मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने होण्याची गरज

मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने होण्याची गरज
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने होण्याची गरज

गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचे समोर येत आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न उतह राज्य विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांनी गेल्या १७ वर्षाच्या कालावधीमध्ये कॅलिफोर्निया येथील पिनॅकल राष्ट्रीय उद्यानामध्ये तीन वेगवेगळी सर्वेक्षणे करून परागीकरण करणाऱ्या कीटकांच्या जैवविविधतेच्या नोंदी घेतल्या आहेत. अशाच पद्धतींचा अभ्यास अन्य क्षेत्रांमध्येही होणे आवश्यक असल्याचे मत मांडले आहे. सर्वेक्षणाचे निष्कर्ष ‘प्लॉसवन’ या संशोधनपत्रिकेमध्ये मांडण्यात आले आहेत. गेल्या १७ वर्षांच्या कालावधीमध्ये उतह राज्य विद्यापीठातील संशोधक जोआन मेईनर्स आणि टेरी ग्रीसवोल्ट यांनी स्वतंत्र संशोधक ओलिव्हिया मेस्सिन्जर यांनी कॅलिफोर्निया येथील पिनॅकल राष्ट्रीय उद्यानामध्ये तीन वेगवेगळी सर्वेक्षणे केली. त्यात त्यांनी ४५० जंगली प्रजाती, स्थानिक मधमाश्‍या नोंदवल्या आहेत. त्यातील ४८ प्रजाती या क्षेत्रामध्ये २००२ पर्यंत नवीन होत्या. १९९० मध्ये सापडणाऱ्या ९५ जाती आता सापडत नसल्याचे नोंदवले आहे. या संशोधनाविषयी माहिती देताना तज्ज्ञ जोआन मेईनर्स यांनी सांगितले, की आम्हाला देशामध्ये मधमाश्यांसाठी केवळ २३ नैसर्गिक प्रक्षेत्रे आढळली आहेत. येथील मधमाशी प्रजातींचे सर्वेक्षण झाले असल्याने त्याची कालावधीनुसार तुलना करणे शक्य होते. राष्ट्रीय उद्यानामध्ये नोंदवलेल्या मधमाश्‍यांच्या जैवविविधतेचे अंदाज मिळवणे तितकेसे विश्वासार्ह ठरत नाही. कारण रहिवासातील जंगली माश्यांच्या मर्यादित नोंदी, कालावधी होय. सात वर्षाच्या सर्वेक्षणामध्ये ८१ टक्क्यांपेक्षा अधिक प्रजाती या भिन्न असतात. प्रति वर्ष कमी होत जाणाऱ्या माश्या, मर्यादित होणारे रहिवास यामुळे असे घडते. त्यामुळे अचूक प्रमाम काढणे अत्यंत अवघड आहे. स्थानिक मधमाश्या या कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून, अमेरिकेतील उत्पादनामध्ये प्रति वर्ष सुमारे ३ अब्ज डॉलरइतका वाटा परागीकरणाद्वारे उचलतात. उतह विद्यापीठातील संशोधकांनी पिनॅकल राष्ट्रीय उद्यानामध्ये राबवलेल्या सर्वेक्षणाप्रमाणेच अन्य ठिकाणीही परागीकरण करणाऱ्या कीटकांचा अचूक मागोवा घेतला पाहिजे. त्यातून मधमाश्यांचे प्रमाण कमी होत असल्याबाबत उपाययोजना आखणे सोपे होऊ शकते, असे मत मेईनर्स यांनी व्यक्त केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com