agricultural stories in marathi, agro vision, uses of robots | Agrowon

परागीकरण करणारा रोबो
वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

जगभरात फळांची मागणी वाढत असल्याने विविध देशांत फळबागा वाढत आहेत. परंतु, मजुरांच्या टंचाईमुळे फळबागेचे व्यवस्थापन, काढणी आणि पॅकिंगवर परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन वेळीची बचत आणि कष्ट कमी करण्यासाठी फळबागांमध्ये रोबो तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. न्यूझिलंडमधील किवी आणि सफरचंद उत्पादक कंपन्यांनी फळबागेचे नियोजन सोपे होण्यासाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

जगभरात फळांची मागणी वाढत असल्याने विविध देशांत फळबागा वाढत आहेत. परंतु, मजुरांच्या टंचाईमुळे फळबागेचे व्यवस्थापन, काढणी आणि पॅकिंगवर परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन वेळीची बचत आणि कष्ट कमी करण्यासाठी फळबागांमध्ये रोबो तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. न्यूझिलंडमधील किवी आणि सफरचंद उत्पादक कंपन्यांनी फळबागेचे नियोजन सोपे होण्यासाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

रोबोनिर्मितीमधील तज्ज्ञ स्टीव्ह सॅंडर्स याबाबत म्हणाले की, फळबागेच्या व्यवस्थापनामध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे. त्यामुळे आम्ही स्वयंचलीत यंत्रांच्या संशोधनावर भर दिला आहे. आम्ही प्रामुख्याने रोबो, सेंन्सर प्रणाली आणि संगणकाचा वापर फळबागांच्या व्यवस्थापनामध्ये कसा करता येईल, याबाबत तंत्रज्ञान विकसित करीत आहोत. पहिल्यांदा आम्ही किवी फळबागेमध्ये परागीकरण सुलभ होण्यासाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर केला. रोबो आणि जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित या यंत्रणेच्या वापरामुळे किवी फळबागेत एकसमान पद्धतीने परागीकरण झाल्याने फळांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे न्यूझिलंडमधील २५ टक्के किवी फळबागांच्यामध्ये परागीकरणासाठी आता रोबो तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

आम्ही सफरचंदाचे पॅकिंग करणारा रोबो तयार केला आहे. त्याचे निष्कर्षही आशादायक आहेत. पॅकहाउसमध्ये पॅकेजिंग करणारे रोबो बसविण्यात आलेले आहेत. यामुळे पॅकेंजिग करताना मनुष्याद्वारे सफरचंदांची हाताळणी होत नाही. एका मिनिटाला १२० सफरचंदाचे पॅकिंग या यंत्रणेद्वारे होते. तीन माणसांचे काम एक रोबो करत असल्यामुळे मजूर आणि वेळेचीही बचत होत आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...