agricultural stories in Marathi, agrovision, Butterflies thrive in grasslands surrounded by forest | Agrowon

वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये फुलपाखरांची जैवविविधता अधिक
वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये परागीकरण करणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती चांगल्याप्रकारे वाढत असल्याचे स्वीडन येथील संशोधनामध्ये दिसून आले आहे. लिंकोपिंग विद्यापीठ आणि उप्पाला येथील स्वीडिश कृषी शास्त्र विद्यापीठातील संशोधकांनी फुलपाखरांच्या ३२ हजार प्रजातींच्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढले आहेत. यातून जैवविविधतेच्या दृष्टीने शेती आणि वन यांचे संतुलन ठेवत नियोजन करणे शक्य होऊ शकते. हे संशोधन ‘जर्नल लॅण्डस्केप इकॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये परागीकरण करणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती चांगल्याप्रकारे वाढत असल्याचे स्वीडन येथील संशोधनामध्ये दिसून आले आहे. लिंकोपिंग विद्यापीठ आणि उप्पाला येथील स्वीडिश कृषी शास्त्र विद्यापीठातील संशोधकांनी फुलपाखरांच्या ३२ हजार प्रजातींच्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढले आहेत. यातून जैवविविधतेच्या दृष्टीने शेती आणि वन यांचे संतुलन ठेवत नियोजन करणे शक्य होऊ शकते. हे संशोधन ‘जर्नल लॅण्डस्केप इकॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

स्वीडनमध्ये अर्धनैसर्गिक गवताळ प्रदेशामध्ये वनस्पती आणि फुलपाखरांची जैवविविधता मोठी होती. मात्र, गेल्या १०० वर्षांमध्ये त्यातील ९० टक्के घट झाली. अगदी काही भागांमध्ये त्यांची योग्य प्रकारे जपणूक झाली. उर्वरित भागांमध्ये फुलपाखरांच्या अनेक प्रजातींचे प्रमाण कमी झाले किंवा त्या लुप्त झाल्या. दक्षिण स्वीडन येथील वनांची हानी आणि कृषी क्षेत्राची वाढ या पार्श्वभूमीचा फुलपाखरांवर होणारा परिणामांचा अभ्यास लिंकोपिंग विद्यापीठ आणि उप्पाला येथील स्वीडिश कृषी शास्त्र विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला. त्यांना ७७ प्रजातींची सुमारे ३२ हजार फुलपाखरे आढळली. त्याविषयी माहिती देताना कार्ल ओलोफ बर्गमान यांनी सांगितले, की अर्धनैसर्गिक गवताळ प्रदेशांतील प्रजातींची समृद्धता लक्षात घेण्याजोगी असून, त्यावर गवताळ प्रदेशाच्या गुणधर्मांइतकेच अन्य घटकांचेही परिणाम होत असल्याचे दिसून आले. फुलपाखरांसाठी आजूबाजूंची हिरवळही महत्त्वाची असते. जर असे गवताळ प्रदेश नुसतेच मोठ्या कृषीक्षेत्राजवळ असेल, तर तेथील फुलपाखरांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे.

परिसराचा परिणाम ः

आजूबाजूला १० ते २० किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये मोठी गवताळ क्षेत्रे असल्यास अशा भागांमध्ये फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या अधिक आढळली. त्यातच गवताळ प्रदेश जंगलानी वेढलेले असेल, तर प्रजातींचे प्रमाण आणखी अधिक आढळली. या जंगलांच्या कडा, वनक्षेत्रे, वनपट्टे यांसह स्वच्छ केलेले काही भाग यात फुलपाखरांचा रहिवास असल्याचे दिसून येते. या सोबत अर्धनैसर्गिक गवताळ प्रदेश असल्यास फुलपाखरांच्या संख्येत वाढ आढळली. आजूबाजूच्या प्रदेशासाठी वेगवेगळ्या प्रजाती हा वेगवेगळा प्रतिसाद देतात. काही प्रजाती एकदम जवळ असलेल्या प्रजातीविषयी अत्यंत संवेदनशील होत्या, तर काहींवर आजूबाजूच्या एकूण परिसराचा विशेषतः अर्धनैसर्गिक गवताळ प्रदेश दूर असण्याच्या स्थितीचा अधिक परिणाम होतो.

दक्षिण स्वीडन येथील जैवविविधतेने भरपूर अशा परिसरामध्ये अद्यापही अनेक अर्धगवताळ प्रदेश शिल्लक आहेत. विशेषतः पूर्वेतील स्वीडनमध्ये ही ओस्टेर्गोटलॅँडच्या काही भागांमध्ये मोठे क्षेत्र त्याखाली आहे. अशा प्रक्षेत्रांचे संवर्धन केले पाहिजे. हे संशोधन फुलपाखरांसह अन्य परागवाहकांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणार आहे. शेवटी परागीकरणाचा फायदा हा कृषीक्षेत्रालाही होणार आहे.
- कार्ल ओलोफ बर्गमान.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...