agricultural stories in marathi, agro vision, yeast for prevention botriytis in grapes | Agrowon

द्राक्षातील कूज रोखण्यासाठी यीस्ट ठरेल उपयुक्त
वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

द्राक्षाच्या घडावर येणाऱ्या बुरशींच्या नियंत्रणासाठी जंगली यीस्टचे विविध प्रकार उपयोगी ठरू शकतात. अशा काही यीस्ट प्रजातींचा शोध घेण्यामध्ये इटली देशातील संशोधकांना यश आले आहे. द्राक्षाच्या जंगली जातीमध्ये यीस्टच्या विविध जंगली प्रजाती वाढत असून, त्याचा फायदा लागवडीखाली असलेल्या द्राक्ष पिकामध्येही होऊ शकतो. अशा यीस्ट प्रजातींमुळे बुरशीनाशकांच्या तुलनेमध्ये अधिक सक्षमपणे व पर्यावरणपूरक पद्धतीने रोगाचे नियंत्रण करणे शक्य होऊ शकते. हे संशोधन ‘जर्नल फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

द्राक्षाच्या घडावर येणाऱ्या बुरशींच्या नियंत्रणासाठी जंगली यीस्टचे विविध प्रकार उपयोगी ठरू शकतात. अशा काही यीस्ट प्रजातींचा शोध घेण्यामध्ये इटली देशातील संशोधकांना यश आले आहे. द्राक्षाच्या जंगली जातीमध्ये यीस्टच्या विविध जंगली प्रजाती वाढत असून, त्याचा फायदा लागवडीखाली असलेल्या द्राक्ष पिकामध्येही होऊ शकतो. अशा यीस्ट प्रजातींमुळे बुरशीनाशकांच्या तुलनेमध्ये अधिक सक्षमपणे व पर्यावरणपूरक पद्धतीने रोगाचे नियंत्रण करणे शक्य होऊ शकते. हे संशोधन ‘जर्नल फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सातत्याने केलेल्या वापरामुळे रासायनिक कीडनाशकांप्रती बुरशी किंवा कीडीमध्ये प्रतिकारकता विकसीत होते. हळूहळू रासायनिक घटकांचा परिणाम कमी होत जातो. त्यातच युरोपिय महासंघाने रासायनिक बुरशीनाशकांतील अनेक घटकांवर बंदी आणली आहे. अशा वेळी पर्यावरणपूरक पर्यायासाठी जगभरामध्ये संशोधन होत आहे. त्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या यीस्टसारख्या बुरशी उपयुक्त ठरू शकतात. यीस्ट वाढीसाठी अन्य घटकांशी स्पर्धा करत असल्याने रोगकारक घटकांचा वाढीसाठी जागा उपलब्ध होत नाही. अशा रितीने रोगकारक घटकांची वाढ कमी होते किंवा रोखली जाते.

  • नगदी पीक मानले जात असल्याने द्राक्षामध्ये कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी रासायनिक घटकांचा वापर प्रामुख्याने केला जातो. यातून हानीकारक असे रासायनिक अवशेष राहण्याची शक्यता असते. या रासायनिक घटकांचा पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी जंगलातील पर्यावरणातील प्रचंड जैवविविधतेचा उपयोग होऊ शकतो. जंगली पर्यावरणातील अनेक घटकांचा वापर पिकामध्ये कीडनियंत्रणासाठी करता येऊ शकत असल्याचे मिलान विद्यापीठातील संशोधिका इयना विगेन्टिनी यांनी सांगितले.
  • विगेन्टिनी, गुस्तोवो कोर्डेरो- बुयुसो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जॉर्जिया, इटली, रोमानिया आणि स्पेन या देशातील जंगली द्राक्षांवरील उपयुक्त असे यीस्टचे २० प्रकार ओळखून वेगळे केले आहेत. त्याच्या प्रयोगशाळेमध्ये रोगांच्या नियंत्रणासाठी चाचण्या घेतल्या आहेत.
  • द्राक्षामध्ये विविध कूज होण्यासाठी कारणीभूत असलेल्या बुरशींना रोखण्यामध्ये यीस्ट कशा प्रकारे कार्य करते, याचाही अभ्यास करण्यात आला. कूज रोगकारक बुरशींच्या पेशीभित्तिका विरघळून टाकणारी विविध एन्झायम्स (विकरे) यीस्टमार्फत सोडली जात असल्याचे त्यांना आढळले.
  • वाईन निर्मितीमध्ये या यीस्ट प्रजाती कोणतीही ढवळाढवळ करत नसल्याचे आधी झालेल्या संशोधनामध्ये आढळले आहे. त्याच प्रमाणे तीव्र अशा वातावरणामध्येही त्या चांगल्या प्रकारे तग धरतात. अर्थात, प्रत्यक्ष शेतामध्ये आणखी चाचण्या घेण्याची आवश्यकता आहे.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...