फ्लाय अॅशपासून कॉंक्रिटची निर्मिती शक्य

फ्लाय अॅशपासून कॉंक्रिटची निर्मिती शक्य
फ्लाय अॅशपासून कॉंक्रिटची निर्मिती शक्य

सध्या टाकाऊ समजल्या जाणाऱ्या फ्लाय ॲशपासून अधिक ताकदवान, सक्षम अशा काँक्रिटची निर्मिती वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील प्रा. झिंयामिंग शी, त्यांचे विद्यार्थी गँग क्षू यांनी केली आहे. पारंपरिक कॉंक्रिट निर्मितीला पर्याय मिळणार असून, यात टाकाऊ घटकांचा वापर होत असल्याने पर्यावरणपूरकही ठरणार आहे. हे संशोधन जर्नल फ्युएलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कोळशापासून विद्युत निर्मिती करताना फ्लाय ॲश शिल्लक राहते. सध्या अमेरिकेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक फ्लाय ॲशही टाकाऊ म्हणून फेकली जाते. या राखेमुळे भोवतालच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. सध्या या राखेचा वापर काही प्रमाणात बांधकामासाठी विटा तयार करण्यासाठी होतो. आता या फ्लाय ॲशपासून काँक्रिटही तयार करणे शक्य असल्याचे वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधनात दिसून आले आहे. पारंपरिक काँक्रिटमध्ये सिमेंट, वाळू आणि खडी यांचे मिश्रण वापरले जाते. यामध्ये पाच ते आठ टक्क्यांपर्यंत हरितगृह वायूचे उत्सर्जन जगभरामध्ये होत असते. या मिश्रणातील सिमेंट या घटकाच्या निर्मितीसाठी उच्च तापमान आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा आवश्‍यक असते. फ्लाय ॲशपासून काँक्रिट निर्मितीमध्ये उष्णता किंवा ऊर्जेची आवश्‍यकता नसल्याने ऊर्जेची बचत होणार आहे. या संशोधक गटाने नॅनो घटक ग्राफीन ऑक्साईडचा वापर केला असून, फ्लाय ॲश पाण्यामध्ये मिसळली असता सिमेंटसारखी अधिक घट्ट आणि ताकदवान बनते. ग्राफीन ऑक्साईडचे अणू सोडियम सिलिकेट आणि कॅल्शिअम ऑक्साईडसारख्या रासायनिक घटकांसोबत प्रक्रिया करून कॅल्शिअम-ॲल्युमिनेट-सिलिकेट-हायड्रेट अशा मूलद्रव्यांची साखळी बनते. ती अधिक सिमेंटपेक्षाही अधिक ताकदवान असते. या काँक्रिटच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, ते वेगवेगळ्या वजनाला आणि तापमानामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करत असल्याचे आढळले आहे. पुढील टप्प्यामध्ये बांधकाम करून त्या संरचनेच्या क्षमतेच्या चाचण्या घेण्यात येणार असल्याचे क्षू यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com