agricultural stories in marathi, agro vision,Wheat disease breakthrough to help feed the world | Agrowon

गव्हावरील तांबेरा रोगाच्या निदानासाठी जनुकीय तंत्र फायदेशीर
वृत्तसेवा
रविवार, 24 डिसेंबर 2017

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी गहू पिकामध्ये नुकसानकारक ठरणाऱ्या तांबेरा रोगाचे निदान करण्यासाठी जनुकीय तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. त्यांनी तांबेरा प्रादुर्भावामुळे गहू पिकातील प्रतिकारक यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या नेमक्या जनुकांचा शोध घेतला असून, त्याद्वारे रोगाचे नेमकेपणाने व त्वरित निदान करणे शक्य होणार आहे. हे संशोधन ‘जर्नल सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी गहू पिकामध्ये नुकसानकारक ठरणाऱ्या तांबेरा रोगाचे निदान करण्यासाठी जनुकीय तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. त्यांनी तांबेरा प्रादुर्भावामुळे गहू पिकातील प्रतिकारक यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या नेमक्या जनुकांचा शोध घेतला असून, त्याद्वारे रोगाचे नेमकेपणाने व त्वरित निदान करणे शक्य होणार आहे. हे संशोधन ‘जर्नल सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

   प्राचीन काळी दुष्काळामुळे अन्नधान्य उत्पादनावर विपरीत परिणाम होत असे. मात्र अलीकडे काही वर्षांमध्ये रोगांचा सातत्याने प्रादुर्भाव होत असल्याने गव्हाचे उत्पादनामध्ये घट होत आहे. त्यातील तांबेरा या जगभर आढळणाऱ्या रोगाविरुद्ध सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर काही तासामध्येच त्याच्या नमुन्याचे विश्लेषण करण्याचे तंत्रज्ञान तयार केले आहे. पूर्वी या विश्लेषणासाठी काही आठवडे लागत असत. या काळामध्ये रोगाच्या प्रादुर्भाव वेगाने वाढून पिकांचे नुकसान होत असे. किंवा अंदाजाने रोगनियंत्रणाचे उपाय करावे लागत. त्याविषयी माहिती देताना सिडनी विद्यापीठातील प्रो. रॉबर्ट पार्क यांनी सांगितले, की डीएनए चाचणीतून गहू पिकावरील तांबेरा रोगाचे निदान वेगाने करणे शक्य होणार आहे. त्यासाठी गव्हातील तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होताच कार्यरत होणारे प्रतिकारक जनुक ( Sr५०) शोधण्यात आले आहे. फवारणीचा निर्णय घेणे सोपे होईल. या जनुकाचा वापर अधिक उत्पादनक्षम गहू जातीमध्ये करता येईल.

  • तांबेरा रोगाचा प्रसार पूर्व आफ्रिका ते युरोप सर्वत्र होत आहे. गेल्या वर्षीच स्वीडनमध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसला होता. पुढे त्याचा आशिया आणि अमेरिकेमध्येही त्याच्या प्रादुर्भावाची भिती आहे. या रोगाचे निदाने त्वरेने करणे शक्य झाल्यास नियंत्रणाचे उपायही वेळेवर करता येतील. त्याचा फायदा रोगाचा प्रसार रोखण्यासाठी होऊ शकतो. १९७३ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या तांबेरा प्रादुर्भावामुळे ३०० दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले होते.
  • गहू धान्याची मागणी सातत्याने वाढत असून, विकसनशील देशामध्ये २०५० पर्यंत हे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता कॉमनवेल्थ सायंटिफिक इंडस्ट्रिअल रिसर्च ऑर्गनायझेशन चे डॉ. पीटर डॉड्डस यांनी व्यक्त केले.  
  • सिडनी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी जियापेंग चेन हे तांबेरा रोगाचे जनुकीय संरचना आणि विश्लेषणावर काम करत आहे. सातत्याने बदलत असलेल्या या बुरशींचे योग्य निदान करण्यासाठी यातील काही जनुके उपयुक्त ठरू शकतात. काही तांबेरा प्रजाती या Sr५० जुनकाच्या प्रतिकारकतेवर मात करू शकतात. मात्र, त्यामधील म्युटेशन ओळखले असून, त्याला AvrSr५० असे नाव दिले आहे. त्यामुळे वनस्पतीची प्रतिकारक यंत्रणा ही बुरशीच्या प्रथिनांना सरळ ओळखू शकते. त्याचा फायदा रोगाला रोखण्यासाठी होऊ शकतो.

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...