मांसाहारी वनस्पतींच्या सापळ्यापासून वाचतात परागवाहक

मांसाहारी वनस्पतींच्या सापळ्यापासून वाचतात परागवाहक
मांसाहारी वनस्पतींच्या सापळ्यापासून वाचतात परागवाहक

व्हिनस फ्लाय ट्रॅप ही मांसाहारी वनस्पती आपल्या फुलांवर येणाऱ्या किटकांमधील परागीकरण करणाऱ्या किटकांना ओळखून, त्यांना खात नसल्याचे उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठातील संशोधकांना प्रथमच आढळले आहे. व्हिनस फ्लायट्रॅप ही वनस्पती आपल्या स्थानिक रहिवासामध्ये आश्चर्यकारकपणे फुलांच्या परागीकरणामध्ये मोलाची भूमिका निभावणाऱ्या किटकांना सूट देत असल्याचे दिसून आले आहे. व्हिनस फ्लायट्रॅप (Dionaea muscipula) ही मांसाहारी उत्तर कॅरोलिना येथील विल्मिंगटन परिसरातील सुमारे १०० मैल परिघामध्ये आढळते. ही वनस्पती नष्ट होत असल्यामुळे संवर्धनाच्या दृष्टीने तिचा अभ्यास केला जात आहे. या वनस्पतीवर संशोधन करणाऱ्या संशोधिका एल्सा यंगस्टेंड्ट यांनी सांगितले, की सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या वनस्पतीचे परागीकरणही किटकांद्वारे होते. किटकांचा फडशा पाडताना ही वनस्पती आपल्या फुलांच्या परागीकरण करणाऱ्या किटकांवर हल्ला करत नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब प्रथमच उघड झाली आहे.

  • अभ्यासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्हिनस फ्लायट्रॅप फुलांद्वारे पकडल्या गेलेल्या किटकांच्या नोंदी घेतल्या गेल्या. या फुलांच्या पाच आठवड्यांच्या फुलोऱ्यामध्ये येणाऱ्या किटकांचे वर्गीकरण केले. विशेषतः हे कीटक परागांचे वहन करतात किंवा नाही, यावर भर देण्यात आला. त्याच प्रमाणे परागाचे वहन करत असतील तर त्याचे नेमके प्रमाण किती हेही मोजण्यात आले.
  • फुलांवर येत असलेल्या सुमारे १०० किटकांपैकी केवळ काही कीटक हे फुलांच्या परागाचे वहन करतात. उदा. ग्रीन स्वेट बी (Augochlorella gratiosa), चेकर्ड बीटल (Trichodes apivorus) आणि लॉंगहॉर्न बीटल (Typocerus sinuatus).
  • प्रक्षेत्रावरील २०० पेक्षा अधिक फ्लायट्रॅपवरील कीटक अभ्यासात मिळवण्यात आले. परागाचे वहन करणाऱ्या किटकांच्या प्रजाती कधीही सापळ्यात सापडल्याचे दिसून आले नाही. त्याविषयी माहिती देताना यंगस्टेड्ट म्हणाल्या, की यामागे फुलांची रचना हेच कारण असणार आहे. व्हिनस फ्लायट्रॅप फुले ही फांद्यावर उंच विशेषतः सापळ्यापेक्षाही अधिक उंचावर येतात. फुलांकडे आकर्षित होणारे ८७ टक्के कीटक आम्ही मिळवले.त्यातील केवळ २० टक्के किटकांनाच भक्ष्य बनवल्याचे दिसून आले. थेडक्यात, धोक्याच्या पातळीवरून परागीकरण करणारे कीटक उडत असल्याने ते फ्लायट्रॅप वनस्पतीच्या सापळ्यात अडकत नसावेत.
  • मांसाहारी वनस्पतींच्या अधिक अभ्यासाची आवश्यकता

  • संशोधक क्लाइड सोरेनसॉन यांनी सांगितले, की सापळ्याचा रंग हा फुलांपेक्षा वेगळा असून, अन्य प्रजातींना आकर्षित करण्यासाठी असू शकतो. त्याचप्रमाणे फुलांद्वारे उत्सर्जित करण्यात येत असलेले गंध किंवा रासायनिक संकेतांविषयी अद्याप फारसे माहीत नाही. त्याद्वारेही किटकांमध्ये फरक करण्यात येत असेल. पुढील संशोधनामध्ये या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. त्यातून फ्लायट्रॅपच्या परागीकरणाच्या जीवशास्त्राविषयी अधिक बाबी उलगडतील.
  • स्थानिक पर्यावरणामध्ये काही ठराविक काळानंतर वणवे लागत असल्यास व्हिनस फ्लायट्रॅप चांगल्या प्रकारे वाढत असल्याचे सांगितले जाते; मात्र वनस्पतीच्या उत्तम प्रजननासाठी या वणव्यांचे नेमके प्रमाण किती असले पाहिजे, हाही मुद्दा अभ्यास करण्यासारखा असल्याचे रिबेका इरविन यांनी सांगितले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com