agricultural stories in Marathi, agrovision, Changes in subsistence hunting threaten local food security | Agrowon

शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षेवर होतोय परिणाम
वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

वर्षावनातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचे मत युनिव्हर्सिदाद सॅन फ्रान्सिस्को डी क्विटो आणि ‘डब्ल्यूसीएस इक्वेडोर प्रोग्रॅम’मधील संशोधकांनी व्यक्त केले आहे. या शिकारी प्रामुख्याने आहारातील प्रथिनांच्या पूर्ततेसाठी केल्या जात असून, त्याचे पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याचा इशारा देण्यात आला. हे संशोधन ‘जर्नल बायोट्रॉपिका’मध्ये प्रकाशित केले आहे.

वर्षावनातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचे मत युनिव्हर्सिदाद सॅन फ्रान्सिस्को डी क्विटो आणि ‘डब्ल्यूसीएस इक्वेडोर प्रोग्रॅम’मधील संशोधकांनी व्यक्त केले आहे. या शिकारी प्रामुख्याने आहारातील प्रथिनांच्या पूर्ततेसाठी केल्या जात असून, त्याचे पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याचा इशारा देण्यात आला. हे संशोधन ‘जर्नल बायोट्रॉपिका’मध्ये प्रकाशित केले आहे.

पूर्वी निबीड अशा वर्षावनांमध्ये केवळ लहान गटाद्वारे पारंपरिक हत्यारांनी केवळ उपजीविकेसाठी शिकारी केल्या जात. मात्र, अलीकडे शिकारीच्या पद्धती आधुनिक झाल्या असून, शिकाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. आधीच खाण उद्योग, तेलाचा शोध आणि पर्यटन यामुळे वनांमध्ये आतपर्यंत मानवाचा वावर वाढला आहे. त्यामुळे जंगलाची आणि जंगली श्वापदांची भीती कमी झाली असून, वन्यप्राणी व त्यांच्या शरीरातील अवयवांची निर्यात वाढत चालली आहे. याचा फटका अनेक वन्यप्रजातींना बसत असून, त्याचा जंगलाच्या जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहे. ही जैवविविधता एकूणच जंगलांच्या पर्यावरणासाठी अत्यावश्यक असून, त्याचा अंतिम परिणाम मानवाच्या अन्नसुरक्षिततेवरही होणार असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.

शिकारीसाठी विविध आधुनिक साधनांचा एकत्रित वापर होत अाहे. त्यातून शिकार यशस्वी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने अनेक प्रजातींची संख्या वेगाने कमी होत आहे. अनेक प्रजातींच्या शिकारीवर बंदी आली असली तरी शिकारीचे सर्व लक्ष अन्य लहान प्रजातींकडे वळले आहे. या लहान प्रजातींचा जन्मदर अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, ज्या वेगाने शिकारीचे प्रमाण वाढत आहे, त्या तुलनेमध्ये जन्मदरही कमी राहू शकतो. त्याचा फटका या प्रजातींनाही बसणार आहे.

उपाययोजना
या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सहभागींचे वेगवेगळे विभाग करण्याची कल्पना मांडली जाते. उदा. रहिवासी, शेती विभाग, लाकडाशिवाय अन्य वनोपजे गोळा करण्याचे विभाग, वनविभाग, शिकार विभाग. या विभागांतील स्थानिक लोकांसाठी उपीजविकेचे अन्य मार्ग उपलब्ध करून देणे. उदा. पर्यावरण पर्यटन, अन्नासाठी पाळीव प्राण्यांचे संगोपन, विविध पाळीव प्राण्यांची पैदास करणे.

 

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...