स्पेनमध्ये झाले अन्ननिर्मितीसाठी आवश्यक ऊर्जेचे विश्लेषण

स्पेनमध्ये झाले अन्ननिर्मितीसाठी आवश्यक ऊर्जेचे विश्लेषण
स्पेनमध्ये झाले अन्ननिर्मितीसाठी आवश्यक ऊर्जेचे विश्लेषण

स्पेन येथील अन्नप्रक्रिया उद्योगांचे ऊर्जा वापराच्या दृष्टीने सर्वेक्षण आणि विश्लेषण सेव्हिला येथील युनिव्हर्सिटी पाब्लो ओलाव्हिडे यांनी केले आहेत. त्यात एकूण ऊर्जावापराच्या तीस टक्के इतका ऊर्जा वापर या क्षेत्रामध्ये होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऊर्जा वापरातील अकार्यक्षमता दूर करण्याचे आव्हान अन्न प्रक्रिया उद्योगांसमोर असल्याचे संशोधकांचे मत आहे. अन्ननिर्मिती ही घरगुती आणि उद्योगाच्या पातळीवर होत असते. या दोन्ही क्षेत्राच्या एकत्रित प्राथमिक ऊर्जा वापराचे प्रमाण ३० टक्के आढळले आहे. अन्ननिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतात. या क्षेत्रातील ऊर्जावापराची अकार्यक्षमता शोधून त्यावर मात करण्याचे उपायही शोधण्याची आवश्यकता असल्याचे मत संशोधक मॅन्युअल गोन्झालेझ डी मोलिना यांनी व्यक्त केले.

  • अन्ननिर्मितीच्या प्रत्येक प्रक्रियेसाठी आवश्यक उर्जेचे प्रमाण नेमकेपणाने मोजण्यात आले. त्याच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यात आला.
  • ऊर्जावहन, आयात, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निविष्ठा आणि पशूपालन या सर्व पातळीवर पाहणी करण्यात आली. वहनामध्ये एकूण वापराच्या २५.८ टक्क्यापर्यंत उर्जेचा खप होतो. कारण स्पेनमध्ये अन्नपदार्थाची निर्मिती आणि त्यानंतर त्याचा ग्राहकापर्यंतचा प्रवास हा दीर्घ पल्ला आहे.
  • निविष्ठामध्ये खते, वनस्पती संरणक्षासाठी वापरली जाणारी रसायने, यंत्रे, पशुखाद्य, बिया या स्रोतांसाठी २४ टक्के ऊर्जा लागते. त्यातही पशुखाद्यासाठी लागणारी ऊर्जा ही अर्ध्यापेक्षा अधिक आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com