agricultural stories in marathi, agro vision, using cameras to save the piglets | Agrowon

वराह पिले वाचविण्यासाठी कॅमेरे ठरतील उपयोगी
वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

उच्च दर्जाच्या त्रिमितीय प्रतिमांच्या साह्याने नव्या जन्मणाऱ्या वराह पिलांचे संरक्षण करण्याचे तंत्र अमेरिकी संशोधन सेवा विभागातील संशोधकांनी विकसित केले आहे. मादी वराह आपल्याच पिलांना पोचवत असलेल्या जीवघेण्या इजांपासून पिले वाचवणे शक्य होईल.

उच्च दर्जाच्या त्रिमितीय प्रतिमांच्या साह्याने नव्या जन्मणाऱ्या वराह पिलांचे संरक्षण करण्याचे तंत्र अमेरिकी संशोधन सेवा विभागातील संशोधकांनी विकसित केले आहे. मादी वराह आपल्याच पिलांना पोचवत असलेल्या जीवघेण्या इजांपासून पिले वाचवणे शक्य होईल.

दरवर्षी विविध कारणांमुळे वराहपालनामध्ये सुमारे १५ टक्के वराह पिले मृत होतात. अमेरिकी पोर्क उत्पादकांच्या मते, त्यातील अनेक पिले ही मादीच्या अंगाखाली येऊन मरतात. यासाठी मादीच्या कक्षाची सुधारणा आणि क्रेट्स या माध्यमातून काही प्रमाणात मृत्यूचे प्रमाण कमी होते. यावर उपाययोजना शोधण्यासाठी नेब्रास्का येथील अमेरिकी प्राणीज मांस संशोधन केंद्र येथे कार्यरत कृषी अभियंता टॅमी ब्राऊन - ब्रँडी यांनी प्रथम मादी मात आणि पिलाच्या वर्तणुकीचा अभ्यास केला. प्राण्यांच्या वर्तणुकीच्या अभ्यासातून त्यांचे आरोग्य आणि एकमेकांना इजा न करता चांगलेपणाने राहण्यासंदर्भात अनेक बाबी उघड झाल्या. त्याचा फायदा वराहपालकांना होऊ शकतो.
संशोधक टॅमी ब्राऊन- ब्रँडी आणि त्यांच्या चीन येथील सहकाऱ्यांनी आयोवा येथील काही फार्म आणि विद्यापीठामध्ये पिलांच्या त्रिमितीय प्रतिमांचे विश्‍लेषण आणि प्रक्रिया करणारे स्वयंचलित तंत्र विकसित केले आहे. त्यासाठी पिलाच्या जन्मावेळेपासून एका कॅमेराच्या साह्याने मादी व पिलांच्या प्रतिमा घेतल्या जातात. मादी नेमक्या कशा प्रकारे खाते, पिते, उभी राहते, बसते किंवा झोपते यांचा अभ्यास केला जातो. या वागण्याची विविध दृष्टिकोनातून विभागणी केली जाते. त्यामुळे पिले मादीच्या अंगाखाली येऊन मरण्याचे प्रमाण कमी करणे शक्य होते.

असे होतील या तंत्राचे फायदे ः

  • या तंत्रामुळे वराहपालनामध्ये प्राण्यांच्या निरीक्षणासाठी मदत होणार आहे.
  • लहान पिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्‍यकतेनुसार क्रेट्चा आकार, कोठीचा आकार कमी जास्त करता येईल.
  • आजारी प्राणीही त्वरित ओळखणे शक्य होईल.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...