agricultural stories in Marathi, agrovision, Australia: Supermarket giant helps farmers drought-proof operations | Agrowon

ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी लढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत
वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी सामना करण्याच्या शेतकऱ्यांना मदत करण्यात पुढाकार घेतला आहे. २०१५ पासून दुष्काळी कामांसाठी खास २० दशलक्ष पेक्षा अधिक निधी वापरला आहे. या वर्षी पाच दशलक्ष निधी प्रामुख्याने पाणी वाचवणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वापरण्याचे नियोजन करून कामांना सुरवात झाली आहे.

ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी सामना करण्याच्या शेतकऱ्यांना मदत करण्यात पुढाकार घेतला आहे. २०१५ पासून दुष्काळी कामांसाठी खास २० दशलक्ष पेक्षा अधिक निधी वापरला आहे. या वर्षी पाच दशलक्ष निधी प्रामुख्याने पाणी वाचवणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वापरण्याचे नियोजन करून कामांना सुरवात झाली आहे.

ऑस्ट्रेलियातील क्विन्सलॅंड भागातील पाच पैकी चार भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियातील मोठे कोल्स सुपरमार्केट पुढे आले आहे. त्यांनी या प्रकल्पाअंतर्गत १६ शेतकरी आणि प्रक्रिया उद्योजकांना मदत केली आहे. पाच दशलक्ष डॉलर इतका दीर्घकालीन आर्थिक निधी पुरवला आहे. इतर कारणांसाठी निधी बाजूला ठेवला आहे.

क्विन्सलॅंड भागातील शेतकरी ब्रायन क्रस्ट हे आपली पत्नी ज्युलिया आणि मुलगा मॅथ्यू यांच्यासह भाजीपाल्याची शेती करतात. भाज्यांमध्ये प्रामुख्याने ब्रोकोली, फूलकोबी आणि कोबी यांचे उत्पादन घेतले जाते. ते कोल्स सुपर मार्केटला भाज्या पुरवतात. मात्र, दुष्काळी स्थितीमध्ये उत्पादनामध्ये अडचणी येत होत्या. या वर्षी त्यांच्या १०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३० हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करणे शक्य झाले.
कोल्स सुपरमार्केटद्वारे १.४ दशलक्ष डॉलर इतक्या निधीतून ब्रायन क्रस्ट यांच्या शेती परिसरातील एका धरणामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. या मुळे धरणाची क्षमता २० टक्क्याने वाढणार आहे. येथून निचरा होऊन पाणी रोखण्यासाठी त्याला प्लॅस्टिक लायनिंग केली जात आहे. पाणी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेमध्ये बचत करण्यासाठी खास प्रयत्न केले जात आहेत. या साऱ्या प्रयत्नातून ३० मेगा लिटर पाणी वाचवणे शक्य होईल, असा शेतकरी क्रस्ट यांना विश्वास आहे. धरणांच्या कामाला सुरवात झाली असली तरी या हंगामामध्ये त्याचा कितपत फायदा होईल, या बद्दल साशंकता असली तरी तीव्र दुष्काळी परिस्थितीमध्ये कोल्स सुपरमार्केटने पाठिंबा दिल्यामुळे आनंदी असल्याचे क्रस्ट यांनी सांगितले.

दुष्काळसंबंधी अडचणींमध्ये शेतकरी व प्रक्रिया उद्योजकांना मदत करण्यासाठी २०१५ पासून सुमारे २० दशलक्ष डॉलर इतकी रक्कम खर्च केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना विविधप्रकारे मदत केली जाते.
- ग्रेग डेव्हिस
मुख्य कार्यअधिकारी, कोल्स सुपर मार्केट.

 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...