज फळांच्या विक्रीचे नियोजन केले जात असल्याचे लेन यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सायगावच्या सरपंचांचा प्लॅस्टिकमुक्तीचा...सायगाव : ग्रामपंचायतीचे सरपंच अजित आपटे यांनी...
ऑनलाइन वीजबिल भरणा कोणत्याही शुल्काविनासोलापूर  : ग्राहकांना ऑनलाइनद्वारे आपल्या...
स्थानिक पालेभाज्यांचा आहारात वापर...आफ्रिकेमध्ये पोषकतेसह दुष्काळ सहनशीलतेसारखे अनेक...
सोलापुरात पीककर्ज वाटप अवघ्या १४ टक्‍क्...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी...
सांगोल्यात खरीप वाया जाण्याची भीतीसांगोला : तालुक्‍यात पावसाने दांडी मारल्याने खरीप...
नगरमध्ये ‘जलयुक्त’ची साडेपाच हजारांवर...नगर   ः जलयुक्त शिवार अभियानातून गेल्यावर्षी...
सहा महिन्यांनंतर नीरा नदीत पाणीवालचंदनगर, जि. पुणे : नीरा नदीवरील भोरकरवाडी (ता...
नाशिक विभागात खरिपासाठी ६२ हजार क्विंटल...नाशिक : नाशिक विभागात पाऊस लांबल्याने चिंता वाढली...
पावसाने दडी मारल्यामुळे तीन जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत मृग...
बीडमध्ये दुबार पीककर्ज, संपूर्ण...बीड  : जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा...
‘सेल्फी वुईथ फार्मर’साठी यवतमाळ कृषी...यवतमाळ  : सध्या पेरणी हंगाम सुरू झाला आहे....
परभणी जिल्ह्यात टॅंकरची संख्या घटलीपरभणी : गेल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार...
हमीभावाने विकलेल्या हरभऱ्याचे ३५ कोटी...सोलापूर  : राज्य शासनाने सुरू केलेल्या...
नगर जिल्ह्यात मनरेगाच्या कामांवर ८६४४...नगर : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
केंद्र सरकारने जाहीर केलेले साखर पॅकेज...पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेले साखरेचे...
‘जयभवानी’ने तयार केला स्वत:चा जलमार्गबीड : कुठलाही कारखाना चालविण्यासाठी कच्च्या...
तूर, हरभऱ्याचे साडेअकराशे कोटी मिळेनातसोलापूर : नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव,...
राज्य बॅंकेकडून साखर तारण कर्जाचा दुरावाकोल्हापूर : राज्य बँकेने मालतरण कर्जासाठी आवश्‍यक...
केळी उत्पादकांना मिळणार भरपाई :...मुंबई : गेल्या आठवड्यात जळगावमध्ये वादळी...
कोकणात पावसाच्या सरीपुणे : कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी बरसण्यास...