नत्र स्थिरीकरण, क्षार सहनशीलतेसाठी होतोय गवत प्रजातीचा अभ्यास

नत्र स्थिरीकरण, क्षार सहनशीलतेसाठी होतोय गवत प्रजातीचा अभ्यास
नत्र स्थिरीकरण, क्षार सहनशीलतेसाठी होतोय गवत प्रजातीचा अभ्यास

डायप्लाचने या गवताच्या केवळ दोन प्रजाती असल्या तरी त्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे या प्रजाती वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. त्यामध्ये एकाच वेळी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंचे वसतीस्थान असणे आणि तीव्र क्षार असलेल्या स्थितीमध्येही चांगल्याप्रकारे वाढण्याचा गुणधर्म कृषी क्षेत्रासाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. या दोन्ही गुणधर्मांसाठी जर्मनीतील स्थिथसोनियन संस्थेतील डॉ. नील स्नो व सहकारी १९८० पासून या वनस्पतींचा अभ्यास करीत आहेत. जगभरामध्ये केवळ अंटार्क्टिका वगळत अन्य सर्व खंडामध्ये आढळणारी वनस्पती म्हणून डायप्लाचने ओळखली जाते. तिच्या दोन प्रजाती असून, त्यातील डायप्लाचने फ्युस्का ही सर्वांना ज्ञात असलेले गवत आहे. या गवतांच्या चारपैकी दोन उपप्रजातींमध्ये क्षारांसाठी सहनशील आहेत. गवतांचा हाच गुणधर्म पिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे १९८० पासून जर्मन संशोधकांचा एक गट डॉ. नील स्नो यांच्या नेतृत्त्वाखाली डायप्लाचने या वंशातील गवतांच्या सखोल अभ्यास करत आहे. या अभ्यासाचे काही निष्कर्ष ‘जर्नल फायटोकीज’मध्ये प्रकाशित केले आहे. दक्षिण आशियामधील या गवताच्या काही प्रजाती या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंचे वसतीस्थान आहेत. हे त्यांच्याच संशोधनातून पुढे आले होते. त्याविषयी माहिती देताना डॉ. स्नो म्हणाले, की नत्र स्थिरीकरण जिवाणू आणि उच्च क्षारासाठी सहनशीलता या दोन्ही गोष्टी एकत्र अन्य कोणत्याही गवतांमध्ये आढळत नाहीत. पिकांच्या दृष्टीने हे दोन्ही गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे आहेत. सध्या सर्वत्र वाढत असलेल्या क्षारपड जमिनीमध्ये पिकांच्या उत्पादनासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. या प्रजातीच्या विरुद्ध दुसरी प्रजाती डायप्लाचने गिगान्टीया (Diplachne gigantea) ही केवळ आफ्रिका खंडामध्ये काही भागांमध्ये आढळते. तिचा आढळ अत्यंत मर्यादित असून, १९८० पूर्वी तर तिचे नमुनेही मिळत नव्हते. ही प्रजाती पानथळ जागेमध्ये चांगल्या रीतीने वाढते. तिची मुळे पूर्ण पाण्यात राहून तर वरील सर्व भाग पाण्याच्या बाहेर राहून वाढतो. या प्रजातीविषयी माहिती देताना स्नो म्हणाले, की १९९६ मध्ये बोट्सवाना येथील ओकावॅन्गो डेल्टा या तलावामध्ये बोटीत दोन संपूर्ण दिवस शोध घेऊनही ही वनस्पती मिळाली नव्हती. वास्तविक ओकावॅन्गो परिसर हा तिच्या वाढीसाठी चांगला परिसर असूनही, तिचे नमुने मिळवणे अनेक वेळा दुरापास्त होते. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. स्नो यांचे सहकारी डॉ. पॉल पीटरसन, कोन्स्टॅन्टीन रोमॅस्चेन्को यांनी डायप्लाचने वंशातील गवतांच्या २१ उपप्रजातींचे मूलद्रव्यीय व जनुकीय विश्लेषण केले आहे. त्यातील बहुतांश उपप्रजाती मोनोफायलेटिक असल्या तरी D.fusca च्या चार उपप्रजाती पॉलिफायलेटिक आहे. फायलेटिक म्हणजे उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक वंशाशी संबंध असणे. एकाच वंशांशी संबंधित राहून अन्य कोणत्याही वंशांशी जोडलेले नसल्यास त्याला मोनो फायलेटिक म्हणतात. जर एकापेक्षा अधिक वंशांशी जोडलेले असल्यास पॉलिफायलेटिक म्हणतात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com