agricultural stories in marathi, agro vision, waterways may be the source of microbials | Agrowon

जलवाहिन्या ठरू शकतात हानिकारक जिवाणूंचे स्रोत
वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

ओलावा आणि अन्य अनुकूल वातावरणामुळे जलवाहिन्या किंवा कालव्यांमध्ये हानीकारक जिवाणूंची वाढ वेगाने होऊ शकते. जॉर्जियामध्ये सातत्याने घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या विश्लेषणामध्ये प्रतिकारक जिवाणूंचा प्रादुर्भाव असल्याचे आढळले आहे.

ओलावा आणि अन्य अनुकूल वातावरणामुळे जलवाहिन्या किंवा कालव्यांमध्ये हानीकारक जिवाणूंची वाढ वेगाने होऊ शकते. जॉर्जियामध्ये सातत्याने घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या विश्लेषणामध्ये प्रतिकारक जिवाणूंचा प्रादुर्भाव असल्याचे आढळले आहे.

अमेरिकी कृषी विभागाच्या कृषी संशोधन सेवा विभागातील संशोधकांनी अथेन्स (जॉर्जिया) येथील पाण्याच्या कालव्यामध्ये वाढणाऱ्या हानीकारक जिवाणूंची संभाव्य वाढ होण्याच्या स्रोतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे पाण्याचा दर्जा टिकवणे शक्य होऊ शकते. यासाठी एक प्रकल्प गेल्या वीस वर्षांपासून राबवला जात आहे. त्यात अप्पर ओकोनी पाणलोट क्षेत्रातील पाण्याचे नमुने सातत्याने घेतले जातात. या महत्त्वपूर्ण माहितीसाठ्यातील प्रतिकारकता विकसित केलेल्या जिवाणूंचे (अॅण्टीमायक्रोबियल रेझिस्टंट -AR) पाण्यातील प्रमाण तपासण्यात येते. अशा जिवाणूंच्या अस्तित्त्वाचे सार्वजनिक आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेतले जात आहेत.   

जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांनी गेल्या दोन वर्षांपासून ४५८ पाण्याच्या नमुने गोळा केले होते, त्यामध्ये ४९६ प्रकारचे इ. कोलाय जिवाणू आढळले. त्यातील ३४ ई. कोलाय जिवाणू प्रजाती या सूक्ष्मजीवविरोधी औषधांना प्रतिकारक असल्याचे आढळले. या ३४ जिवाणूंचे पुढे आणखी विश्लेषण केले असता, त्यातील अनेक प्रजाती पृष्ठभागावरील पाण्यामध्ये सापडतात. या प्रजातीपैकी एक ई. कोलाय एसटी १३१ ही रोगकारक जिवाणू प्रजाती असून, मूत्रनलिकेमध्ये प्रादु्र्भाव करतात. हे कोणत्याही औषधांना दाद देत नसल्याचे आढळले आहे.
पाण्यामध्ये जिवाणू आढळत असले तरी क्लोरिन आणि अतिनिल किरणांच्या साह्याने पाण्याचे शुद्धीकरण होत असल्यास भीती बाळगण्याचे कारण असत नाही. मात्र, जिवाणूचे मुळ स्रोत ज्ञान करून घेणे गरजेचे असून, या ठिकाणी त्यांची पैदास होणार नाही, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे फ्रेये यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोहुन चो यांनी पी. एचडीसाठी संशोधन केले असून, त्यांना चारलिन जॅकसन आणि अॅन्ह एनग्युयेन आणि लारी हीओट यांचे साह्य मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...