agricultural stories in marathi, agro vision, ventilation technology | Agrowon

घराच्या वातानुकूलनासह उष्णता राखणारे तंत्रज्ञान विकसित
वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

लिथुनिया देशातील कौनस युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी घरांच्या वातानुकूलनासाठी विशेष उपकरण (रिक्युपरेटर) विकसित केले आहे. त्यात घरातील उष्णता ८९ टक्क्यांपर्यंत धरून ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे घरे उष्ण ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेमध्ये बचत होईल.

लिथुनिया देशातील कौनस युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी घरांच्या वातानुकूलनासाठी विशेष उपकरण (रिक्युपरेटर) विकसित केले आहे. त्यात घरातील उष्णता ८९ टक्क्यांपर्यंत धरून ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे घरे उष्ण ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेमध्ये बचत होईल.

परदेशामध्ये थंड वातावरणामुळे घरातील उष्णता रोखून धरणे आवश्यक असते. अन्यथा घर उष्ण ठेवण्यासाठी अधिक गॅस किंवा लाकडांचे ज्वलन करावे लागते. परिणामी ऊर्जा वापर वाढतो. त्याच उष्णता रोखून धरण्यासाठी दारे, खिडक्या बंद केल्याने वातानुकूलनामध्ये समस्या येतात. घरामध्ये जळती लाकडेही ज्वलनासाठी ऑक्सिजन वापरत असतात. त्यामुळे घरामध्ये ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते. हे टाळण्यासाठी कौनस युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील उष्णतेमध्ये कमी न होता वातानुकूलन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्र शोधले आहे. त्याला ऑक्सिजन असे नाव दिले असून, त्याद्वारे घरातील उष्णता ८९ टक्क्यांपर्यंत रोखून धरली जाते. या उपकरणाचा आकार अत्यंत लहान आहे. याविषयी माहिती देताना व्यवस्थापन झिल्लिनास सॅलीयलिनिस यांनी सांगितले, की हे उपकरण सिलिंगच्या वर लावले जाते. लहान आकाराच्या घरांतील वातानुकूलनासाठी कोणताही आवाज न करता कार्य करू शकते.

  • युरोपिय संघाने प्रत्येक नव्या घराच्या निर्मितीमध्ये यांत्रिक व्हेंटिलेशन बसवण्याची शिफारस केली आहे. मात्र, लहान घरांमध्ये किंवा फ्लॅटमध्ये मोठी व्हेटिंलेशन यंत्रणा बसविण्याएवढी जागा उपलब्ध असत नाही. अशा वेळी हे उपकरण उपयोगी ठरू शकते.
  • हवेतून येणाऱ्या परागांच्या कणांनाही अडवण्याची क्षमता यात बसवलेल्या F७ फिल्टरमध्ये आहे. त्यामुळे अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनाही फायदेशीर होऊ शकेल.
  • सध्या याचे प्रारुप तयार असून, लवकरच उत्पादन बाजारात आणणार असल्याचे सॅलीयलिनीस यांनी सांगितले. याचा वापर वातानुकूलनासोबतच बाह्य उष्णता रोखण्यासाठी झाल्यास भारतातही या प्रकारचे उपकरण फायद्याचे ठरू शकते.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...