agricultural stories in marathi, agro vision,Onion Seed Production for Self Reliance and Higher Returns | Agrowon

कांदा बीजोत्पादनात चित्रदुर्गने गाठली स्वयंपूर्णता
वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात असूनही तुलनेने अत्यंत कमी प्रमाणात बिजोत्पादन होत असे. त्याचप्रमाणे उत्पादकताही अत्यंत कमी होती. या स्थितीवर मात करण्यासाठी चित्रदुर्ग येथील कृषी विज्ञान केंद्राने सुधारित जाती, एकात्मिक खत व्यवस्थापन या सोबत बीजोत्पादनाचा कार्यक्रम यांचा संगम साधला आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे चित्रदुर्गसह अन्य शेजारी जिल्ह्यामध्ये अर्का कल्याण या सुधारित जातींची लागवड वाढली असून, बियाणेही स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहे.

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात असूनही तुलनेने अत्यंत कमी प्रमाणात बिजोत्पादन होत असे. त्याचप्रमाणे उत्पादकताही अत्यंत कमी होती. या स्थितीवर मात करण्यासाठी चित्रदुर्ग येथील कृषी विज्ञान केंद्राने सुधारित जाती, एकात्मिक खत व्यवस्थापन या सोबत बीजोत्पादनाचा कार्यक्रम यांचा संगम साधला आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे चित्रदुर्गसह अन्य शेजारी जिल्ह्यामध्ये अर्का कल्याण या सुधारित जातींची लागवड वाढली असून, बियाणेही स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहे.

कर्नाटकातील मध्य कोरडवाहू भागामध्ये चित्रदुर्ग हा जिल्हा येतो. येथे सरासरी पर्जन्यमान ४५० ते ५०० मि.मि. इतके असून, नाचणी, मका, तूर, भुईमुग, कपाशी, नारळ, सुपारी, केळी, बाजरी अशी पिके घेतली जातात. खरिपामध्ये कांदा हे पीकही मोठ्या क्षेत्रावर (सुमारे १९१९३ हेक्टर) असून, सुमारे दोन लाख किलो बियाणे लागते. या बियांसाठी येथील शेतकरी प्रामुख्याने महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवलंबून असतात. यामध्ये स्वयंपूर्णता मिळवण्याच्या उद्देशाने बीजोत्पादन तंत्रज्ञान येथील शेतकऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न येथील चित्रदुर्ग येथील कृषी विज्ञान केंद्राने केला आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील कांदा उत्पादन हेक्टरी सरासरी १९.५ टन असून, ते ३० टनापर्यंत वाढवणे शक्य आहे. त्यासाठी कांदा उत्पादनाचे नेमके तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात येत आहे.

ही समस्या होती...
कांद्याची पात वेडीवाकडी होण्याचे प्रमाण अधिक होते. हे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन योग्य नसल्याचे लक्षण होते. तसेच हे उत्पादन कमी येण्याचे मुख्य कारण होते. पिकांच्या व्यवस्थापन प्रशिक्षणासोबतच मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिकेही केव्हिकेद्वारे घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून केव्हिकेने कांदा बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवत आहे. खरिपामध्ये कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे असून, त्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात रब्बीमध्ये स्थानिक जातींचे बीजोत्पादन शेतकरी करत असत. त्यांना नवीन सुधारित जातींची जोड व प्रोत्साहन देण्यात आले.

  • २००८-०९ पासून कमतरता असलेल्या जस्त, बोरॉन, जिप्सम यांचा वापर सुरू केल्याने पान वेडीवाकडी होण्याचे प्रमाण कमी झाले.
  • २०१२-१३ पासून पुढे कांदा बीजोत्पादनाला चालना देण्यात आली. वेगवेगळ्या जातींच्या उत्पादनाचा अंदाज पुढील दोन वर्षांत घेतला गेला. त्यातून निवडलेल्या भिमा सुपर आणि अर्का कल्याण या जातींच्या बीजोत्पादन २०१६-१७ पासून प्रारंभ झाला.

उत्पादनासह फायद्यातही झाली वाढ

  • २०१२ ते २०१४ या दोन वर्षांत २५ शेतकऱ्यांच्या सुमारे १० हेक्टर शेतामध्ये कांदा पिकांच्या व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यातून दर्जा निश्चितीची खात्री झाल्यानंतर भिमा सुपर आणि अर्का कल्याण या जातींच्या बीजोत्पादनाला मुद्दपुरा गावातील १५ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुरवात केली. पुढे गरजेनुसार शेजारच्या गावांमध्ये प्रसार केला गेला. हे बियाणे बेल्लारी, चिकमंगळूरू आणि तुमकुर जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करण्यात आले.
  • या सर्व भागांमध्ये अर्का कल्याण या जातीची लागवड लक्षणीयरीत्या वाढली आहे. ही जात पूर्वी घेतल्या जाणाऱ्या स्थानिक जातींपेक्षा अधिक उत्पादनक्षम असून, जांभळा करपा या रोगासाठी प्रतिकारक आहे. तसेच दुष्काळी स्थितीमध्येही चांगला परतावा देते. व्यावसायिक बीजोत्पादन आणि कांदा उत्पादनाचा आढावा घेतला. त्यात अर्का कल्याण या जातीचे बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना ७.१० लाख रुपये नफा मिळाला, तर व्यावसायिक कांदा उत्पादनातून २.०५ लाख रुपये नफा मिळाला.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांदा बिया या वेळेवर व उत्तम दर्जाच्या मिळण्यास या प्रकल्पातून मदत होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...