शहरी झाडांच्या वाढीचा वेग ग्रामीण भागांपेक्षा अधिक

शहरी झाडांच्या वाढीचा वेग ग्रामीण भागांपेक्षा अधिक
शहरी झाडांच्या वाढीचा वेग ग्रामीण भागांपेक्षा अधिक

शहरी भागातील झाडांच्या वाढीचा वेग हा ग्रामीण भागातील झाडांच्या तुलनेत अधिक असल्याचे नुकत्याच झालेल्या विश्लेषणामध्ये दिसून आले आहे. हा प्रवाह १९६० पासून असला तरी प्रथमच अभ्यासातून पुढे आला आहे. वातावरणातील बदलांना शहरी झाडांना ग्रामीण झाडांच्या तुलनेत लवकर सामोरे जावे लागले. हे निष्कर्ष ‘जर्नल सायंटिफिक रिपोर्टस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार, २०३० पर्यंत शहरातील लोकसंख्येमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोक राहत असतील. त्याचप्रमाणे हा कल सतत वाढत राहणारा आहे. शहराच्या वातावरणामध्ये माणसांचे आरोग्य आणि मानसिकता यासाठी झाडांचा विचार होण्याचीही आवश्यकता आहे. म्युनिच तंत्र विद्यापीठातील संशोधकांसह आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने शहरी व ग्रामीण झाडांच्या वाढीचा अभ्यास केला आहे. त्याविषयी माहिती देताना प्रो. हॅन्स प्रेत्झच यांनी सांगितले, की वातावरणातील बदलांचे जंगले आणि त्यातील झाडांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सातत्याने केला जात असला, तरी शहरी भागातील झाडांवरील परिणामांकडे शास्त्रज्ञांचे तुलनेने दुर्लक्ष होते. जागतिक पातळीवर शहरीकरण वेगाने होत असून, शहरी झाडांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ही जाणीव होत आहे. त्यासाठी विविध वातावरण प्रभागातील शहरांची निवड केली. बर्लीन, ब्रिस्बेन, केपटाऊन, हनोई, होस्टन, म्युनिच, पॅरिस, प्रिन्स जॉर्ज, सॅंटिगो डी चिले, सॅप्पोरो यांसारख्या मोठ्या शहरांतील झाडांचे नमुने गोळा केले. त्यांचे विश्लेषण केले. या शहरातील मोठ्या आणि पक्व अशा १४०० झाडांवर लक्ष केंद्रित केले. त्यातही शहराच्या मध्य भागातील आणि ग्रामीण परिसरातील झाडे निवडण्यात आली. निष्कर्ष ः

  • शहरी आणि ग्रामीण झाडांचे विश्लेषण केले असता एकाच वयाच्या शहरी झाडांची सरासरी वाढ ही ग्रामीण झाडांच्या तुलनेमध्ये अधिक आढळली.
  • वाढीच्या पुढील टप्प्यात शहरी आणि ग्रामीण झाडांच्या वाढीच्या वेगातील फरक कमी होत जातो. मात्र, तरीही लक्षणीय फरक हा दिसून येतो. साधारणपणे ५० वर्षे वयाच्या झाडांमध्ये एक चतुर्थांशपेक्षा अधिक फरक राहतो. म्हणजेच शंभर वर्षाच्या झाडाच्या आयुष्यात २० टक्क्यांपर्यंत राहतो.
  • हा फरक का राहत असावा?

  • शहरी भागामध्ये उष्णतेमध्ये ३ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत वाढ दिसून येते. या वाढलेल्या तापमानामुळे झाडाच्या वाढीवर दोन प्रकारे परिणाम होतो.
    1. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग वाढतो.
    2. युरोपमधील प्रचंड थंडीमध्ये होणाऱ्या पानगळीचा कालावधी कमी होतो. झाडावर अधिक काळ पाने राहत असल्याने झाडाची वाढ सुरू राहते.
  • वरील चांगल्या परिणामासोबतच शहरी झाडांमध्ये जीवनसाखळी वेगाने पूर्ण होऊ शकते. त्यामुळे वयोमानाप्रमाणे मृत होण्याचे प्रमाणही अधिक राहण्याचा धोका आहे.
  • शहरी किंवा ग्रामीण हा भेद न करताही एकूण हवामानातील बदलांचा झाडाच्या वाढीचा वेग वाढला असल्याचे प्रो. प्रेत्झस्च यांनी सांगितले. हा बदल १९६० पासून विविध आंतरराष्ट्रीय संशोधनामधून दिसून येत आहे. प्रथमच हा वेग २० टक्क्यांपर्यंत असल्याचे आमच्या अभ्यासात नमूद करण्यात आले.
  • तापमानातील बदलामुळे व वातावरणातील वाढलेल्या कर्ब पातळीमुळे झाडांच्या वाढीचा वेग वाढतो.
  • दुष्काळी स्थितीमध्ये झाडांच्या मृत होण्याचे प्रमाण वाढत आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com