कॅनडामधील बाजारपेठेसाठी व्हिएतनामी ड्रॅगन फ्रूट सज्ज

कॅनडामधील बाजारपेठेसाठी व्हिएतनामी ड्रॅगन फ्रूट सज्ज
कॅनडामधील बाजारपेठेसाठी व्हिएतनामी ड्रॅगन फ्रूट सज्ज

व्हिएतनाम येथील ड्रॅगन फ्रूटला कॅनडामध्ये उत्तम मागणी असून, वर्षभर निर्यातीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी साधारणतः जून, जुलै या महिन्यांच्या दरम्यान काही प्रमाणात फळांची उपलब्धता कमी होत असली तरी त्यावर मात करण्यासाठी नियोजन केले जात आहे. आयातदारही संपूर्ण ३६५ दिवसांसाठी फळ उपलब्धतेसाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी पश्चिम कॅनडामध्ये व्हिएतनाममधून उत्तम दर्जाची फळे उपलब्ध झाली होती. या वर्षी मागणीही चांगली असल्याने आयातीवर भर देण्यात आहे. २०१८ च्या सुरवातीच्या काळात चिनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मागणीमध्ये वाढ झाली होती. त्या काळात गवार, तोंडली, यू चॉय (मोहरीवर्गीय पालेभाजी) आणि पांढरी हळद अशा अन्य चाळीस घटकांसोबत ड्रॅगन फ्रूटचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. अर्थात, ही फळे परदेशी असल्याने त्यासोबत ती कशी शिजवायची किंवा खायची यासाठी मार्गदर्शनपर लेबल लावण्यात आले होते. कॅनडामध्ये सर्वत्र या भाज्या व फळे पोचवण्यासाठी प्रामुख्याने व्हॅनकोवर, कॅलगरी आणि सॅस्काटून या स्थानांचा वापर केला जात असल्याये थॉमस फ्रेश चे अॅन्ड्रेई दुबक यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com