agricultural stories in marathi, agro vision, Widespread uranium contamination found in India's groundwater | Agrowon

भारतीय भूजलामध्ये युरॅनिअमचे प्रदूषणाचे प्रमाण अधिक
वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

ड्यूक विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये भारतातील भूजलामध्ये युरॅनिअमचे प्रदूषण अतिदूरपर्यंत पसरले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये भारतामधील सोळा राज्यांतील भूजलाचे सर्वेक्षण आणि अभ्यास करण्यात आला. प्रो. अॅवनेर वेंगोश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष ‘एन्व्हायर्नमेंटल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लेटर्स’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

ड्यूक विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये भारतातील भूजलामध्ये युरॅनिअमचे प्रदूषण अतिदूरपर्यंत पसरले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये भारतामधील सोळा राज्यांतील भूजलाचे सर्वेक्षण आणि अभ्यास करण्यात आला. प्रो. अॅवनेर वेंगोश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष ‘एन्व्हायर्नमेंटल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लेटर्स’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

युरॅनिअमचे पाण्यामध्ये प्रदूषण होण्याचा मुख्य स्रोत नैसर्गिक आहे. मात्र, मानवी हस्तक्षेप विशेषतः भूजलाचा अतिरिक्त प्रमाणामधील उपसा, वापर आणि नत्रयुक्त खताद्वारे होणारे प्रदूषणही कारणीभूत असू शकते, असे या अहवालात म्हटले आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये युरॅनिअमचे प्रमाण अधिक असल्याचा किडनीसंदर्भात आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे अन्य वैद्यकीय अभ्यासात दिसून आले आहे. या समस्येविषयी माहिती देताना ड्युक विद्यापीठातील निकोलस स्कूल ऑफ दी एन्व्हायर्नमेंट येथील भूरसायनशास्त्र आणि जल दर्जा विषयाचे प्रो. अॅवनेर वेंगोश म्हणाले, की आम्ही तपासणी केलेल्या राज्यापैकी राजस्थानमधील एक तृतीअंश विहिरीतील पाण्यामध्ये युरॅनिअमचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकी पर्यावरण संरक्षण एजन्सीच्या पिण्यासाठी सुरक्षित पाण्याच्या निकषापेक्षा अधिक आढळले आहे. त्याचप्रमाणे भारतातील वायव्येकडील अन्य २६ जिल्ह्यांमध्ये, दक्षिण किंवा आग्नेय भागांतील नऊ जिल्ह्यांमध्ये भूजलामध्ये युरॅनिअमचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे.
या अभ्यासामध्ये राजस्थान, गुजरात येथील सुमारे ३२४ विहिरीचे पाणी नमुन्याचे विश्लेषण केले. त्यातील युरॅनिअम आयसोटोपच्या गुणोत्तर मोजण्यात आले. त्याचवेळी राजस्थान, गुजरातसह अन्य १४ राज्यांत झालेल्या ६८ पूर्व अभ्यासाचा आढावा घेत विश्लेषण केले.

पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता ः
जागतिक आरोग्य संघटनेच्या पिण्यासाठी सुरक्षित पाण्याचे निकषानुसार पाण्यातील युरॅनिअमचे प्रमाण ३० मायक्रोग्रॅम प्रतिलिटरपर्यंत असावे, असे असूनही ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड यांच्या पाणी तपासणीच्या निकषामध्ये युरॅनियमचा अद्यापही अंतर्भाव करण्यात आलेला नाही. संशोधिका रॅचेल एम. कॉयट यांनी सांगितले, की अनेक ठिकाणी पाणी धरून ठेवणाऱ्या खडकामध्ये नैसर्गिकरीत्या युरॅनियमचे प्रमाण अधिक आहे. त्याची पाण्यासोबत व हवेसोबत प्रक्रिया होऊन ऑक्सिडेशन होते. त्यातून ते पाण्यामध्ये विरघळण्याची प्रक्रिया घडते. या नैसर्गिक घटकांसोबतच भूजलाचा सिंचनासाठी वाढत असलेला वापरही अधिक प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे.
या नव्या अभ्यासातून पुढे आलेल्या निष्कर्षामुळे सध्याच्या पाणी दर्जा निरीक्षण आणि तपासणी कार्यक्रमांची पुन्हा आखणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...