चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचा

चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचा
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचा

आरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत नाही. मात्र, नेमका कोणता व्यायाम करावा असे विचारले तर त्यात मतभिन्नता येते. अगदी सर्वांना सहजपणे करता येण्यासारखा व्यायाम म्हणजे चालणे.

अनेकजणांचे चालणे बऱ्यापैकी होत असले तरी व्यायाम केल्याचे मानले जात नाही. आरोग्यासाठी तेवढे पुरेसे नसल्याचे आपले उगीचच मत असते. चालणे हा पुरेसा व्यायाम आहे का, असा प्रश्न पाच ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांना विचारण्यात आला असता, पाचपैकी चारजणांनी चालण्याच्या पक्षात आपले वजन टाकले. मात्र, एकजणाने केवळ चालणे हा संपूर्ण आरोग्यासाठी पुरेसा व्यायाम नसल्याचे सांगितले.

रोज किमान ५ किमी प्रति तास या वेगाने १० मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक चालणाऱ्या व्यक्तींना आरोग्याचे अनेक फायदे मिळतात. शरीराची कोणतीही हालचाल ही आरोग्यासाठी विशेषतः ह्रदयरोगासह स्थौल्यत्त्व, टाइप २ मधुमेह, नैराश्य, कर्करोगाचे अनेक प्रकार यांचा धोका कमी करते. वेगाने चालणे आणि चढावर चालणे अशा अधिक क्षमता वापरणाऱ्या चालण्याच्या प्रकारांमुळे आरोग्यासाठी अधिक फायदे मिळतात. - कॅरोल महेर, फिजिओथेरपिस्ट चालण्याचे खूप फायदे आहेत. तो कोणालाही करता येण्यासारखा व्यायाम असून, शक्य असल्यास त्यात वेग वाढवणे, विविध कोनातील चढावर चढणे, वजन घेऊन चालणे, ट्रेडमिलवर वेगाने चालणे असे अनेक बदल करता येतात. बागेसह निसर्गामध्ये फिरण्यामुळे मनोवृत्ती सुधारते. लोकांच्या ओळखी होऊन ताण हलके होतात. - ज्युली नेट्टो, व्यावसायिक आरोग्यतज्ज्ञ. जर कोणाच्याही मदतीशिवाय ४ ते ६ किमी प्रति तास वेगाने सलग अर्धा ते एक तास प्रति दिन चालू शकत असल्यास, चालणे हा पुरेसा व्यायाम आहे. चालण्यामुळे अनेक आजार दूर राहतात. अन्य कोणत्याही व्यायामाच्या तुलनेमध्ये यात कोणताही खर्च नाही. पाळीव प्राणी आणि नातलग किंवा सहकारी यांच्यामुळे दीर्घकाळ चालण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहन मिळते. ज्या विभागात प्रदूषण व अन्य समस्या आहेत, तिथे ट्रेड मिलच्या साह्याने घरातच हा व्यायाम करता येतो. - केविन नेट्टो, बायोमेकॅनिस्ट एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी चालण्यापेक्षा पळणे वेगवान ठरते. सरासरी ऑस्ट्रेलियन माणूस प्रति दिन ३० मिनिटे चालतो आणि त्यांच्या पूर्ण दिवसाच्या शारीरिक हालचालीमध्ये हे प्रमाण ४० टक्के ठरते. मध्यम वेगाने चालण्यामुळे शरीराच्या सामान्य चयापचयामध्ये तीन पटीने, तर पळणे आणि अन्य खेळामुळे सात पटीने वाढ होते. एक मिनिटांसाठी वेगवान खेळ खेळणे ही ३.५ मिनिटे चालण्यासारखे असते. ५६ मिनिटांचे चालणे ही १६ मिनिटांच्या पळण्यासारखे आरोग्यासाठी चांगले असते. - टीम ओल्ड, प्रोफेसर, आरोग्यशास्त्र कोणताही व्यायाम न करण्यापेक्षा चालणे हा चांगला व्यायाम असला, तरी आरोग्याचे सगळे फायदे मिळवण्यासाठी मात्र पुरेसे नाही. चालण्यासोबत एरोबिक व्यायाम (पळणे, सायकलिंग, पोहणे) आणि ताकदीचे व्यायाम (वजण उचलणे इ.) करण्याची गरज आहे. यातून स्नायूंची ताकद आणि हाडांची घनता चांगली राहण्यास मदत होते. - जॅकसन फायपे, खेळ शास्त्रज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com