agricultural stories in marathi, agro vision, Why are whales so big | Agrowon

सागरी सस्तन प्राण्यांच्या वाढीवर अधिक मर्यादा
वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

सागरी सस्तन प्राणी आणि त्यांचे प्राचीन पूर्वज यांच्या शरीराच्या आकारांचा अभ्यास स्टॅनफोर्ड येथील संशोधकांनी केला आहे. शरीर उष्ण राहणे आणि खाण्याची उपलब्धता या दोन घटकांवर या प्राण्यांचा आकार ठरत असल्याचे पुढे आले आहे.

सागरी सस्तन प्राणी आणि त्यांचे प्राचीन पूर्वज यांच्या शरीराच्या आकारांचा अभ्यास स्टॅनफोर्ड येथील संशोधकांनी केला आहे. शरीर उष्ण राहणे आणि खाण्याची उपलब्धता या दोन घटकांवर या प्राण्यांचा आकार ठरत असल्याचे पुढे आले आहे.

सागरी सजीवामध्ये ब्ल्यू व्हेल किंवा ल्युम्बरिंग इलेफंट सील यांचा प्रचंड आकार पाहता त्यांच्या वाढीला कोणत्याही मर्यादा नसल्याचा समज कोणाचाही होऊ शकतो. जमिनीवरील प्राण्यांच्या वाढीवर असलेल्या मर्यादांच्या तुलनेमध्ये जलचरांच्या वजनांच्या वाढीवर फारशा मर्यादा नसल्याचे शास्त्रज्ञही मानत. त्यामध्ये स्वतःच्या पायावर वजन पेलवण्यासोबत अन्य पर्यावरणीय बाबींकडे निर्देश केला जाई. त्या तुलनेमध्ये पाण्यामध्ये तरंगण्यासाठी कमी श्रम लागतात. अर्थात, या समजाला नव्या संशोधनाने छेद दिला आहे. या जलचरांना शरीराची उष्णता स्थिर ठेवणे आणि मोठ्या आकारासाठी आवश्यक खाद्य उपलब्ध होणे यामुळे सस्तन जलचरांवर मोठ्या मर्यादा येतात.

 जलचर सस्तन प्राण्यामध्ये सील आणि सी लायन्स हे कुत्रे, मॅनेटीज यांच्या जवळचे असून, व्हेल आणि डॉल्फीन हे पाणघोड्याच्या जवळचे आहेत. या प्राण्यांच्या सध्या जिवंत अशा ३८५९ आणि २९९९ जीवाष्मांचा अभ्यास करण्यात आला. त्यात ७० टक्के जिवंत प्रजाती आणि २५ टक्के नष्ट झालेल्या प्रजातींचे विश्लेषण केले गेले. त्यावर आधारित मॉडेल ल्युझीयाना विद्यापीठातील क्रेग मॅकक्लेन यांच्या साह्याने बनवण्यात आले.

 जमिनीवरील प्राणी पाण्यात गेल्यानंतर उत्क्रांतीदरम्यान त्यांनी नवीन आकार मिळवला. कुत्र्यासारख्या प्राण्यांच्या पूर्वजापेक्षाही आकार आणि वजन वाढले. मात्र, आकार वाढण्यावर शरीराची उष्णता टिकवणे आणि आहाराची उपलब्धता या मर्यादा असल्याचेही त्यातून पुढे आले.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...