agricultural stories in marathi, agro vision,From corn to flake- Health-promoting phenolic acids lost during food processing | Agrowon

मक्यातील आरोग्यदायी फिनॉलिक संयुगे प्रक्रियेमध्ये होतात नष्ट
वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

कच्च्या मका धान्यांमध्ये विपूल प्रमाणात जीवनसत्त्वे आणि आरोग्यदायक फिनॉलिक संयुगे असली तरी प्रक्रियेमध्ये त्यांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्री’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कच्च्या मका धान्यांमध्ये विपूल प्रमाणात जीवनसत्त्वे आणि आरोग्यदायक फिनॉलिक संयुगे असली तरी प्रक्रियेमध्ये त्यांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्री’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

अमेरिकेमध्ये उच्च प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मक्यापासून फ्लेक्स वअन्य घटकांचा वापर अमेरिकनांच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणामध्ये केला जातो. मात्र, त्यामध्ये शरीराला आवश्यक ती फिनॉलिक संयुगांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठातील कृषी, ग्राहक आणि पर्यावरणशास्त्र महाविद्यालयामधील सहायक प्रा. कॅरी बट्स-विल्म्समेयर व सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयोगामध्ये दिसून आले आहे. थोडक्यात मक्यात कर्करोगविरोधी फिनॉलिक संयुगे असूनही, त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये रूपांतरामध्ये त्याचा ऱ्हास होतो.

कॅरी बट्स -विल्म्समेयर व सहकाऱ्यांनी केलेल्या या प्रयोगात कमी अधिक फिनॉलिक संयुगे असलेल्या १९ प्रकारच्या मका जातीपासून फ्लेक्स बनवले. त्यातील शिल्लक राहणाऱ्या घटकांचे नेमके प्रमाण मोजले. मक्याच्या दाण्यामध्ये सामान्यतः फेरुलिक आम्ल आणि पी- कार्मारिक आम्ल यांचे प्रमाण अधिक असते. त्याचे रूपांतर पुढे मका पक्व होताना उच्च फिनॉलिक घटकांमध्ये होते. याविषयी माहिती देताना कॅरी बट्सविल्म्समेयर यांनी सांगितले, की मका धान्यामध्ये सुरवातीला फिनॉलिक आम्लाची कितीही तीव्रता असली तरी कोरड्या दळण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यातील अनेक फिनॉलिक संयुगे नष्ट होतात. बहुतांश सर्व उत्पादनाच्या निर्मितीसाठी असे पीठ तयार करूनच वापरले जाते.

मक्यातील फिनॉलिक संयुगे ही मुख्यतः त्याच्या तुसांमध्ये किंवा बाह्यआवरणामध्ये एकवटलेली असतात. दळण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा हाच घटक काढून बाजूला केला जातो. बहुतांश फिनॉलिक संयुगे ही तंतुमय पदार्थामध्ये बांधलेल्या स्वरूपामध्ये असतात. उष्णतेमध्ये ते बंधमुक्त होऊन मक्यापासून बनवलेल्या खाद्य पदार्थातील आरोग्यदायी घटकांचे प्रमाण वाढते. मक्यामध्ये शिल्लक राहिलेल्या स्टार्च घटकांना उष्णता दिल्यास त्यातील विद्राव्य फिनॉलिक घटकांचे प्रमाण वाढवणे शक्य असल्याचे संशोधकांचे मत होते. अर्थात अशा फिनॉलिक घटकांचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे या प्रयोगात आढळले. अन्नशास्त्र विभाग आणि अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये याविषयी अधिक जागरूकता निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...