पोर्तुगालची शेते झाली गुलाबी !

पोर्तुगालची शेते झाली गुलाबी!
पोर्तुगालची शेते झाली गुलाबी!

पोर्तुगालमध्ये पॉलिहाउसबरोबरच पारंपरिक पद्धतीनेही मोठ्या प्रमाणात फूलशेती होते. अलीकडे लॅव्हेन्डुला हे मुख्य फूलपीक झाले असून, त्यानंतर मॅन्डेव्हिला आणि डायंथस यांचा क्रमांक लागतो.

रोपांच्या निर्मितीसाठी डायंथस फुलझाडांच्या कटिंग्स जर्मनीतून आयात केले जातात. त्याच प्रमाणे लॅव्हेनडुला स्टोचेस आणि मॅन्डेव्हिया या फुलांचे कटिंग बेल्जियममधून आणतात. या कटिंगपासून पोर्तुगालमध्ये रोपांची निर्मिती केली जाते. रोपांच्या हार्डनिंगनंतर पुन्हा पॅकिंग करून विक्रीसाठी नेदरलॅंडमधील अल्समीर बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात.

पोर्तुगालमध्ये नेदरलॅंडच्या तुलनेमध्ये १० आठवडे आधी डायथंसची फुले येतात. त्याचा फायदा निर्यातीमध्ये पोर्तुगालला मिळत असल्याचे येथील गाय व्हॅन ड्युरेन या फुलतज्ज्ञांनी सांगितले. म्हणजेच फूल रोपांची निर्मिती आणि फुलांच्या विक्रीमध्ये या दोन्हीमध्ये पोर्तुगालने उत्तम संधी विकसित केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com