agricultural stories in marathi, agro vision,Carbon dioxide-to-methanol process improved by catalyst | Agrowon

कर्बवायूपासून मिथेनॉल निर्मितीचा वेग वाढणार चार पटीने
वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पेन स्टेट युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी कार्बन डाय ऑक्साईड या वायूपासून मिथेनॉल निर्मिती करण्याची प्रक्रिया तीन ते चार पटीने अधिक वेगवान करणारा उत्प्रेरक मिळवला आहे. यामुळे प्रदूषणकारक अशा वायूपासून इंधन मिळवण्याचा मार्ग खुला होणार आहे.

पेन स्टेट युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी कार्बन डाय ऑक्साईड या वायूपासून मिथेनॉल निर्मिती करण्याची प्रक्रिया तीन ते चार पटीने अधिक वेगवान करणारा उत्प्रेरक मिळवला आहे. यामुळे प्रदूषणकारक अशा वायूपासून इंधन मिळवण्याचा मार्ग खुला होणार आहे.

वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडची तीव्रता वाढत असून, त्याचा जागतिक हवामानावर परिणाम होत आहे. कर्बवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नही होत आहे. त्यातील एक दृष्टीकोन कार्बन डायऑक्साईडचा वापर कर्ब स्रोत म्हणून हायड्रोजनच्या प्रक्रियेमध्ये वापरण्याचा आहे. यात अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून पाण्यातील हायड्रोजन वेगळा करून, त्याचा मिथेनॉल तयार करण्यासाठी वापरता येईल. हे मिथेनॉल सध्याच्या खनिज इंधनाची जागा घेऊ शकते.
या प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी चीन येथील दालियन तंत्रज्ञान विद्यापीठ आणि पेन स्टेट येथील ऊर्जा संशोधन केंद्रातील संशोधकांनी एकत्रितपणे संशोधन केले आहे. त्यातून त्यांनी पॅलॅडियम आणि तांबे यांपासून विशिष्ट फॉर्म्युलेशनद्वारे एक उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) तयार केला आहे.

या दोन्ही धातूंचे अणू अत्यंत अचूक गुणोत्तरामध्ये एकत्र केले असून, त्यातून तयार होणारे उत्प्रेरक सच्छिद्र आणि वॉलनटच्या आकाराचे असते. त्याचे अंतर्गत पृष्ठफळ फुटबॉलच्या मैदानाइतके आहे. या उत्प्रेरकामुळे मिथेनॉलचे उत्पादन नुसत्या पॅलॅडियमपेक्षा तीन पट अधिक, तर नुसत्या तांब्यापेक्षा चार पटीने अधिक वाढते. हे संशोधन ‘एसीएस कॅटॅलिसिस’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...