agricultural stories in Marathi, agrovision, Ecological benefits of part-night lighting revealed | Agrowon

प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे आवश्यक
वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

परागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नसल्याने न्युकॅसल आणि यॉर्क विद्यापीठातील संशोधनात आढळले आहे. विशेषतः लहान असलेल्या रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे बंद करण्याचे अन्य फायदेही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे संशोधनात मांडण्यात आले आहे. प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणामांचा दीर्घ अभ्यास होणे आवश्यक आहे.

परागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नसल्याने न्युकॅसल आणि यॉर्क विद्यापीठातील संशोधनात आढळले आहे. विशेषतः लहान असलेल्या रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे बंद करण्याचे अन्य फायदेही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे संशोधनात मांडण्यात आले आहे. प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणामांचा दीर्घ अभ्यास होणे आवश्यक आहे.

रस्त्यावरील दिवे आणि जाहिरातींच्या प्रकाशामध्ये रात्रीच्या वातावरणामध्ये एक प्रकारे प्रदूषण होत असते. रात्रीच्या अंधारामध्ये आपले अन्न शोधण्यासाठी बाहेर पडणाऱ्या निशाचरांच्या वर्तनांवर त्यांचा परिणाम होतो. या बाबींचे विश्लेषण आणि अभ्यास न्युकॅसल आणि यॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या केला. त्यांनी प्रामुख्याने पतंगवर्गीय कीटकांच्या नैसर्गिक वर्तनाचा अभ्यास केला. हे पतंग रात्रीच्या वेळी वाटाणा, सोयाबीन आणि तेलबिया पिकांमध्ये परागीकरण करतात. हे कीटक मधमाश्या आणि अन्य परागवाहक कीटकांचे दिवसा केलेले काम पुढे नेत असल्याचे अन्य काही संशोधनातून पुढे आले होते.
-रात्रीच्या वेळी असलेल्या कृत्रिम प्रकाशामुळे पतंग शेतापासून दूर वरील बाजूला आकर्षित होतात. प्रकाशाकडे जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे शेतामध्ये कमी काळ घालवतात. परिणामी, परागीकरणावर परिणाम होत असल्याचे मानले जात होते. मात्र, नुकत्याच झालेल्या या अभ्यासामध्ये पूर्ण अंधाऱ्या रात्री आणि प्रकाशमय रात्री यातील परागीकरणामध्ये फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले. हे संशोधन इकोस्पीअरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

डॉ. डॅरेन इव्हान्स यांनी केलेल्या अभ्यासासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने रस्त्यावरील दिवे बंद करण्यात आले. त्याविषयी माहिती देताना इव्हान्स म्हणाले, की जागतिक पर्यावरण बदलामध्ये रात्रीच्या वेळी वाढत चाललेला कृत्रिम प्रकाश अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. प्रतिवर्ष या प्रकाशामध्ये ६ टक्क्यांनी वाढ होत असल्याचे दिसून आले. या वाढत्या प्रकाशाचे पर्यावरणावरील नेमक्या परिणामांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

सामान्यतः पतंगवर्गीय कीटकांच्या कार्यक्षमतेमध्ये प्रकाशाच्या प्रदूषणाचे लक्षणीय फरक पडतात. त्याचा परागीकरणावरही परिणाम होत असल्याचे मानले जात होते. मात्र, आमच्या अभ्यासामध्ये पूर्ण रात्र प्रकाश राहिल्यास त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. अर्धकाळ असलेल्या प्रकाशामुळे परागीकरणाच्या यशस्वीपणा किंवा दर्जावर फारसा परिणाम दिसून आला नाही.

रात्री रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश ः

रात्रीच्यावेळी होणाऱ्या प्रकाशाचे मानवी आरोग्य आणि वन्यजीवांवर विपरीत परिणाम होतात. त्यांची रात्र आणि दिवसांच्या कामांचे नैसर्गिक पॅटर्न बदलतात. जैविक पातळीवरील हे परिणाम अगदी लहान पेशीपासून संपूर्ण समुदायांनाही भेडसावू लागले आहेत. गेल्या दशकामध्ये स्थानिक प्रशासनाने विज व खर्चामध्ये बचत करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या ठराविक काळात रस्त्यावरील दिवे बंद करण्याचे धोरण आखले होते. त्याचप्रमाणे उच्च दाबाच्या सोडियम दिव्यांऐवजी ऊर्जा कार्यक्षम अशा एलईडी दिव्यांचा वापर वाढवला होता.
पतंगवरील प्रकाशाचा होणारा परिणाम तपासण्यासाठी रस्त्यावरील दिव्यांखालील फुलांच्या परागीकरणाचा अभ्यास करण्यात आला. हे दिवे सोडियम आणि एलईडी अशा दोन्ही प्रकारचे होते. त्यातील काही दिवे संपर्ण रात्र चालू ठेवून, तर काही मध्यरात्रीच्या काळात बंद ठेवून पतंगावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला गेला. त्याचवेळी नैसर्गिक अंधारामध्ये होणारे परागीकरणही तपासण्यात आले. या तिन्ही पद्धतींची तुलनात्मक मांडणी केली. मात्र, परागीकरणामध्ये फारसा फरक दिसून आलेला नाही.

भविष्यात विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण यातील समतोल साधण्याचे अवघड काम संवर्धकांना करावे लागणार आहे. आमच्या अभ्यासामध्ये मध्यरात्रीच्या वेळी दिवे बंद ठेवणे ही कीटक आणि मानवाबरोबरच ऊर्जा आणि आर्थिक बचतीच्या दृष्टीने ‘विन- विन’ परिस्थिती असणार आहे. यातून निशाचरांच्या आयुष्यावरील मानवी कृत्रिम प्रकाशाचे आक्रमण थांबवणे शक्य होईल.
- डॉ. कॅल्लम मॅकग्रेगोर,
संशोधक, यॉर्क विद्यापीठ.
 

इतर बातम्या
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...